' रेडिओ सायन्समध्ये महान शोध लावूनही जगदीशचंद्र बोस यांना नोबल का मिळालं नाही?

रेडिओ सायन्समध्ये महान शोध लावूनही जगदीशचंद्र बोस यांना नोबल का मिळालं नाही?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोणतंही संशोधन पूर्ण होण्यासाठी वैज्ञानिक व्यक्तीला प्रचंड वेळ आणि पैसे खर्च करावे लागतात. आपल्या ध्येयाने झपाटलेले हे लोक तहान, भूक विसरून आपलं पूर्ण लक्ष ध्येयावर केंद्रित करतात आणि अपेक्षित निकाल हाती लागेपर्यंत हार मानत नाहीत.

वैज्ञानिकांना मिळणारा पुरस्कार हा खरं तर त्यांच्या एकट्याचा नसतो, तो त्यांना संशोधनात मदत करणाऱ्या प्रत्येक सहकारी व्यक्तीचा असतो, त्यांच्या कुटुंबाचा असतो.

जगदीशचंद्र बोस हे असे शास्त्रज्ञ आहेत ज्यांना नोबेल पुरस्कार मिळावी अशी संपूर्ण विज्ञान जगताची इच्छा होती, पण ती इच्छा आजतागायत पूर्ण झालेली नाहीये.

भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्रात आयुष्यभर संशोधन केलेल्या या व्यक्तीला ‘फादर ऑफ रेडिओ सायन्स’ या नावाने ओळखलं जातं, पण तो आजही नोबेल किंवा भारतरत्न पुरस्कारांपासून वंचित आहे ही शोकांतिका आहे. कोणत्या संशोधनामुळे जगदीशचंद्र बोस यांना नोबेल पुरस्कारासाठी पात्र मानलं जातं? जाणून घेऊयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जगदीशचंद्र बोस यांचा जन्म ३० नोव्हेम्बर १८५८ रोजी मिमेनसिंग (सध्या बांगलादेशात आहे) इथे झाला होता. त्यांचे वडील भगवानचंद्र बोस हे सरकारी नोकरीत असिस्टंट कमिशनर म्हणून काम बघायचे. त्यासोबतच ते ब्राम्हो समाजाचे सदस्य होते.

प्राथमिक शिक्षण स्थानिक शिक्षण संस्थेतून पूर्ण केल्यानंतर जगदीशचंद्र बोस यांनी कलकत्ता येथील सेंट झेवीयर्स शाळेतून आपलं माध्यमिक शाळेचं शिक्षण पूर्ण केलं.

लहानपणापासूनच त्यांना बाग, झाड यांची खूप आवड होती. सेंट झेवीयर्स शाळेतील प्राध्यापक फादर लाफ्रंट यांनी जगदीशचंद्र बोस यांच्यातील ‘नॅचरल सायन्स’ची आवड लक्षात घेऊन त्यांना प्रोत्साहन दिलं. जगदीशचंद्र बोस हे कोलकत्ता विद्यापीठातून भौतिक शास्त्राचे पदवीधर झाले.

जगदीशचंद्र बोस यांना इंग्लंड येथे सिव्हिल सर्विसेस मध्ये करिअर करायची इच्छा होती, पण आपली निसर्ग विज्ञानाची आवड जोपासण्यासाठी त्यांनी पदव्युत्तर शिक्षण कॅम्ब्रिज विद्यापीठातून घेण्याचा निर्णय घेतला. भारतात परत आल्यानंतर ते कोलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेज मध्ये भौतीकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.

 

jagadish chandra bose im ]

 

जगदीशचंद्र बोस यांना या नोकरीत इंग्रजी अधिकाऱ्यांसोबत काम करावं लागल्याने वर्णभेदाचा त्रास सहन करावा लागला होता. त्यांचा पगार सुद्धा ब्रिटिश प्राध्यापकांपेक्षा कमी होता.

जगदीशचंद्र बोस यांनी तीन वर्ष पगार न घेऊन याबद्दल निषेध नोंदवला. कॉलेज प्रशासनाने याची दखल घेतली आणि त्यांना पर्मनंट केलं आणि त्यांना तीन वर्षाचा पगार देण्यात आला होता, पण त्यांनी नाराज न होता त्यांनी आपलं लक्ष केवळ विज्ञानावर केंद्रित केलं होतं.

रेडिओ लहरींवरील अभ्यास:

जगदीशचंद्र बोस यांनी रेडिओ लहरींवर संशोधन केलं होतं. त्यांनी ‘कोहेरर’ नावाचं एक यंत्र तयार केलं होतं ज्यामुळे रेडिओ लहरींचा तपशील देणं सहज शक्य होणार होतं.

१८९५ मध्ये जगदीशचंद्र बोस यांनी ‘पोलरायझेशन ऑफ इलेक्ट्रिक रेज् बाय डबल रिफ्लेक्टिंग क्रिस्टल्स’ या नावाने रेडिओ लहरींवर संशोधन सादर केलं होतं.

१८९६ मध्ये ‘रॉयल सोसायटी ऑफ लंडन’ने हे संशोधन प्रकाशित केलं होतं. जगदीशचंद्र बोस यांच्याकडून एक चूक झाली, की त्यांनी या संशोधनाचं, त्यांच्या प्रयोगांचं कोणतंही पेटंट तयार करून ठेवलं नव्हतं.

१८९७ मध्ये इटालियन शास्त्रज्ञ मार्कोनी यांनी वायरलेस टेलिग्राफी या विषयावर आपलं संशोधन सादर केलं होतं. हे संशोधन जगदीशचंद्र बोस यांच्या संशोधनासोबत तंतोतंत जुळणारं होतं. मार्कोनी या शास्त्रज्ञाने आपल्या संशोधनाचा १८९६ मध्ये पेटंट नोंद करून ठेवला होता.

 

jagadish chandra bose im 1

 

जगदीशचंद्र बोस यांच्या संशोधनाला धरून मार्कोनी यांनी आपलं संशोधन केलं होतं, पण कोणताही पेटंट नोंदणीकृत नसल्याने विज्ञान जगताने मार्कोनी यांना ‘रेडिओ लहरींचा जनक म्हणून मान्य केलं आणि या संशोधनासाठी त्यांना १९०९ मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

१८९६-९७ मध्ये मार्कोनी आणि जगदीशचंद्र बोस हे आपापल्या संशोधनासाठी लंडनमध्ये एकत्र कार्यरत होते. मार्कोनी हे तेव्हा ‘ब्रिटिश पोस्ट ऑफिस’साठी ‘वायरलेस कम्युनिकेशन’ या विषयावर संशोधन करत होते.

जगदीशचंद्र बोस हे तेव्हा लंडन मधील त्याच विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. अभ्यासात हुशार नसल्याने मार्कोनी हे जगदीशचंद्र बोस यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे. विद्यार्थी म्हणून जगदीशचंद्र बोस हे मार्कोनी यांचं कौतुक करायचे.

१८९९ मध्ये जगदीशचंद्र बोस यांनी रेडिओ लहरींवर ‘मर्क्युरी कोहरर विथ टेलिफोन डिटेक्टर’ या नावाने रॉयल सोसायटी ऑफ लंडनसाठी एक संशोधन पत्रक तयार केलं होतं, पण त्याची देखील चोरी करण्यात आली.

 

marconi im

 

मार्कोनी हा व्यवसायिक गोष्टींमध्ये अधिक हुशार होता. १९०१ मध्ये त्याने जगदीशचंद्र बोस यांच्या सर्व संशोधनाचं संकलन केलं आणि त्याने ते स्वतःचं संशोधन म्हणून सादर केलं. वैज्ञानिकांनी या माहितीचं स्वागत केलं आणि जगाने सर्वात पहिल्यांदा ‘वायरलेस कम्युनिकेशन’चा आनंद घेतला.

मार्कोनीने सादर केलेल्या संशोधनावर जगदीशचंद्र बोस यांनी १८८५ मध्येच काम केलं होतं. ५ ते २५ मिलिमीटर इतक्या अंतरात विनातार संवाद साधणं शक्य असलेलं एक छोटं अवजार त्यांनी तयार केलं होतं.

इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी या हवेसोबत प्रवास करू शकतात हे त्यांनी आधीच सिद्ध केलं होतं. आज वापरले जाणारे ‘रिमोट कंट्रोल’ हे याच प्रणालीवर काम करतात.

मार्कोनी याने जगदीशचंद्र बोस यांच्याकडून सर्व ज्ञानार्जन करूनही कधीच त्यांना याचं श्रेय दिलं नाही. रेडिओ लहरींवर सर्वात पहिला अभ्यास जगदीशचंद्र बोस यांनीच केला होता हे रॉयल सोसायटी ऑफ लंडनला सुद्धा माहीत होतं, पण अंतर्गत राजकारणामुळे त्यांनी ही माहिती कधीच समोर येऊ दिली नाही. या घटनेनंतर जगदीशचंद्र बोस हे पूर्ण वेळ निसर्ग विज्ञानाच्या अभ्यासात मग्न झाले.

निसर्ग विज्ञानात दिलेलं योगदान:

जगदीशचंद्र बोस यांची जगाला ओळख १९०१ मध्ये झाली जेव्हा त्यांनी रॉयल सोसायटी ऑफ लंडन इथे झाडांवर एक प्रयोग केला. या प्रयोगातून त्यांनी हे सिद्ध केलं की, झाड सुद्धा माणसासारखे विचार करतात. झाडांना सुद्धा भावना असतात.

त्यांनी विषारी ब्रोमाईड सोल्युशनच्या एका भांड्यात एका झाडाला ठेवले. मोठ्या स्क्रीन वर त्यांनी हे दाखवलं की, विषारी सोल्युशन आहे हे कळल्यावर झाड कसे react करतात आणि स्वतःला वाचवण्यासाठी कशी धडपड करतात. झाडांचा प्रयत्न असफल होतो आणि मगच ते जीव सोडतात.

झाड सुद्धा कोणत्याही प्राण्याप्रमाणे विचार करतात हे त्यांनी या प्रयोगातून सिद्ध केलं. त्यांच्या इन्स्ट्रुमेंट ला त्यांनी क्रेस्कोग्राफ हे नाव दिलं. या यंत्राच्या आधारे त्यांनी बरेच प्रयोग केले.

जगदीशचंद्र बोस यांनी ‘रिस्पॉन्स इन द लिविंग अँड नॉन लिविंग’ आणि ‘द नर्व्हस मेकॅनिझम ऑफ प्लॅन्टस्’ हे पुस्तकं देखील लिहिली आहेत.

१९१७ मध्ये जगदीशचंद्र बोस यांनी बोस इन्स्टिट्यूट ची स्थापना केली. झाडांवर रिसर्च करण्यासाठी त्यांनी या इन्स्टिट्यूट ची स्थापना केली. या इन्स्टियुट मध्ये त्यांनी तयार केलेले सर्व आधुनिक उपकरणं जतन करून ठेवण्यात आले आहेत.

कार्याचा गौरव:

 

jagadish chandra bose im 3

 

– १९०३ मध्ये विज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी ब्रिटिश सरकार ने जगदीशचंद्र बोस यांना ‘कंपॅनियन ऑफ इंडियन एम्पायर’ या पुरस्काराने पुरस्कृत केलं होतं.

– १९१२ मध्ये त्यांना ‘कंपॅनियन ऑफ स्टार ऑफ इंडिया’ या पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आलं.

१९२० मध्ये त्यांना ‘फेलो मेंबर ऑफ रॉयल सोसायटी’ म्हणून निवडण्यात आलं.

– १९७७ मध्ये सर नेव्हिल मॉट यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला तेव्हा नेव्हिल मॉट यांनी “जगदीशचंद्र बोस हे काळाच्या ६० वर्ष पुढे होते. त्यांनी एन-टाईप आणि पी-टाईप सेमिकंडक्टर चा भविष्यातील वापर आधीच शोधून काढला होता.”

– जगदीशचंद्र बोस यांच्या नावाने ‘द आचार्य जगदीशचंद्र बोस इंडियन बॉटनिकल गार्डन’ची कोलकत्ता येथील हावडा येथे बांधकाम करण्यात आलं आहे.

– जगदीशचंद्र बोस यांचं नाव हे चंद्रावरील एका खड्ड्याला देण्यात आलं आहे. ही जागा डॉक्टर भाभा यांचं नाव दिलेल्या क्रेटरच्या शेजारी आहे. या क्रेटर चा परीघ हा ९१ किलोमीटर इतका आहे.

२३ नोव्हेम्बर १९३७ रोजी झारखंड येथील गिरीदी इथे जगदीशचंद्र बोस यांचं निधन झालं. जगदीशचंद्र बोस यांनी विज्ञान क्षेत्रासाठी आपलं आयुष्य दिलं. विज्ञान जगतातील सर्व प्रतिष्ठित पुरस्कार मिळूनही त्यांना नोबेल पुरस्कार मिळू शकलं नाही हे एक आश्चर्य आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?