' मर्द असशील तर "करशीलच" - अश्लील मित्रांना तरुणाचं बाणेदार उत्तर

मर्द असशील तर “करशीलच” – अश्लील मित्रांना तरुणाचं बाणेदार उत्तर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तरुण वयात मित्रमंडळी निवडताना ती आपल्यासाठी योग्य आहेत, की नाहीत हे बऱ्याचदा लक्षात येत नाही. त्या वयात आपल्यावर कळत नकळत फार जणांचा प्रभाव होत असतो. आपल्या चांगल्या-वाईट मित्रांचाही आपल्यावर असाच प्रभाव असतो.

आपल्याला त्यावेळी फारसे अनुभव न आल्यामुळे आपण परिपक्व झालेले नसतो. अशा वेळी हे मित्र आपल्याला वाईट गोष्टींच्या आहारी लावू शकतात. अमुक अमुक गोष्टी केल्या म्हणजेच आपण कुल, नाहीतर नाही असा एक समज मित्र मनात निर्माण करतात.

एखादा सरळमार्गी मित्र असेल आणि तो पार्टीत दारू प्यायला नाही तर त्याला वाळीत टाकलं जातं. अशाने मुलांचा आत्मविश्वास खचतो, स्वतःबद्दलचे नकोनकोसे न्यूनगंड मुलांच्या मनात दीर्घकाळ घर करतात.

 

friends get together InMarathi

 

अशा वेळी आपल्याला जे योग्य वाटतं त्यावर ठाम राहून अशा मित्रांना दाद न देणं सगळ्यांना जमतच असं नाही. पण कणखर राहून स्वतःसाठी योग्य निर्णय घेऊ शकणारी मुलं त्यांच्यासारख्या अनुभवांतून जाणाऱ्या अनेकांना प्रेरणा देऊ शकतात.

कौस्तुभ नावाच्या एका तरुणाला त्याच्या मित्रांचा असाच एक विचित्र अनुभव आला. तो त्या सगळ्या अनुभवाने काहीसा घाबरला. पण मित्रांच्या गलिच्छ वर्तनावर त्याने दिलेलं बाणेदार उत्तर वाचून कुणालाही त्याचं कौतुक वाटेल. आपला हा अनुभव कौस्तुभने कोरावर सविस्तरपणे मांडला आहे.
त्याच्याच शब्दांत त्याचा अनुभव वाचू.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मी पुण्यात मित्रां कडे गेलो होतो भेटायला, काही मित्र होते कमलेश, आनंद, अभिलाष वगैरे वगैरे.

मला थोडा अंदाज होता कि ह्यातल्या काहींना वेश्यागमनाचा नाद आहे, पण मी सहसा त्यांना या गोष्टीबद्दल विचारायच टाळायचो. काय नेम नव्हता कि काय वाटेल ह्यांना कि मला त्यात रस आहे वगैरे.

(मी असं म्हणत नाही कि त्यात काही चूक आहे. ज्याचा-त्याचा दृष्टिकोन आहे). पण माझं लग्न खूप लवकर झाल्या मुळे मला असल्या सोयी बघत बसण्याची गरज पडलेली नाही, मी माझ्या वैवाहिक जीवनात खूपच सुखी आहे. आणि वेश्यागमन वगैरे मुळातच मला घाण वाटतं.

शनिवारी रात्री जेवलो वगैरे आणि साधारणपणे ९.३० वाजता कमल्या म्हणाला कि चला जरा चक्कर टाकून येऊया. आम्ही होतो पिंपरीत. म्हंटल चला पान वगैरे खाऊन यायचं आणि गप्पा मारत बसायचं. रात्री उशिरा झोपायचं वगैरे. बऱ्याच दिवसात कंपू जमला होता. मग निघालो. मला काय माहिती ह्यांचं काय गणित आहे.

शिवाजीनगरला पोचून उजवं वळण घेतल्यावर मी विचारलं, की अरे एवढ्या लांब कशाला आलोय आपण? तर म्हणे पार्टी करायला. मी सारखं विचारतोय पण नुसते हसायला लागले. मग कोर्पोरेशन पूल आला आणि मग दगडूशेठ गणपती.

जवळपास ११.३० वाजून गेलेले. मी बोललो कि ही दगडूशेठ गणपतीला जायची वेळ आहे काय कमल्या, खरं सांग कशाला घेऊन आलाय मला इकडं? तर हसायला लागले आणि त्यांनी बाईक बुधवार पेठेच्या आत घेतल्या आणि कुठल्या कुठल्या बोळात घेतल्या कुणाला माहिती. मी बोललो की गाडी थांबव मला बाहेर जायचं आहे तर अजूनच चेकाळले. मग गाड्या कुठल्या तरी जुनाट वाड्या समोर आणून उभ्या केल्या आणि मला म्हणाले की इथं पार्टी आहे चाल.

त्या बायका वगैरे बघूनच मला कळलं की काय प्रयोजन आहे. मी म्हणालो कि मी जातो मला गाडी ची किल्ली दे. तर म्हणाले की तू जर आत्ता बसला नाहीस तर तुझं तू जायचं पिंपरी ला. आम्ही नेणार नाही. विचार करून सांग आणि हे गेले पण आत.

 

prostitution-brothel-girls-in-india InMarathi

 

 

आयला म्हटलं, कि काय बुद्धी सुचली आणि आलो ह्यांच्या बरोबर. अडचण ही नव्हती कि मला तिथे थांबायला लागणार होत. मी रस्त्यातच थांबलो असतो कारण पर्यायच नव्हता. अडचण हि होती कि मला कोणी पोलिसाने पकडून नेलं आणि घरात कळलं तर विनाकारण अब्रूचा पंचनामा आणि मला घरच्या सगळ्यांची तोंडं दिसायला लागली कि ते मला कसे अपमानास्पद नजरेनं बघत आहेत.

तेवढ्यात एक एक बायका येऊन विचारायला लागल्या की, येणार काय? २०० दे मग १०० दे वगैरे वगैरे. एक बाई होती ती सरळ अंगावरून हात फिरवायला लागली. तिने सरळ माझ्या जीन्सच्या मागच्या कप्प्यात हात घालून पाकीट काढून घ्यायला लागली. नशीब १००-२०० च होते त्यात.

मी ते हिसकावून घेतलं आणि मी तिला म्हणालो कि, “मेरेको नई आना, तू जा ना “. तर मला म्हणते की, “फिर क्या उखडने को आया क्या इंदर तुम? तू भाग पैले”. शेवटी काहीही ना विचार करता परत निघालो. म्हटलं, की त्या सगळ्यांना जाऊ दे तेल लावत, पण खरंच सांगतो फार बेकार वाटत होतं…विनाकारण अपराधी असल्याची भावना. जवळपास १० मिनिटांनी मी दगडूशेठ च्या रस्त्यावर पोचलो कारण दोन वेळा कुठे दुसऱ्याच बोळात पोचलो.

चालत चालत मी शनिवार वाड्याच्या एन्ट्री गेट पोचलो आणि मी आंद्या ला फोन केला तर तो पण पुन्हा तेच बोलला कि, “बसलास तरच घेऊन जाणार तुला, नाहीतर तुझं तू जा. आणि तू आज आला नाहीस तर तू मर्द नाहीस लक्षात ठेव.” आणि हसायला लागला आणि एक बाई पण जोरात हसत होती.

 

red light area im1

 

त्यानं हे बोलल्यावरती माझं डोकंच फिरलं. मी पण त्याला म्हणालो की, “आंद्या तुला जर बघायचाच असेल ना, की मी मर्द आहे की नाही तर तुझ्या बहिणीला पाठव माझ्याकडे. ती सांगेल बघ तुला मी मर्द आहे कि कोण आहे ते” आणि फोन कट केला.

तसाच तडक चालत कोर्पोरेशन बस स्टॉपला चालत निघालो. रिक्षावाले २-३ भेटले. त्यांना विचारलं कि मला पिंपरीला जायचंय, तर भाडं ८०० रुपये वगैरे म्हंजे चड्डीवरतीच यायचं काम. या सगळ्या वेळात त्यांचे बरेच कॉल आले पण मी उचलले नाहीत.

सरळ बस स्टॉप वरती जाऊन बसलो आणि तिथेच झोपलो. सकाळी ६ ची पहिली बस पकडली आणि पिंपरी ला गेलो. खोलीवरती गेलो, प्रातर्विधी आवरले, हात पाय तोन्ड धुतलं. सॅक पाठीला लावली आणि निघालो. आंद्याच आलेला दरवाजा उघडायला.

मला म्हणाला कि अरे थांब, जे झालं ते फार सिरियसली घेऊ नकोस. मी फ्रेश होतो, आपण चहा घेऊया चल. त्याला म्हणालो कि माझा नंबर उडवून टाकायचा आणि इथून पुढं तुमचा माझा संबंध नाही.

त्या सगळ्या मित्रांच्या नावाने मी अंघोळ केली त्यानंतर. कारण माझं सोडा ओ, मी तेव्हा फक्त २५ चा असेन, पण माझ्या बाबानी संपूर्ण हयातभर ताठ मानेने राहिले असताना निदान असल्या वल्गर कारणामुळे त्यांची मान खाली जायला नको.

तुम्हालाही असे अनुभव आले असतील तर आम्हाला नक्की कळवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?