' किचन टाईल्सवरचे तेलाचे डाग जातच नाहीये? हा जबरदस्त उपाय टाईल्स नव्या करेल!

किचन टाईल्सवरचे तेलाचे डाग जातच नाहीये? हा जबरदस्त उपाय टाईल्स नव्या करेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महिलांच्या अशा आवडीच्या गोष्टी असतात ज्यात कोणी लुडबुड केलेली त्यांना अजिबात पसंत नसते. शॉपिंग, सौंदर्य प्रसाधनं आणि स्वछता या गोष्टींमध्ये महिला अगदी जागरूक असतात. ज्या प्रमाणे संपूर्ण घराचा डोलारा महिला सक्षमपणे सांभाळतात त्याच घरातला त्यांचा हळवा कोपरा म्हणजे किचन, आणि त्या किचनची स्वछता करणं महाकठीण काम असतं.

आता तुमचेही किचन चकाकेल, लकाकेल तेही सहजपणे कामाची जागा स्वच्छ, टापटीप ,आणि प्रशस्त असेल तर काम करायला चांगली मजा येते. आणि त्यात जर का हे काम करण्याचे ठिकाण ‘स्वयंपाक घर ‘असेल तर विचारायलाच नको.

प्रत्येक गृहिणीचे / स्त्री चे पदार्थाच्या चवी बाबत स्वत:चे काही खास फंडे असतील पण किचनच्या बाबतीत एकच फंडा लागू होतो ,तो म्हणजे , ‘स्वयंपाक घर स्वच्छ टापटीप,चकचकीत ओटा-टेबल असलेले आदर्श किचन असावे.

 

kitchen inmarathi

 

आता हेच पहा ना कुणा ओळखीच्या घरी तुम्ही गेलात अन् तिथे ओट्यावर पसारा, कळकट्-मळकट झालेल्या टाईल्स,त्यावर तेलाचे डाग. अशा या किचनमधून कितीही चविष्ट पदार्थ खायला दिला तरीही तो खाण्याची पटकन इच्छा होणार नाही. कारण आपल्या नजरेसमोर तो अस्वच्छ ओटा दिसत असतो.

या खराब झालेल्या किचन टाईल्स सहजपणे नि घरातलेच साहित्य वापरून अगदी सहजपणे स्वच्छ करता येतात. यासाठी आवश्यक असणारा महत्वाचा घटक म्हणजे बेकिंग सोडा.

 

tiles im 1

 

प्रथम एक लीटर गरम पाण्यात अर्धा कप बेकिग सोडा मिसळा. त्यात अर्धा लिंबू रस किंवा विनेगर एक ते दोन चमचे टाका. तयार झालेले द्रावण नीट ढवळून घ्या.
एका स्प्रे बॉटल मध्ये थोडे तयार केलेले द्रावण ओता, मग त्यात एक ते दोन चमचे तुमच्या घरी असलेला डिश वॉश टाका. उरलेले द्रावण टाकून नीट हलवून घ्या .
खराब झालेल्या ठिकाणी या द्रावणाचा चांगला स्प्रे करा दहा ते पंधरा मिनिटे असेच राहू द्या..

एखाद्या जुन्या ब्रश किंवा स्क्रबर च्या सहाय्याने घासून घ्या. डाग सहजपणे निघत असलेले दिसून येतील. डाग अगदीच चिवट असल्यास आठवड्यातून किमान तीनदा तरी या उपायाचा अवलंब करावा. स्प्रे बॉटल नसली तरीही तुम्ही या उपायाचा वापर करू शकता .त्यासाठी अर्धा कप बेकिंग सोड्यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालून दाटसर पेस्ट तयार करा..

 

baking soda inmarathi

भिंतींना ओल येऊ नये म्हणून पावसाळ्याआधीच घरात या गोष्टी तयार ठेवा!

घराचं रिनोवेशन स्वस्तात मस्त होण्यासाठी महत्त्वाच्या ५ टिप्स!

ही पेस्ट डाग असलेल्या जागी चांगली लावून ठेवा आणि १०ते १५ मिनिटांनी स्क्रबर किंवा ब्रश च्या सहाय्याने साफ करा. नंतर कोरड्या कापडाने ज्या ज्या ठिकाणी घासले होते ती जागा पुसून घ्या. अशा रीतीने किचनची साफ-सफाई करण्याची सवय अंगी बाळगली तर तुमचे किचन देखील कायम चकचकीत आणि लकाकणारे दिसेल,अगदी जाहिरातीतल्या किचन सारखे.. कधी कधी आपल्यालाच प्रश्न पडतो की घरातील साध्य सध्या गोष्टींचा देखील आपल्याला असाही फायदा होतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?