' जाहिरात, दर्जा आणि स्वस्तात धुमाकूळ: भारतीय मार्केटमधली यशाची "स्प्लेंडर" केसस्टडी

जाहिरात, दर्जा आणि स्वस्तात धुमाकूळ: भारतीय मार्केटमधली यशाची “स्प्लेंडर” केसस्टडी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

दुचाकी म्हटलं की काही गाड्या अगदी आपसूकच आठवतात. बजाजची पल्सर असो, होंडाची ऍक्टिवा किंवा युनिकॉर्न असो, टीव्हीएसची अपाचे असो, किंवा हिरोची स्प्लेंडर, या गाड्यांची आठवण झाल्याशिवाय दुचाकीबद्दलचा कुठलाही विषय पूर्ण होऊ शकत नाही.

या सगळ्यात ऍक्टिवा आणि स्प्लेंडर या गाड्या एव्हरग्रीन आणि सगळ्यांच्या पसंतीच्या ठरल्या असं म्हणायला हरकत नाही. सध्याचे पेट्रोलचे गगनाला भिडलेले भाव पाहिले, तर स्प्लेंडर ही दुचाकी तर अनेकांच्या पहिल्या पसंतीची ठरेल यात काहीच शंका नाही.

 

Pollution by Bikes Inmarathi
Q Costa Rica

 

कमीत कमी पेट्रोलमध्ये अधिकाधिक धावणं, अर्थातच उत्तम मायलेज हे याचं मुख्य कारण! नुकतंच स्प्लेंडरचं नवं मॉडेल बाजारात आलं आहे, आणि त्यालाही प्रचंड मागणी असल्याचं पाहायला मिळतंय. बाजारात कितीही बाईक्स आल्या तरी स्प्लेंडर हीच लोकांची पहिली पसंती का बरं ठरते? चला जाणून घेऊया.

जाहिरातीची कमाल…

स्प्लेंडर ही लोकांची लाडकी बाईक ठरण्यामध्ये जाहिरातींचा वाटा फार मोठा आहे. हिरो आणि होंडा एकत्र येऊन बाईक बनवत असत, त्यावेळी स्प्लेंडर ही कशी सगळ्यांना पसंत पडणारी आणि सोयीची अशी बाईक आहे हे ठासून सांगणाऱ्या अनेक जाहिराती पाहायला मिळाल्या. यामुळे स्प्लेंडर घ्यायला हवी हे लोकांच्या मनावर पुरतं ठसलं. म्हणजेच स्प्लेंडरच्या आजच्या यशात होंडाचा सुद्धा मोठा वाटा आहे असं म्हणायला हवं. पहिले मॉडेल १९९४ साली लाँच करण्यात आलं होत.

 

splendor IM

 

हिरोने स्वबळावर जाहिराती सुरु केल्यानंतर ‘कल, आज और कल’, ‘हम में हैं हिरो’ अशा टॅगलाईन्सचा वापर करून स्प्लेंडरचा चाहता वर्ग वाढवण्यात त्यांना यश मिळत गेलं. स्प्लेंडर अनेकांची लाडकी ठरली. अर्थात याला आणखीही काही कारणं आहेतच.

ही कारणं सुद्धा महत्त्वाची…

१. खिशाला परवडणारी बाईक

वाढत्या महागाईच्या काळात स्वस्तात मस्त बाईक घेण्याकडे लोकांचा ओढा असेल तर त्यात काहीच शंका नाही. जवळपास ६० हजार रुपये किंमतीपासून सुरु होणारी ही बाईक सामन्यांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत मिळू शकते.

कमी किंमत हा स्प्लेंडरचा एक महत्त्वाचा मुद्दा नेहमीच राहिला आहे. त्यामुळेच कुठलाही मध्यमवर्गीय खरेदी करू शकेल अशी ही बाईक पहिल्या पसंतीची ठरली यात फारसं नवल नाही.

 

giving money im

 

२. इथला खर्च सुद्धा कमीच…

सध्या पेट्रोलच्या किंमतीने शंभरी पार केली असली, तरीही ‘इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या’ हे वाक्य सामान्य नागरिकांसाठी काही नवीन नाही. प्रत्येकवेळी पेट्रोलची वाढलेली किंमत ही खिशाला कात्री लावणारी असते.

 

petrol im

 

आजही स्प्लेंडर सारख्या बाइकचं मायलेज ८० किमी प्रतिलिटर इतकं अफलातून आहे. अगदी ‘एकदा पेट्रोल भरा आणि गावभर फिरा’ अशी नवी म्हण तयार झाली तर ती स्प्लेंडरसाठी चपखल बसणारी असेल. खिशाला परवडणाऱ्या बाईकचं हे मायलेज सुद्धा ग्राहकांना आकर्षित करणारं आहे.

३. दमदार शिलेदार

किंमतीच्या मानाने त्याबदल्यात मिळणारं इंजिन आणि त्याची पॉवर हा सुद्धा स्प्लेंडरचा प्लस पॉईंट ठरतो. फोर स्ट्रोक इंजिनसह उपलब्ध असणारी ही बाईक पॉवरच्या बाबतीत फार मागे पडत नाही.

 

splendor im 1

 

१०० सीसीचं दमदार इंजिन असणारी ही बाईक ७.९ बीएचपी इतकी पॉवर देते आणि ८.०५ इतक्या कमाल टॉर्कवर काम करू शकते. कमी किंमतीत लागणारी ही लॉटरीच आहे समजा ना!

४. सर्विसचं नो टेन्शन

हिरोचा पसारा भारतभर आहे हे काही तुम्हाला नव्याने सांगायला नको. त्यामुळे भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात असाल, तरी बिघडलेली स्प्लेंडर दुरुस्त करून देणारा गडी सापडणारच! याशिवाय स्पेअर पार्ट्सची आणि एकंदर मेंटेनन्सची किंमत सुद्धा तशी कमीच आहे. म्हणजे स्प्लेंडर इथेही पैसे वाचवते.

 

splendor im 4

 

५. दणकट आहे ना भाऊ…

उत्तम मायलेज आणि चांगलीशी पॉवर असणारी स्प्लेंडर बरीच दणकट सुद्धा आहे बरं! भारतीय रस्त्यांवर गाडी चालवायची म्हणजे शरीर आणि बाईक दोन्ही दणकटच हवं, नाही का? शहरातील मंडळी तर सोडा, गावातील ओबडधोबड रस्त्यांवर चालवण्यासाठी त्या भागातील मंडळी स्प्लेंडरची निवड करतात. मग तुम्हीच सांगा बाईक पहिल्या पसंतीची ठरेल की नाही.

 

६. स्टाईल में रहने का…

 

splendor im 2

कमी किंमतीत एकदम झकास दिसणाऱ्या बाईकच्या शोधात असाल, तर स्प्लेंडरपाशी येऊन थांबण्याची शक्यता अधिक आहे. इतर सगळ्या फायदेशीर बाबींच्या बरोबरीनेच ही बाईक लुकच्या बाबतीत सुद्धा कमी किंमतीत मिळणाऱ्या जवळपास सगळ्या बाईक्सपेक्षा उजवी ठरते. म्हणजे बाईकवर फिरताना तुम्हाला इतरांवर छाप पाडायची असेल, तर स्प्लेंडरसह ते शक्य आहे; तेसुद्धा खिशाला जास्त कात्री लागू न देता! तसेच काळानुसार बदल केले गेल्याने लोकांचे कायमच लक्ष वेधले गेले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?