' ८० च्या दशकात बहुतांश सिनेमांमध्ये दिसणारा राज किरण अजूनही बेपत्ता आहे!

८० च्या दशकात बहुतांश सिनेमांमध्ये दिसणारा राज किरण अजूनही बेपत्ता आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

फिल्मी जग असं जग आहे, इथे जोवर तुम्ही प्रकाश झोतात असता, तुमच्याकडे काम असतं तोवर तुम्हाला ढीगानं मित्र मैत्रीणी असतात, पत्रकार तुमच्या मागेपुढे करतात, खुशमस्कर्‍यांची तर या दुनियेत कमतरताच नाही. मात्र एकदा का प्रकाश झोत तुमच्यावरुन गेला की, तुम्हाला इथे कोणी कुत्रंही विचारत नाही.

यहां कोई किसीका सगा नहीं होता, हे या जगाचं नागडं सत्य आहे. या सत्यानं, इथल्या क्रूर सिस्टिमने अनेकांचे घास घेतले आहेत. ऐंशीच्या दशकातलं एक असंच नाव, राजकिरण. इथल्या जगानं डोक्यावर बसवून नंतर फेकून दिलेलं आणि आज गुमनामीच्या काळोखात हरवलेलं!

 

raj kiran IM

 

ऐंशीच्या दशकातल्या हिंदी सिनेमांत हमखास दिसणारा एक चेहरा, देखणा, गोरागोमटा अभिनयात बरा असा हा अभिनेता बहुतेक चित्रपटातून सहाय्यक भूमिकांत दिसला. कालांतरानं शेखर सुमनच्या मालिकेतही दिसला मात्र त्यानंतर कधीतरी तो या झगमगत्या दुनियेतून नाहिसा झाला तो कायमचाच.

पत्रकारांना, माध्यमांना त्याच्या नसण्याची दखल घ्यावी वाटली नाही, कारण त्याच्या नावाला ग्लॅमर असलं तरिही तो नसण्यानं त्यांच्या चटपटीत गॉसिप कॉलम्सचं काहीही नुकसान होत नव्हतं. या दुनियेत कोणी कोणाचा मित्र नसतो हे खरं असलं तरिही अशी काही मोजकी माणसंही होती/आहेत ज्यांना माणसाची किंमत आहे. ज्यांच्या लेखी, पैसा यश यापुढे जात माणूस आणि माणुसकी महत्वाची आहे.

इंडस्ट्रीत मिस्टर सनकी म्हणून परिचित असणार्‍या दिवंगत ऋषी कपूरचा मित्रसंग्रह दांडगा होता. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला हा कपूर चिराग नाकाच्या शेंड्यावर राग आणि प्रचंड ॲटिट्यूड घेऊन फिरत असे, असं असलं तरिही तो माणूसघाणा कधीच नव्हता, त्याच्या दिलदारीचे किस्से आजही सांगितले जातात.

 

rishi kapoor IM

 

ऐंशीच्या दशकात कर्ज या ब्लॉकबस्टर चित्रपटात ऋषी आणि राजकिरण यांनी एकत्र काम केलं होतं. हे दोघे चांगले मित्र होते. ऋषी कपूरची मैत्री ही नावाला मैत्री नसे तर एका अस्सल पंजाब्याची ती जिगरी दोस्ती असे. आपला मित्र आपल्याला काहीही कल्पना न देता गायब झाला हे ऋषी कपूरच्या मनाला पटतच नव्हतं.

राजकिरणच्या गायब होण्यानंतर ऋषी यांनी त्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. या शोधकामात त्याला कळलं की राजकिरण अमेरिकेत एका वेड्यांच्या इस्पितळात आहे. चित्रपटातून कामं मिळणं कमी झाल्याच्या नैराश्यातून राजकिरण सावरु शकला नाही. त्याच्या मानसिक स्थितीवर त्याचा विपरीत परिणाम झाला. त्याला मुंबईतील एका मनोरूग्णालयात दाखल करण्यात आलं.

दीप्ती नवल हे देखिल एक असंच नाव. आपल्या तरल अभिनयासाठी परिचित कवीमनाची दीप्तीदेखिल राजकिरणच्या अचानक गायब होण्यानं अस्वस्थ होती.

एक माणूस गायब होतं. एक अशी व्यक्ती जिनं थोड्या थोडक्या नाही तर तब्बल शंभर एक चित्रपटांतून दखल घेण्याजोग्या भूमिका साकारल्या, तो अभिनेता गायब होतो आणि त्याच्याबाबत कोणालाच काहीही माहित नसावं? ही बाब तिला अस्वस्थ करत होती.

 

deepti naval 2 IM

 

तिने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तिने याबाबत तिच्या फेसबुक वॉलवर एक पोस्टही केली आणि आवाहन केलं की ती तिचा मित्र राजकिरण याचा शोध घेत असून कोणाला याबाबत काही माहिती असल्यास तिच्याशी संपर्क साधावा आणि तिला या शोधकार्यात असं समजलं की, तो अमेरिकेत टॅक्सी चालवून उदर्निवाह चालवितो. हे अत्यंत धक्कादायक होतं.

इथल्या ग्लॅमर विश्वातला एक अभिनेता इथे काम मिळत नाही म्हणून परागंदा होतो आणि अमेरिकेत अत्यंत सामान्य आयुष्य जगतो. कोणाला याची काही पडलेली नसते.

या बातमीहून अधिक धक्कादायक त्याच्या घरच्यांची प्रतिक्रिया होती जेव्हा त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी त्याच्या कुटुंबाला संपर्क साधला तेव्हा एक वेगळीच गोष्ट बाहेर आली.

ऋषी कपूर राजकिरण यांचे बंधू, गोविंद यांना भेटले असता त्यांनी माहिती दिली की अमेरिकेतील ॲटलांटा येथील मानसोपचार केंद्रात राजकिरण यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यांनी ऋषी कपूर यांना या सगळ्या प्रकरणापासून दूर राहून, याची चर्चा थांबविण्याची विनंती केली.

राजकिरण यांच्या गायब होण्यात काडीचा रस नसलेल्या मिडियाला आता यात चटपटीत बातमी दिसली. काही अतीहौशी आणि उत्साही माध्यमकर्मींनी खाजगी कंपनीचं सर्वेक्षण करायला आल्याची बतावणी करत त्यांच्या घरात शिरुन माहिती काढली आणि उलट सुटल बातम्या देऊन रान उठविलं.

 

raj kiran 2 IM

 

या सगळ्याचा धक्का राजकिरण यांच्या कुटुंबाला बसला आणि त्यांनी या क्षेत्रातल्या कोणाही परिचिताला, मित्राला नंतर दारात उभं केलं नाही.

२०११ साली पुन्हा एकदा हे कुटूंब समोर आलं आणि त्यांनी राजकिरण यांच्या बेपत्ता होण्याचा रिपोर्ट दाखल केल्याचं सांगितलं. त्यानंतर आजच्या घडीपर्यंत कोणालाही राजकिरण यांच्याबाबत काहीही खबरबात नाही.

परवीन बाबी पासून सुशांत सिंह पर्यंत कित्येक मोठमोठ्या स्टार्सचा अंतसुद्धा असाच दुर्दैवी झाला, पण राजकिरण यांच्याविषयी कोणालाच काही खबरबात नसणं हे किती भीषण आणि यातना देणारं आहे याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?