' अंगावर उल्का पडूनही सहीसलामत वाचणारी जगातली एकमेव महिला

अंगावर उल्का पडूनही सहीसलामत वाचणारी जगातली एकमेव महिला

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ॲन होजे हे नाव इतिहासात एका विचित्र कारणासाठी नोंदविलं गेलं आहे. तुटता तारा किंवा उल्का मार्‍यातून सहिसलामत वाचलेली एकमेव व्यक्ती आजवरच्या इतिहासात नोंद आहे आणि तिचं नाव आहे ॲन होजे.

दुपारी वामकुक्षी घेत पहुडलेल्या आयुष्यातली ती दुपार ऐतिहासिक ठरणार होती हे खुद्द ॲनलाही डोळे मिटताना माहित नव्हतं. असं काय घडलं त्या दुपारी?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपण सगळेचजण लहानपणापासून एक कवीकल्पना जगत आलो आहोत. आकाशातून तुटणारा तारा दिसला तर त्याच्याकडे आपल्या मनातली इच्छा सांगितली असता ती पूर्ण होते, ही ती कवीकल्पना.

अर्थात याला कसलाही शास्त्रीय आधार नाही, मात्र तुटता तारा जमिनीवर कोसळतो आणि कसलीही काव्यमय स्थिती नाही तर थेट हाहाकार माजवतो याला मात्र शास्त्रीय आधार आहे. अशा उल्का प्रपातातून कोणी जिवंत राहिल याची शक्यता अगदी दूर्लभ आहे.

सिलिकागा येथील अलबेना गावातील ३० नोव्हेंबर १९५४ ची ती नेहमीचीच दुपार होती. दुपारचे साधारण घड्याळात पाऊण वाजले होते. याच शहरात रहाणारी ॲन एलिझाबेथ फ़्लोवर होजे ही गृहिणी त्या दिवशी तब्येत थोडी नरम गरम असल्यानं, घरकामं आटपून थोडावेळ विश्रांतीसाठी म्हणून सोफ्यावर पहुडली होती.

खरंतर हेही नेहमीचंच चित्र. बहुतेअकजणी घरकामं आवरल्यावर एखादी छोटी डुलकी घेऊन विश्रांती घेत असत. आज मात्र ॲनला झोपेतून जाग आणणारी जी घटना घडली तिनं आधुनिक इतिहासात नोंद केली.

झोपेपर्यंत एक सामान्य गृहिणी असणारी ॲन जाग आल्यावर जगभरात चर्चेचा आणि इतिहासात नोंद ठेवली जाणारी व्यक्ती बनली. तिचं अवघं आयुष्य या दुपारनं बदलवून टाकलं. ती घरात झोपली असतानाच बाहेर तिची गाढ झोप लागलेली असताना बाहेर सगळं शहर मात्र एक कधीही न पाहिलेली अजब गोष्ट आकाशात बघत होतं.

त्या दुपारी अचानक आकाशात मातकट रंगाचा एक मोठा ढग आणि पाठोपाठ अग्नी लोळा सारखं काहीतरी जमिनीकडे झेपावताना दिसत होतं.

नेमकं काय चाललं आहे हेच लोकांना समजत नव्हतं. बघणार्‍यांचा असा समज झाला की आकाशातून जाणारं एखादं विमान दुर्घटनाग्रस्त होऊन त्याचा एखादा भाग जमिनीवर कोसळत आहे. मात्र प्रत्यक्षात त्या वेळेस आकाशातून कोणतंही विमान चाललेलं नव्हतं की कोणत्याही विमानाचा अपघात झालेला नव्हता. एक जगावेगळी घटना घडत होती.

बाहेर हे घडत असताना अचानक त्यांना दिसलं की सोफ्यावर पहुडलेली ॲन जागी झालेली होती, मात्र वेदनेनं विव्हळत तशीच झोपून राहिली होती. मदतीसाठी सगळे ॲनच्या घरात धावले. त्यांना दिसलं की ॲन वेदनेत विव्हळत होती आणि जमिनीवर फ़णसाच्या आकाराचा एक काळ्या रंगाचं काहीतरी दगडासारखं दिसणारं होतं.

 

ulka im

 

हा दगड इथे कसा आला हे पहातानाच त्यांच्या लक्षात आलं की तो छत तोडून खाली पडला आणि पडताना त्यानं घरातल्या वस्तूंची अक्षरश: नासधूस केली आहे.

घरात अचानक नेमकं काय घडलं आहे हेच कळायला मार्ग नव्हता. एकिकडे ॲननं पोलिसांना फोन केला आणि तिच्या नवर्‍यानं तोपर्यंत हॉस्पिटलला फोन करून मदत मागितली होती. सुदैवानं ॲनला फारशी दुखापत झालेली नसली तरिही ती प्रचंड घाबरलेली होती.

घटना घडल्यानंतर काही मिनिटांत पोलिस, ॲम्ब्युलन्स आणि जवळच असणार्‍या जिऑलॉजी सेंटरमधून काही अधिकारी घटनस्थाळावर पोहोचले.

पोलिस आणि ॲम्ब्य्लन्सचं ठीक होतं मात्र जिओलॉजी सेंटरचे अधिकारी का आले असावेत? असा उपस्थितांना प्रश्न पडला आणि मग त्या अधिकार्‍यांकडून हा उल्का कोसळण्याचा प्रकार असल्याचं कळलं. पुढील तपासणी करण्यासाठी ते दगड घेऊन गेले.

हॉस्पिटलमधे ॲनची तपासणी केल्यावर तिला पोटाला भाजण्याखेरीज फ़ारशी गंभीर इजा झाली नसल्याचं तसेच तिच्या जीवाला कसलाही धोका नसल्याचं डॉक्टरनी सांगितलं. मात्र या घटनेनंतर ॲन रातोरात सेलिब्रेटी बनली.

अशा प्रकारची घटना आणि त्यातून वाचलेली ती एकमेव ज्ञात व्यक्ती होती. ॲनच्या मुलाखती घ्यायला अक्षरश: जगभरातून माध्यमांचे प्रतिनिधी येऊ लागले होते.

आजवर शांत आयुष्य जगणार्‍या ॲनचं घर अचानक अपरिचित चेहर्‍यांनी गजबजून गेलं होतं. एक सामान्य गृहिणी असणार्‍या ॲनला ही प्रसिध्दी नकोशी झाली. सततच्या मुलाखतिंनी हैराण झालेल्या ॲनची आता चिडचिड होऊ लागली होती.

दुसरीकडे ॲनच्या घरात सापडलेल्या दगडाची चौकशी चाली झाली. एक शंका अशी होती की कदाचित हा हवाई हल्ला असू शकतो. मात्र चौकशीअंती हा दगड म्हणजे उल्का असल्याचं निश्चित झालं.

 

ulka im1

 

आकाशातून पडलेल्या या दगडालाही बातम्यांचं वलय मिळालं. या दगडाचं पुढे काय करायचं? याची जोरदार चर्चा चालू झाली. ॲनच्यामते तिच्या घरात पडलेला आणि तिला इजा केलेला त दगड असल्यानं तो तिच्याच मालकीचा होता तर अनेकांच्या मते तो राष्ट्रीय संपत्ती होता.

माध्यमांनी मात्र ॲनची बाजू लावून धरत या दगडावर तिची मालकी असावी असं मत दिलं. अखेर घटना घडल्यानंतर वर्षानंतर हा दगड स्वगृही म्हणजे ॲनच्या घरी परतला. ॲनला तो दगड विकायचा होता, मात्र त्याच्यातल रस संपलेला असल्यानं त्याला कोणी विकत घेणं शक्य नव्हतं.

अखेरीस ॲननं हा दगड अलबेना वस्तूसंग्रहालयाला फुकट देऊन टाकला. आजही हा दगड त्याठिकाणी आहे.

या दगडानं ॲनच्या आयुष्यात मात्र खूप उलथापालथ झाली, आधी तिला अचानक मिळणार्‍या प्रसिध्दीचा त्रास झाला आणि नंतर लोकांचा या विषयातला रस संपल्यानंतर त्यांनी ॲनकडे दूर्लक्ष केल्यावर हा प्रसिध्दीचा झोत गेला त्याचाही त्रास झाला आणि ती मनोरुग्न बनली.

उपचारानंतर बरी झाली मात्र नवर्‍याशी खटके उडतच राहिले आणि घटस्फ़ोट झाला. तिचं मनस्वास्थ्य पूर्ववत झालं नाहीच, पण नंतर किडन्याही निकामी झाल्या. अखेरची काही वर्षं तिनं नर्सिंग होममधेच काढली आणि वयाच्या ५२ व्या वर्षी तिनं जगाचा निरोप घेतला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?