' ११ व्या शतकापासून उभं असलेलं हे मंदिर अजूनही भल्याभल्या इंजिनियर्ससाठी एक कोडंच आहे!

११ व्या शतकापासून उभं असलेलं हे मंदिर अजूनही भल्याभल्या इंजिनियर्ससाठी एक कोडंच आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मंदिरं, देव-देवता, पूजा-अर्चना यांचं भारतीयांसाठी, विशेषतः हिंदू धर्मीयांसाठी असलेलं अनन्यसाधारण महत्त्व वेगळं सांगण्याची गरज नाही. मंदिर हा हिंदू धर्मीयांसाठी फारच जिव्हाळयाचा विषय आहे. त्यातही प्राचीन भारतीय संस्कृतीमधील स्थापत्यशास्त्र, कलाकुसर या गोष्टींचा विचार करायचा झाला, तर काही पाहायलाच नको. बोलावं तेवढं कमीच आहे.

या स्थापत्याशी, या कलाकुसरीशी अनेकदा इतिहास जोडलेला असो, हेदेखील त्याचं फार महत्त्वाचं कारण म्हणता येईल. ऐतिहासिक वारसा हा दर्जा मिळालेलं असंच एक मंदिर भारतात आहे. या मंदिराची रचना आणि स्थापत्य बघून भलेभले इंजिनियर्स सुद्धा चकित होतात.

 

tamilnadu temples inmarathi

 

कुठलं आहे हे मंदिर आणि काय आहेत ही रहस्यं? चला जाणून घेऊयात.

मंदिराचा इतिहास…

तामिळनाडू राज्यातील तंजावर प्रदेशात बृहदेश्वर हे मंदिर आहे. भगवान शंकराचं हे मंदिर चोल राज्याच्या राजांनी निर्माण केलं आहे. या मंदिराचं तत्कालीन नाव राजराजेश्वर असं होतं. कालांतराने मराठा शासकांनी त्याचं नामकरण बृहदेश्वर मंदिर असं केलं.

या मंदिराची निर्मिती इसवी सन १००३ ते १०१० या कालावधीत झाली आहे. या मंदिराविषयी उपलब्ध असलेल्या माहितीचा आधार घेतल्यास हे लक्षात येतं की या मंदिराचे वास्तुशास्त्रज्ञ कुंजर मल्लन राजराज पेरुन्थचन हे होते, यांची आज हयात असणारी पिढी सुद्धा स्थापत्यशास्त्रातच कार्यरत आहे.

 

brudheshwar IM

आजही भक्कम आहे मंदिर…

या मंदिराची उंची जवळपास ६६ मीटर इतकी असून एकूण १३ मजले या मंदिरात पाह्यला मिळतात. या मंदिरासाठी बांधण्यात आलेला चबुतरा १६ फूट उंच आणि आजही तितकाच भक्कम आहे.

भारतातील सर्वाधिक मोठ्या मंदिरांच्या यादीत या मंदिराचा समावेश केला जातो. हे जगातील पहिले असे मंदिर मानलं जातं, जे पूर्णपणे ग्रॅनाईटच्या दगडांपासून तयार करण्यात आलं आहे.

इतक्या कमी कालावधीत कसं बांधून झालं मंदिर…

मंदिराच्या निर्मितीकरिता तब्बल १ लाख ३० हजार टन वजनी दगडाची गरज लागली होती. इतकं भव्यदिव्य मंदिर अवघ्या ७ वर्षांत बांधून पूर्ण झालं यावर विश्वास बसणं खरोखरंच कठीण आहे.

 

bruhdeshwar 2 IM

 

मंदिर लवकर बनवलं जाण्यासाठी कामात कुचराई किंवा चुका राहिल्या आहेत असं समजत असाल, तर तो तुमचा गैरसमज आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा पर्याय उपलब्ध नसतानाही या मंदिराची निर्मिती इतक्या कमी कालावधीत कशी झाली हे एक कोडं आहे. या मंदिराने आजवर जवळपास ६ भूकंपांचा सामना केला आहे. तरीदेखील हे मंदिर जसेच्या तसे उभं आहे.

मंदिर म्हणजे एक चमत्कारच :

या मंदिराच्या शिखराचे वजन तब्बल ८० हजार किलो इतके आहे. भल्याथोरल्या अशा या शिखराची सावली मात्र जमिनीवर पडत नाही. स्थापत्यकलेतील हा एक चमत्कार म्हणायला हवा. हा ऐंशी टन वजनाचा दगड मंदिराच्या सर्वात वरील भागात काय पोचला असेल, हादेखील एक चमत्कार मानला जातो.

नंदीची मूर्ती :

१६ फूट लांब, ८.५ फूट रुंद आणि १३ फूट उंच अशी एक नंदीची मूर्ती मंदिरात पाहायला मिळते. या मूर्तीचे वजन तब्बल २० हजार किलो इतके आहे. भारतातील नंदीची ही दुसरी सर्वात मोठी मूर्ती मानली जाते. या मूर्तीची निर्मिती एकाच दगडातून केली गेली आहे.

 

brihdeshwar 3 IM

सम्राटाचं दान :

मंदिरावर काही लेख कोरलेले आढळून येतात. यातील माहितीवरून कळतं की राजराज या सम्राटाने ४००० गाई, ७००० बकऱ्या, ३० म्हशी आणि २५०० एकर जमीन दान केली होती. या दानामुळेच रोजच्या दिव्यांसाठी लागणाऱ्या तुपाची व्यवस्था अगदी सहज होऊ शकली.

कुठून आले ग्रॅनाईटचे दगड :

या मंदिराच्या निर्मितीमधील बहुतांश भाग हा ग्रॅनाईटच्या दगडांपासून निर्मित आहे. काही प्रमाणात सँडस्टोनचा सुद्धा वापर केल्याचं आढळून येतं. ग्रॅनाईट दगडांचा पुरवठा होऊ शकेल अशी मंदिराजवळील जागा ६० किमी अंतरावर आहे.

इतक्या लांबवरचा पल्ला गाठून इतके विशाल आणि वजनदार दगड नेमके कसे आणले गेले हे एक कोडं आहे. हे दगड मंदिर निर्मितीच्या जागेवर कसे पोचले, हे आजदेखील मोठं कोडं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

…आणि काम पूर्ण झालं :

ग्रॅनाईट हा अत्यंत कठीण दगड आहे. हा दगड कापणं, त्याला आकार देणं यासाठी खास औजारं आणि काहीवेळा तर हिऱ्याचीसुद्धा गरज पडते.

तंत्रज्ञानाचा फारसा आधार नसलेल्या त्या काळात सुद्धा ग्रॅनाईटवर कलाकुसर करून मूर्तींची निमिर्ती कशी झाली असेल याविषयी आजही ठोस असं काहीही सांगता येत नाही. ७ वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर या मंदिराची निर्मिती पूर्ण झाली असावी, एवढंच सांगता येऊ शकतं.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?