' ना धड स्त्री, ना धड पुरुष! हे "प्रकरण" काहीतरी भलतंच आहे...!

ना धड स्त्री, ना धड पुरुष! हे “प्रकरण” काहीतरी भलतंच आहे…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सोनम कपूरच्या डोहाळेजेवणाचे फोटो मिडीयावर व्हायरल झाले आहेत. गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेल्या सोनम कपूरच्या शेजारी एक माणूस उभा आहे. तो अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेणारा ठरला आहे. म्हणजे उत्सवमूर्ती सोनम बाजूला राहिली आणि शेजारचा माणूस जो धड स्त्री नाही आणि पुरुषही वाटत नाही तोच जास्त प्रसिद्ध झाला आहे. कोण आहे तो? त्याचं नांव आहे लिओ कल्याण.

आपल्यकडे सेलिब्रिटी लोकांची प्रत्येक गोष्ट वेगळी असते. त्यांच्या प्रेम कहाण्या, ब्रेक अप, लग्न, सतत ऑन स्क्रीन मिरवणं, फॅशन हे सारे काही आपल्यासाठी अपूर्वाईचे असते. अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर ही तिच्या सिनेमापेक्षा फॅशनमुळे सतत प्रकाशात होती.

दिल्ली ६ हा तिचा चित्रपट मसक्कली, आणि ससुराल गेंदा फुल गाण्याने लक्षात राहिली. त्या गण्यात वेस्टर्न कपडे घातलेली आणि रेल्वे स्टेशनवर हेडफोन लावून नाचत जाणारी सोनम लक्षात राहिली. पण तिची चित्रपटामधील कारकीर्द फारशी लक्षणीय नव्हती.

 

lio im 1

 

लंडनमधील उद्योगपती आनंद आहुजा याच्याशी लग्नगाठ बांधून तिकडेच ती स्थायिक झाली. आता सोनमकडे नव्या पाहुण्याची चाहूल आहे. नुकतेच तिचे डोहाळेजेवण झाले. त्यांचे डोहाळेजेवण आपण एकदम स्टायलिश.

गुलाबी रंगाचा आऊटफिट घातलेली सोनम खरोखर सुंदर दिसत होती. आणि तिच्या शेजारी एक विचित्र माणूस उभा होता. दाढी मिशा असलेल्या या माणसाने टाईट फिट बॉडीकॉन वन पीस घातला होता. त्यामुळे नेटकऱ्याना प्रश्न पडला हा कोण आहे? त्याच्या कपड्यावरून त्याला ट्रोल पण केलं जात आहे. डोहाळेजेवणाला असले कपडे घालून कुणी जातं का? कुणाला तो करण जोहर वाटला तर कुणी त्याला रणबीरसिंग समजलं पण त्याचं नांव आहे लिओ कल्याण.

 

ranvir singh ponytail inmarathi

 

कोण आहे लिओ कल्याण?

लिओ कल्याणने लाईव्ह परफॉरमन्स दिला. त्याने आपल्या आवाजात गाणी म्हणून पाहुणे मंडळींची मने जिंकून घेतली. लिओ कल्याणला खास आमंत्रण दिले होते या कार्यक्रमासाठी. लिओ हा ब्रिटीश पाकिस्तानी गायक आहे. शिवाय तो गीतकार, संगीतकार आणि मॉडेल पण आहे त्याहीपेक्षा वेगळी बाब अशी की तो स्वतःला समलैंगिक मुस्लीम संगीतकार म्हणूनच पेश करतो. पण आपल्या आवाजाने लोकांना मंत्रमुग्ध करणारा गायक अशीच त्याची ओळख आहे. आयुष्यातील २० वर्षांपर्यंत लिओ लंडनमध्ये रहात होता.

कदाचित त्यामुळेच त्याच्यात हा मोकळेपणा आलेला आहे. आपण जसे आहोत तसे लोकांसमोर सदर करणे ही गोष्ट साधी नसते आणि सोपी तर त्याहून नसते. पण सर्वांसमोर आपण गे असल्याची कबुली देणारा कदाचित लिओ हा पहिलाच कलाकार आहे. त्याचं वय, जन्मतारीख याची नोंद कुठेही सापडत नाही. त्याने पदवीपर्यंतशिक्षण घेतलं आहे.

 

leo im 1

KK…आमची पिढी घडवून असं निघून जायला नको होतंस…!

शेवटच्या क्षणापर्यंत कलेची साधना करता यावी म्हणून टोकाचा निर्णय घेणाऱ्या नृत्यांगनेची कहाणी!

वयाच्या १३ व्या वर्षापासून लिओ गातो. पण त्याच्या घरच्या लोकांना हे फारसे पसंत नव्हते. त्यामुळे त्यांना न सांगताच लिओ गाणी गायचा. २०१३ साली लंडनमधील ड्रीमी पॉप बँडमधला तो कलाकार होता. तसेच २०१९ मध्ये लंडन फॅशन वीक मध्ये त्याने मॉडेलिंग पण केलेले आहे. त्याला भारतीय शास्त्रीय संगीतात पण रुची आहे.

बरीच बॉलीवूडमधील गाणी त्याने गाऊन आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट केली आहेत. आणि त्याचे करोडो फॉलोअर्स आहेत. एकट्या इन्स्टाग्रामवर त्याचे ८५ हजार फॉलोअर्स आहेत. तो पौर्वात्य आणि पाश्चिमात्य संगीताचा मिलाफ करून गाणी गातो आणि तो ब्लेंड लोकांना खूप आवडतो.

असं काही पाहिलं की एक गोष्ट लक्षात येते कोणाचं शक्तिस्थळ काय असेल आणि कमकुवत दुवा काय असेल हे सांगणे कठीण असते. लिओचा आवाज हे त्याचं शक्तिस्थळ आहे, पण त्याची लैंगिकता ही त्याची कमकुवत बाजू आहे. काही असो ती त्याने खुलेपणाने मांडली स्वीकारली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?