' गोव्यात त्याच ठराविक ठिकाणी फिरण्यापेक्षा 'या' हटके ठिकाणांना आवर्जून भेट द्या!

गोव्यात त्याच ठराविक ठिकाणी फिरण्यापेक्षा ‘या’ हटके ठिकाणांना आवर्जून भेट द्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गोव्याला चाललो असं म्हटलं की सगळ्यांची त्या व्यक्तीकडे बघायची नजरच बदलून जाते, मात्र गोव्याला जाणाऱ्या सर्वसामान्य जनतेपेक्षा वेगळं ठरायचं असेल, काय काय नवीन (आणि चांगल्या) गोष्टी बघितल्या हे सांगायचं असेल तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे.

केवळ ‘तहान’ भागवणारेही हा लेख वाचत असतील, तर त्यांना तहान शमवण्याव्यतिरिक्त काही ठिकाणांची माहिती मिळेल. शिवाय ज्यांना खरोखर ‘प्रेक्षणीय’ म्हणता येईल, अशी ‘स्थळं’ही दिसतील.

गोव्याला नावाजलेले अनेक बीच आहेतच, पण तिथं गर्दी खूप असते अशी अनेक लोकांची तक्रार आहे, मात्र या गजबजलेल्या बीचशिवाय गोव्यात शांतता असणारे बीच आहेत, अशी काही ठिकाणं आहेत जी सगळ्यांना माहीतच नाहीत. चला, अशा सगळ्या चांगल्या ठिकाणांबद्दल जाणून घेऊया.

१. कंबरजुआ कालवा –

 

goa unseen places im3

 

गोव्यातील मांडोवी आणि झुआरी या दोन नद्यांना जोडणारा १५ किलोमीटरचा खारट पाण्याचा कालवा म्हणजे कंबरजुआ कालवा. पोर्तुगीज आणि विजापूर संस्थानाच्या वेळी हे भेट नो मॅन्स लँड होतं. त्यामुळे घुसखोरांना अडवण्यासाठी इथे मगरी आणण्यात आल्या, ज्या पाहण्यासाठी आजही जाता येऊ शकतं.

२. चोर्ला घाट –

भव्य धबधबे, जैवविविधता आणि काही दुर्मिळ प्रजाती आणि भरपूर नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेला हा चोर्ला घाट महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक बॉर्डरच्या इंटरसेक्शन पॉइंटला आहे.

या ठिकाणी प्रमुख धबधबा वझिरा शकीरा फॉलसह इतरही अनेक लहान धबधबे पाहायला मिळतात.

३. हरवलेम फॉल्स –

 

goa unseen places im

 

५० मीटर उंचीवरून कोसळणारा, मापसापासून जवळ असणारा हा धबधबा गोव्यातल्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. ‘राणे’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या राजपूत भाडोत्री सैनिकांना ब्रिटिश सरकारने स्थायिक करण्यासाठी पाठवले होते, असं म्हटलं जातं.

बौद्ध भिख्खूंनी कोरलेली अर्वालेम दगडी गुहा आणि रुडेश्वर मंदिर जवळच आहे.

४. डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य –

खारफुटी असलेल्या या ठिकाणामुळेआपल्याला खारफुटीच्या एकंदर इकोसिस्टिमबाबत अनोखा दृष्टिकोन मिळतो. हे अभयारण्य दलदलीत वास्तव्य करणारे पक्षी आणि प्राणी यांचं निवासस्थान आहे.

इथल्या इकोसिस्टिमची माहिती देणारं सुसज्ज असं निसर्ग संशोधन केंद्र या ठिकाणी आहे, पक्षी निरीक्षणाची संधी देणारा तीन मजली टेहळणी बुरूजही येथे आहे. समुद्राच्या भरतीच्या वेळी वनविभागाने आयोजित केलेल्या बोटीच्या सहलीचा आनंदही घेता येऊ शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

५. क्वेरीम बीच –

जल्लोषापासून लांब आणि गोव्याच्या सर्वात उत्तरेला असलेला क्वेरीम बीच शांततेची आवड असणाऱ्यांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. इथे पाम आणि कॅज्यूरीना ही दोन झाडे मुबलक प्रमाणात आहेत.

दर ३० मिनिटांनी एक फेरी पोर्तुगीजांच्या प्रसिद्ध अशा तेरेखोल या समुद्री किल्ल्यावर नेऊन सोडते.

६. सिंक्वेरीम किल्ला –

 

goa unseen places im1

 

१६१२ मध्ये बांधलेला हा किल्ला पणजीपासून १८ किलोमीटरवर आहे. अपर अगौडा किल्ल्याचा विस्तारित भाग म्हणून हा किल्ला ओळखला जातो.

डच आणि मराठा आक्रमणकर्त्यांपासून गोव्याचं रक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता.

७. पेक्वेनो बेट (बॅट आयलँड) –

हे बेट असल्यानं इथून प्रवाळ खडकांपर्यंत सहजरित्या पोहोचता येतं. त्यामुळं हे बेट स्नॉर्कलींग करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. पणजीपासून ३० किलोमीटर अंतरावर हे बेट आहे.

८. अर्वालेम लेणी (पांडव लेणी) –

 

goa unseen places im4

 

ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातल्या या लेणी आहेत. काहींच्या मते या लेणी प्रवासी बौद्ध भिक्खूंनी एकल लॅटराइट खडकातून निर्माण केल्या होत्या. मात्र काहींच्या मते या खोल्यांचा पांडवांशी संबंध आहे.

ग्रॅनाईटपासून कोरलेली शिवलिंगे या लेण्यांमध्ये असलेल्या पाच कंपार्टमेंट्समध्ये पादुकांवर उभी आहेत. या लेण्यांच्या भिंतींवर कोणत्याही गुंतागुंतीच्या डिझाइनचे कोरीव काम नाही. पणजीपासून ३२ किलोमीटरवर हे ठिकाण आहे.

९. भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य –

२४० स्क्वेअर किलोमीटरमध्ये पसरलेल्या या गोव्यातल्या सर्वात मोठ्या अभयारण्यात स्पॉटेड डीअर, हॉग, माऊस डीअर आणि बार्किंग डीअर यांसारख्या शाकाहारी प्राण्यांच्या अनेक प्रजाती आढळतात.

रुबी-थ्रोटेड यलो बुलबुल या गोव्याच्या राज्य पक्ष्यासह इथं पक्ष्यांच्या एकूण १२० प्रजाती आढळतात. या अभयारण्यात दूधसागर धबधबा, तांबी धबधबा आणि डेव्हिल्स कॅनियन यांसारख्या गोष्टीही पाहता येतात. पणजीपसून ६८ किलोमीटरवर हे ठिकाण आहे.

१०. नेत्रावली तलाव –

 

goa unseen places im2

 

शांत आणि प्रसन्न असलेल्या नेत्रावलीतल्या गावातला हा तलाव बुडबुड्यांमुळं प्रसिद्ध झाला आहे. सरोवराच्या ठरावीक भागात सातत्यानं बुडबुडे येताना दिसतात.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे बुडबुडे काही विशिष्ट आवाजांना प्रतिसाद देतात आणि प्रत्येक टाळीसरशी आणखी वेगानं वाढतात.

काहींच्या मते बुडबुडे हे स्थानिक देवतेचं काम आहेत, तर इतर काहींचं म्हणणं आहे, की हे बुडबुडे कार्बन किंवा सल्फर डायऑक्साइड वायूच्या उपस्थितीमुळे आहेत. नेत्रावली पणजीपासून ७७ किलोमीटरवर आहे.

११. कोटीगाव वन्यजीव अभयारण्य –

गोव्याच्या दक्षिणेकडील कानाकोना तालुक्यात पसरलेल्या या अभयारण्यात अर्ध-हिरव्या आणि सदाहरित पॅचसह बहुतेक ओलसर-पानझडी प्रकारच्या वनस्पतींचा समावेश आहे. माकडांच्या दोन प्रजाती, रानडुकरं पाहायला मिळतात, शिवाय अधूनमधून दिसणाऱ्या गव्याचंही दर्शन या अभयारण्यात होतं.

पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी वॉटरहोललायेणाऱ्या प्राण्यांना पाहण्यासाठी इथं २५ मीटर उंच ट्रीटॉप टॉवर आहे. पणजीपासून हे ठिकाण ९० किलोमीटरवर आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?