' या ट्रिक्स जाणून घेतल्यात, तर ‘तात्काळ’चं तिकीट लगेचच कन्फर्म होईल – InMarathi

या ट्रिक्स जाणून घेतल्यात, तर ‘तात्काळ’चं तिकीट लगेचच कन्फर्म होईल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लांबचा प्रवास म्हटलं, की रेल्वे हाच आपली पहिली पसंती असते, पण या रेल्वे प्रवासाबाबत एक गोष्ट आहे जी आजवर थोडी त्रासदायक वाटत आली आहे. ती म्हणजे प्रवासाचे आरक्षण.

एक काळ असा होता की रेल्वे तिकीट काढण्यासाठी लोक रेल्वे स्थानकावर तासनतास रांगा लावत असत, पणआता ‘आयआरसीटीसी’ अर्थात इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) द्वारे ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या सुविधेनंतर तिकीट मिळवणे खूप सोपे झाले आहे.

अनेक वेळा आपत्कालीन परिस्थितीत कुठेतरी जावे लागते, यासाठी आपल्याला ‘तात्काळ’ तिकीट बुक करण्याची सुविधा मिळते ही, परंतु अनेक वेळा, तात्काळ तिकीट बुक करतानाही सीट भरून जाते आणि आपल्याला तिकीट बुक करता येत नाही.

अशा परिस्थितीत, या समस्येवर मात करण्यासाठी, तुम्ही काही सोप्या युक्त्या अवलंबून तात्काळ तिकीट सहजपणे बुक करू शकता. या लेखातून आम्ही तुम्हाला अशा टिप्स देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला तात्काळ तिकिटांचे बुकिंग सहजपणे करता येईल. काय आहेत या टिप्स? चला पाहूया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

IRCTC खाते तयार करा :

सर्वप्रथम IRCTC खाते तयार करा, जे https://www.irctc.co.in वेबसाइटला भेट देऊन तयार केले जाऊ शकते किंवा मोबाइल अॅप डाउनलोड करू शकता.

आरक्षणाची वेळ :

ए.सी कोचसाठी तात्काळ तिकिटाचे बुकिंग सकाळी १० वाजता सुरू होते आणि जनरल तिकिटाचे बुकिंग सकाळी ११वाजता सुरू होते. 

तुम्ही सर्व माहिती भरायाला सुरू करता तोपर्यंत सर्व तिकिटे आरक्षित होतात. कारण काही तिकिटांसाठी हजारो लोक एकत्र बुक करण्याचा प्रयत्न करत असतात, यासाठी एक ट्रिक आहे.

आगाऊ मास्टरलिस्ट तयार करा :

तुम्हाला कन्फर्म तिकीट हवे असल्यास, तात्काळ तिकीट बुक करण्यापूर्वी मास्टरलिस्ट तयार करा. मास्टरलिस्टमध्ये तुम्ही ज्या प्रवाशांसाठी तिकीट बुक करू इच्छिता, त्या सर्व प्रवाशांचे तपशील तुम्ही आगाऊ जतन करू शकता.

ही सुविधा IRCTC वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर उपलब्ध आहे. तुम्ही IRCTC खात्याच्या माय प्रोफाइल विभागात जाऊन मास्टरलिस्ट तयार करू शकता. असे केल्याने तुमचा तिकीट बुक करतानाचा वेळ वाचेल आणि तुम्हाला प्रवाशांची माहिती एका क्लिकवर मिळेल.

 

irctc im

 

अशाप्रकारे मास्टर लिस्ट वैशिष्ट्य वापरा-

१. हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी, सर्वप्रथम IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या

२. येथे तुम्ही माय अकाऊंटवर क्लिक करून प्रोफाइल ओपन करा.

३. यानंतर तुम्हाला Add/modify Master List वर क्लिक करावे लागेल.

४. येथे तुम्हाला प्रवाशाचे नाव, लिंग, मोबाईल नंबर, वय इत्यादी सर्व तपशील भरावे लागतील.

५. यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

६. तुमच्या प्रवाशांची मास्टर लिस्ट तयार आहे, आता बुकिंगच्या वेळी, तुम्ही सेव्ह केलेल्या पॅसेंजरच्या यादीवर क्लिक करून प्रवाशांचे तपशील सहज भरता येतील.

जलद इंटरनेट आवश्यक :

तात्काळ तिकीट ऑनलाइन बुक करताना वेगवान इंटरनेट स्पीड असणे अत्यंत आवश्यक आहे. इंटरनेटचा वेग कमी असल्यामुळे आणि तिकीट बुक न झाल्यामुळे अनेक वेळा पेमेंट अयशस्वी होते.

पेटीएम वॉलेट किंवा यूपीआयद्वारेही तिकिटे बुक करता येतात. यामुळे तुमचा वेळही वाचेल.

तिकीट बुक करण्यापूर्वी लॉग इन करा :

तात्काळ कोटा उघडण्याच्या काही मिनिटे आधी तुम्ही लॉग इन केले पाहिजे. यामुळे वेळेचीही बचत होते.

कोटा उघडण्यापूर्वी, तुम्ही लॉगिन करा आणि तारीख, ट्रेन, स्टेशन कोड, बर्थ इत्यादी सर्व माहिती भरा. मग कोटा उघडताच, तुम्ही मास्टरलिस्टमधून प्रवाशांची नावे निवडा आणि थेट पेमेंटवर जा.

 

irctc im2

 

प्रवासाची यादी तयार करा :

मास्टरलिस्ट नंतर प्रवासाची यादी बनवा. हे मायप्रोफाईलच्या ड्रॉप डाउनमध्ये देखील आढळेल. हे लक्षात ठेवा की ही यादी मास्टर लिस्ट तयार केल्यानंतरच तयार केली जाऊ शकते.

तेव्हा प्रवासाच्या ऑप्शनवर जा. येथे यादीतील नाव आणि तपशील विचारला जाईल. यानंतर मास्टर लिस्टमधून प्रवाशाचे नाव निवडण्याचा पर्याय असेल. तुम्हाला त्या यादीत जोडायचे असलेल्या प्रवाशांची नावे निवडा प्रवासाचे ठिकाण निवडा आणि सबमिट करा.

या सोप्या टिप्स वापरुन तुम्ही , प्रवासी कन्फर्म तात्काळ तिकीट बुक करू शकता आणि तुमचा प्रवास आनंददायी करू शकता. हा माहितीपर लेख तुम्हाला आवडला असेल, तर तो शेअर करा आणि inmarathi सोबत जोडलेले रहा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?