' सावधान! जिभेचे चोचले पुरवणारे मोमोज तुमच्याच जीवावर बेतू शकतात…! – InMarathi

सावधान! जिभेचे चोचले पुरवणारे मोमोज तुमच्याच जीवावर बेतू शकतात…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मोमोज आवडीने खाता आहात? त्याची चव खूप आवडते? पण जरा सांभाळून. कारण नुकतेच दिल्लीमध्ये एका माणसाने या मोमोजच्या पायी आपले प्राण गमावले आहेत. मोमोज हे नव्या पिढीतील मुला-मुलींचे आवडणारे फास्ट फूड. रस्त्याच्या कडेला मोमोज विकणारा माणूस बसलेला असतो. त्याच्याकडे ओव्हनमध्ये वाफवलेले मोमोज मांडून ठेवलेले असतात.

मसालेदार चटणी बरोबर त्याची चटपटीत चव स्वाद वाढवते आणि बघता बघता त्याच्याकडचे मोमोज संपून जातात. मैद्यापासून बनवल्या जाणाऱ्या मोमोजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टफिंग म्हणजे ज्याला आपण सारण म्हणतो ते भरलेले असते. ते व्हेज नॉनव्हेज ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असते.

अतिशय स्वस्त असलेले हे स्ट्रीट फूड आहे. उत्तर भारत, नेपाळ, तिबेट या भागात या मोमोजनी चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. आशियातील स्वस्त स्ट्रीट फूड अशी या मोमोजची ख्याती आहे.

२० रुपयात ४-६ मोमोजची डिश मिळते. त्याच्यासोबत सॉस, चटणी याने तर त्याला अजून जरा चव येते. काही लोक तर मोमोज आठवड्यातून तीन चार वेळा पण खातात. पण त्याचे दुष्परिणाम माहिती आहेत का? नसतील तर हे वाचा.

 

momos im 1

 

मोमोज तब्येतीसाठी अजिबात चांगले नसतात. एक तर रस्त्यावरचे अन्न तयार करताना त्यात स्वच्छतेची म्हणावी तशी काळजी घेतलेली नसते. वापरलेले समान हे चंगल्या दर्जाचे सतेच असे नाही. त्यामुळे आवड म्हणून वारंवार मोमोज खाल्ले तर त्याचे दुष्परिणाम चांगलेच जाणवू लागतात. मोमोजची वरची पारी ही मैद्यापासून बनवलेली असते. आणि मैदा स्वादुपिंड हळूहळू निकामी करतो. त्यामुळे इन्सुलिन निर्मितीची क्षमता कमी होते.

आता हा दिल्लीमधील माणूस कशामुळे गेला बघा.. मोमोज मैद्यापासून बनवलेले असतात. त्यामुळे ते गुळगुळीत असतात. थोडासाही रवाळपणा त्यात नसतो, त्यामुळे ते खाताना तोंडातील लाळ मिसळून जास्तच गुळगुळीत होऊन खाता खाता श्वासनलिकेत गेले आणि गुदमरून त्याचा मृत्यू झाला. मेडिकलच्या भाषेत न्युरोजेनिक कार्डीअॅक अरेस्ट होऊन तो मरण पावला.

एम्स या संस्थेने एक महत्वाचा सल्ला दिला आहे. शक्यतो मोमोज खाऊ नयेत. कारण ते गिळताना श्वास नलिकेत जाऊन गुदमरून जीव जाण्याची शक्यता असते.

मोमोज खाणे का टाळावे-

१) मोमोजमध्ये जे स्टफिंग म्हणून भाज्या, चिकन, वापरले जातात ते चांगल्या दर्जाचे असतात असे नाही. २० रुपयामध्ये तुम्हाला ४-६ मोमोज देतात त्या मालाचा दर्जा कसा असेल याचा विचार करा. ताजे चिकन, भाज्या या इतक्या कमी दारात मिळत असतील का? जास्त वेळ बाहेर ठेवल्यामुळे त्या खराब होतात. आणि अशा निकृष्ट प्रतीच्या अन्नामुळे तुमच्या तब्येतीवर परिणाम हा होतोच.

२) मोमोजसोबत दिली जाणारी चटणी ही चांगल्या दर्जाच्या मिरच्या वापरून केलेली नसते. स्वस्तात मिळणाऱ्या मिरच्या किंवा तशीच मिरची पूड वापरलेली असते. अशा निकृष्ट दर्जाच्या चटणीमुळे मूळव्याध होण्याचा धोका असतो.

 

momos im 2

 

३) स्वाद वाढावा म्हणून मोमोज बनवताना त्यात मोनो सोडियम ग्लूटामेट मिसळतात. सोडियम ग्लूटामेट हे क्रिस्टल पावडरीसारखे असते. त्यामुळे केवळ जाडीच वाढते असे नाही तर मज्जातंतूचे विकार, अॅसिडीटी होणं, घाम येणं, हृदयाचे ठोके वाढणं असे वेगवेगळे धोके संभवतात.

४) मोमोजमध्ये कोबीचं स्टफिंग पण भरतात.हा कोबी जर नीट शिजवला नाही तर त्यात असलेले टॅपवर्म या कृमीचा प्रादुर्भाव होऊन त्याचा परिणाम आतडी आणि मेंदूवर करतात.

५) मोमोज मैद्यापासून बनवतात. हा मैदा धान्यातील तंतुमय भाग गेल्यानंतर राहिलेला जो भाग असतो त्यातील उरलेला पिष्टमय भाग असतो. तो पांढरा शुभ्र दिसावा म्हणून त्यात केमिकल ब्लीच मिसळले जाते. शिवाय त्यात एलोक्सन हे केमिकल असल्याचा दावा पण तज्ज्ञ करतात. हे एलोक्सन मैदा मऊ राखते. पण हे केमिकल स्वादुपिंडावर दुष्परिणाम करते. आणि लहान वयात मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

 

momos im 3

हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी हे घरगुती खाद्यपदार्थ १०० % टक्के उपयोगी पडतील!

हे साधे-सोप्पे घरगुती उपाय ऍसिडिटीपासून कायमची मुक्ती देतात, माहित आहेत ना?

थोडक्यात तुम्ही जर आपल्या आहाराबाबत जागरूक असाल आणि अगदी व्यवस्थित आहार घेत असाल, कर्बोदके, तंतुमय पदार्थ वगैरे अगदी व्यवस्थित घेत असाल तर एखादा दिवस बदल म्हणून मोमोज खाऊ शकता पण जर आठवड्यात तीन तीन दिवस जर तुम्ही मोमोज खात असाल तर थांबा. खूपच आवडत असतील तर घरी बनवा आणि मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरा. ताज्या भाज्या वापरा. कारण शेवटी जान है तो जहान है..

===

 

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?