' ‘गांधी’ घडवणारी अज्ञात व्यक्ती जी तुम्हाला माहित नाही! – InMarathi

‘गांधी’ घडवणारी अज्ञात व्यक्ती जी तुम्हाला माहित नाही!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महात्मा गांधी यांना अनेक जण आपला आदर्श मानतात, पण कधी विचार केलाय का, गांधींचे आदर्श कोण आहेत? ते कोणाला आपले गुरु मानायचे? कोणाच्या प्रभावामुळे त्यांचे अख्खे आयुष बदलले? चला तर आज जाणून घेऊया या सर्व गोष्टी!

महात्मा गांधींवर श्रीमद राजाचंद्र यांचा फार प्रभाव होता. राजाचंद्र हे देखील गुजरात मधलेच! गुजरातच्या भवाना इथे ९ नोव्हेंबर १८६७ मध्ये त्यांचा जन्म झाला. गांधीजींचे अध्यात्मिक गुरु अशी त्यांची ओळख होती.

rajachandra-marathipizza01
shrimadrajchandramission.org

राजाचंद्र  आणि महात्मा गांधी यांची पहिली भेट १८९१ साली झाली, जेव्हा गांधीजी इंग्लंडवरून भारतात परतले होते, राजाचंद्र यांच्या साध्या आणि सच्च्या स्वभावाने गांधीजी प्रभावित झाले. त्यांचे विचार गांधीजींच्या मनावर ठसले.

राजाचंद्रभाई यांचे अध्यात्मिक ज्ञान प्रचंड होते. त्यांच्या शिकवणीने अनेक जणांचे आयुष्य बदलले होते. अतिशय साध्या पण मनात उतरणाऱ्या विचारसरणीमुळे कोणीही मनुष्य लगेच त्यांच्या कडे आकर्षित होई. वयाच्या सातव्या वर्षी पासूनच त्यांच्या असाधारण व्यक्तिमत्वाचे दर्शन होण्यास सुरुवात झाली होती. इतक्या लहान वयात त्यांनी कविता करायला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षापासून त्यांनी आपले अनमोल विचार प्रकट करायला सुरुवात ककेली. एखाद्या विद्वानाप्रमाणे त्यांच्या बालबुद्धीला समज होती. लहान वयातच त्यांनी अध्यात्मिक गुरु होण्याकडचा प्रवास सुरु केला.

rajachandra-marathipizza02
simpl.in

राजाचंद्र यांच्या स्वभाव, स्मृती आणि विचारसरणीचा गांधीजींच्या जीवनावर फार मोठा प्रभाव पडला. त्यांच्या जीवनातील सत्य, करुणा आणि अहिंसा या मूल्यांनी गांधीजींच्या जीवनाला  कलाटणी दिली. याच मुल्यांचा उपयोग करून गांधींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीला बळ दिले आणि स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

rajachandra-marathipizza03
shrimadrajchandramission.org

गुजरातमध्ये स्थित असलेल्या राजाचंद्र मिशनमध्ये आजही राजाचंद्र यांच्या शिकवणीचे धडे दिले जातात, त्यांच्या विचारांचा प्रसार केला जातो. ‘युगपुरुष-महात्मा के महात्मा’  या नाटकाचे या संस्थेने आजवर ६०० पेक्षा जास्त शो आयोजित केले आहेत. अमेरिका, युरोप आणि ब्रिटेनमध्ये जवळपास ५ लाखाहून जास्त प्रेक्षकांसमोर हे नाटक सादर केले आहे आणि प्रेक्षकांनी देखील टाळ्यांच्या गजरात नाटकाला दाद दिली आहे. या नाटकातून राजाचंद्रजी खऱ्या अर्थाने आपल्याला कळतात.

महात्मा गांधी स्वातंत्र्याचा लढा उभारून आपल्या सगळ्यांचे महात्मा झाले, त्यानी आपल्याला अहिंसेचा, सत्याचा मार्ग दाखवला, पण त्यांच्यामागे देखील एक व्यक्ती होती हे आपल्याला अजूनही माहिती नव्हते, जे आज माहिती झाले. राजाचंद्र यांनी गांधींना मार्गदर्शन केले आणि गांधींनी देशातील जनतेला मार्गदर्शन केले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?