' एकमेव ‘पुरुष’ नदी, अतिशय वेगळी असणारी ‘ब्रह्मपुत्र’ नदीची अध्यात्मिक कहाणी – InMarathi

एकमेव ‘पुरुष’ नदी, अतिशय वेगळी असणारी ‘ब्रह्मपुत्र’ नदीची अध्यात्मिक कहाणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भूगोलाच्या पुस्तकात न चुकता येणारी माहिती म्हणजे ब्रह्मपुत्र नदीला आसामचे अश्रू म्हटलं जातं. आपल्याला ब्रह्मपुत्र नदीची फक्त तेवढीच माहिती आहे.

एकंदरीत आपल्या देशात नद्यांचा खूप जुना इतिहास आहे. बघा, गंगा नदी थेट स्वर्गातून आली होती, सरस्वती नदी गुप्त झाली आहे, यमुना नदी ओलांडून श्रीकृष्णाला वसुदेवाने गोकुळात सोडले, नर्मदा नदीला साडी नेसवली जाते अशा अनेक पौराणिक कथांमध्ये नद्यांचा उल्लेख आढळतो.

युगानुयुगे या नद्या वाहतात. संस्कृत सुभाषितात पण ‘परोपकाराय वहन्ति नद्य:’ असा उल्लेख केला जातोच. या नद्या निरंतर वाहतात. जगात इतके बदल झाले पण नद्या मात्र अविरत वाहतात. ना त्यांची दिशा बदलली, ना त्याचं पावित्र्य. अशा अनेक पवित्र नद्यांपैकी एक ब्रह्मपुत्र नदी.

 

brahmaputra river im

 

ब्रह्मपुत्रेच्या उगमाची कहाणी आणि इतिहास अगदी वेगळा आहे. ब्रह्मपुत्र ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. या नदीची लांबी २९०० किलोमीटर आहे. त्यातील भारतात ९१६ मीटर भाग आहे, तिबेटमध्ये १६२५ किलोमीटर तर ३६० किलोमीटर भाग बांग्लादेशात आहे.

ब्रम्हपुत्रेची साधारण खोली २५२ मीटर आहे, ती जास्तीत जास्त ३१८ मीटर पर्यंत जाते. ही नदी कैलासमानसरोवरात उगम पावते. प्रत्येक ठिकाणी या नदीला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.

मानससरोवरातून उगम पावणारी ही नदी बांग्लादेशात गंगेला मिळते, तिथे या नदीला पद्मा नदी असे म्हणतात.

नंतर ती समुद्राला मिळते तेव्हा तिचं नांव मेघना नदी म्हणून ओळखली जाते. अशा वेगवगळ्या ठिकाणी वाहत ही नदी २९०६ किलोमीटर प्रवास करत जाते.

गंगेच्या संगमापर्यंत ब्रह्मपुत्रा जवळपास १८०० मैल प्रवास करत बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते. आशियातील ही सर्वात लांब नदी म्हणून ओळखले जाते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ब्रह्मपुत्रेचा उगम-

हिमालयात तिबेटमधील पुरुंग जिल्ह्यात मानससरोवराजवळ ब्रह्मपुत्रेचे उगमस्थान आहे. ते जवळपास १७,०९० फूट उंचावर आहे. तिथे ब्रह्मपुत्रा नदीला यरलुंग त्संगपो असं म्हणतात.

तिबेटमधून ही नदी अरुणाचल प्रदेशात प्रवेश करून आसामच्या खोऱ्यात प्रवेश करते. तिथे ती ब्रह्मपुत्र म्हणून ओळखली जाते. बोडो लोक तिला भुल्लम बुथूर म्हणतात.

बांग्लादेशात तिला यमुना म्हणतात. पद्मा नदीशी तिचा संगम झाला की या नदीला मेघना नदी म्हणून ओळखले जाते आणि पुढे हीच नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते.

एक वेगळा भाग असा की, नदी ही स्त्री मानली जाते पण ब्रह्मपुत्र नदी मात्र नदी नाही नद म्हणजे पुरुष आहे असं मानलं जातं. मराठीत पुरुष नदीला नद असं म्हणतात. या नदीला ब्रह्मपुत्र म्हणतात, कारण ही एकमेव पुरुष नदी आहे.

 

brahmaputra river im1

 

हिंदू, जैन, आणि बुद्ध या तीनही धर्मीय लोकांमध्ये पूजनीय असलेली ही नदी वेगवेगळ्या कथांनी गौरवली आहे. बौद्ध धर्मियांच्या मते बोधीसत्वानी हिमालयाच्या माध्यमातून पाणी वाहण्यासाठी जागा दिली आणि त्यातून सारा मैदानी प्रदेश समृद्ध झाला.

हिंदू मानतात, की ब्रह्मपुत्र नदीचा जन्म अमोघ आणि ब्रह्मा यांच्या प्रेमातून झाला. हा मुलगा अतिशय व्रात्य होता. तो अमोघच्या हातून पाण्यासारखा निसटून गेला. मग शन्तनु ऋषींनी या मुलाला गंधमादन, कैलास, जरुधी आणि समवर्ती या चार पर्वतांच्या मधोमध ठेवलं आणि तो ब्रह्मकुंड म्हणून विकसित झाला.

ब्रह्मपुत्र नदी ज्या ज्या दऱ्याखोऱ्यातून, जंगलातून, पहाडातून वहात जाते तिथे वनस्पतीमध्ये औषधी गुण आहेत. चमत्कारी जडीबुटी म्हणतात त्या.

तिबेटमधील लोकांचा अजून एक विश्वास आहे, याच क्षेत्रात जगातील गूढ शांग्रीला व्हॅली आहे. या ठिकाणी गेलेला माणूस कधीही परत येत नाही अशा दुसऱ्या मितीत एक वेगळी दुनिया इथे आहे असं मानतात.

आसाममधील बहुतेक गावे ही ब्रह्मपुत्रेच्या तीरावर वसली आहेत. आसाममधील सादिया, दिब्रुगढ, जोरहाट, तेजपूर, गुवाहटी, धुबुरी गोअलपाडा ही ते प्रमुख गावे आहेत. कामाख्या देवीचे जगप्रसिद्ध मंदिर याच नदीच्या तीरावर आहे.

सुंदरबन डेल्टा हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश ब्रह्मपुत्रा आणि गंगा नदी या मिळून बनलेला आहे.

एकंदरीत नदी ही कोणतीही असो ती जीवनदायिनी आहे. जगात पाण्याची धार एकच असते पण ती विविध नावांनी ओळखली जाते. आणि नांव कोणतेही असले तरी मानवी जीवन समृद्धच करतात या नद्या. मग ती गंगा असो गोदावरी, यमुना की ब्रह्मपुत्रा! आणि ती स्वच्छ ठेवायची जबाबदारी आपलीच असते नाही का?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?