' तुमच्या आयुष्यात 'अशा' प्रकारचे लोक आहेत? मग वेळीच करा त्यांना टाटा बाय बाय

तुमच्या आयुष्यात ‘अशा’ प्रकारचे लोक आहेत? मग वेळीच करा त्यांना टाटा बाय बाय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्ति आणि वल्ली आपल्याला पाहायला मिळतात. त्यातले काही असे असतात की ज्यांच्या सहवासात राहिले की आपल्याला बारे वाटते. मन हलके होते,उत्साह वाटतो तर काही लोक असे असतात की आपण त्यांना टाळतो. आपल्या आजूबाजूला असे अनेक जन आपण पाहतो की ते सतत रडत तरी असतात किंवा आपल्या स्वतःसाठी सहानभूती तरी गोळा कर्त असतात.

असे लोक स्वत: काहीही न करता आईजीच्या जिवावर बाईजी असल्यासारखे दुसर्‍याच्या कष्टाचे श्रेय घ्यायला देखील कमी करत नाहीत. असे लोक खरच खूप घटक असतात कारण ते तुमच्या आयुष्यावर आपला प्रभाव पाडून त्यांचा स्वार्थ साधून तर घेतातच पण तुम्हालाही निरुत्साही बनवतात. पण हे लोक इतक्या सहजपणे आपल्या हितचिंतकाचे मुखवटे घालून वावरतात की त्यांना ओळखणे कठीण असते.

 

 

या प्रकारच्या लोकांना विघ्नसंतोषी लोक म्हणतात. तेव्हा या लेखातून आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देत आहोत की तुम्हाला ‘असे’ लोक ओळखणे सोपे होईल आणि त्यांच्यापासून लांब राहून तुम्ही तुमचे शारीरिक, मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारचे होणारे नुकसान टाळू शकाल. नक्की कसे असतात हे लोक? जाणून घ्यायचंय ? मग पुढील मुद्दे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत.

१. विघ्नसंतोषी लोकांना दुसर्‍याचे भले झालेले अजिबात रुचात नाही. कोणत्याही व्यक्तीशी बोलताना, वागताना त्यांना त्यातून काय मिळेल याचाच ते विचार करतात. त्यासाठी प्रसंगी ते मर्यादेच्या बाहेर जाऊन गोड बोलायला कमी करत नाहीत. त्यांचा हेतु साध्य करण्यासाठी ते काहीही करू शकतात.

२. आपले काम करून घेण्यासाठी लोकांचा वापर करणे आणि त्यांच्या भावनांना दुखावणे या लोकांना सहज जमते. ते इतक्या सहजतेने भावना दुखावतात की आपण समजून ही विरोध करू शकत नाही. आपले ध्येय साध्य करून घेण्यात ते माहिर असतात.

 

toxic im 1

 

३. त्यांच्या स्वत:बद्दल चांगले मत होण्यासाठी ते प्रसंगी आपल्याबद्दल ही काहीतरी खोटे किंवा वाईट बोलू शकतात जेणेकरून आपल्याबद्दलचे मत कलुषित होवून त्यांचे चांगले इंप्रेशन होईल. अशा प्रसंगी ते शब्दांची हेराफेरी सुदधा करू शकतात.

४. हे विषारी मनोवृत्तीचे लोक ,’मुह मे राम, बगल मे छुरी ‘ या प्रवृत्तीने वागतात. त्यांना तुमचा स्वभाव तसेच तुमचे कमजोर दुवे, तुमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने माहिती असतात. ज्याचा वापर ते त्यांच्यासाठी करतात. अशावेळी तुम्हाला किती आणि कशा प्रकारचा मनस्ताप होतो याच्याशी त्यांना काहीच घेणेदेणे नसते. ते प्रसंगी तुमच्या वागण्याला नावे ठेवू शकतात, टीका करू शकतात. हे लोक ओळखणे बरेचदा अवघड असते कारंटे आपल्या हितचिंतकाचा मुखवटा घालून वावरतात.

५. एखाद्या प्रसंगात तुम्हाला काय वाटते याचा विचार न करता हे लोक त्यांना काय वाटते हे तुमच्यावर थोपविण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी ते तुमचा विचार करत नाहीत. तुम्ही जर ही गोष्ट त्यांना दाखवून दिली तर ते तेव्हाही आपल्या विचारांचे किंवा कृतीचे समर्थन करतात. तसेच जे काही वगतील किंवा बोलतील त्याची जबाबदारी देखील ते घेत नाहीत.

६. ते खूप हटवादी असतात.ते कधीच आपल्या चुकांची माफी मागत नाहीत उलट आपले कधीच चौकट नाही असाच त्यांचा पवित्रा असतो. प्रत्येक घटनेसाठी दुसर्‍याला दोषी ठरवण्याकडे त्यांचा कल असतो.

७. बर्‍याच घटनांमध्ये स्वत:कडे सहानुभूती घेण्याचा त्यांचा कल असतो. बरेचदा ‘व्हीक्टिम कार्ड’ खेळून ते सहानुभूती मिळवण्यात यशस्वी देखील होतात. सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वळवून घेणे त्यांना आवडते पण मुळात ते मनातून असुरक्षित असे लोक असतात. त्यांच्याकडे आत्मविश्वासाची कमतरता असते.

८. ते नेहमी आपल्याला त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करायला लावतात. आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींपेक्षा त्यांना हवे असलेले काहीतरी ते आपल्याला करायला भाग पाडतात, बरेचदा “डिव्हाईड अँड रूल”अशा डायमेंशन मध्ये त्यांचे वागणे बदलते ज्यामध्ये फक्त आपण त्यांचीच निवड करावी अशी त्यांची अपेक्षा असते, यामध्ये त्यांचे समाधान करण्यासाठी आपल्याला आपले इतर मैत्रीपूर्ण, अर्थपूर्ण संबंध तोडावे लागतात.

 

aai kuthey kay karte im

उत्तम आरोग्य, घनदाट केस आणि तजेलदार त्वचा यासाठी आयुर्वेदाने सांगितलाय “हा” पदार्थ!

‘कोलेस्ट्रॉलला’ दूर ठेवण्यासाठी महागड्या तेलाऐवजी “ह्या” गोष्टी आजमावून बघाच!

९. हे लोक सर्वोच्च मॅनिपुलेटर आहेत: त्यांच्या डावपेचांमध्ये अस्पष्ट आणि अनियंत्रित हेतु असू शकतो, तसेच एखाद्या चर्चेचा फोकस बदलून ते तुम्ही कसे चुकीच्या पद्धतीने चर्चा करत आहात याकडे वळवणे ( तुमचा टोन, तुमचे शब्द इ.) अशा गोष्टींकडे लक्ष केंद्रित करतात, एखाद्या समस्येचे समाधान शोधण्यावर नाही.

१०. हे लोक केयरिंग नसतात, आधार देणारे तर अजिबातच नसतात. जरी कधी त्यांनी असे काही केले तरी त्यात त्यांचा काही ना काही स्वार्थ असतोच. ते तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींमध्ये रस घेत नाहीत. खरं तर, तुमच्यासोबत घडणाऱ्या चांगल्या गोष्टी त्यांना नको असतात.

तुम्ही त्यांच्यापासून दूर जाल यासाठी ते तुम्हाला इतर लोकांमध्ये मिसळू देत नाहीत. तुम्हाला तुमची स्पेस देत नाहीत. की तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे काही निर्णय घेऊ देत नाहीत. कधीही ते आधी त्यांचा विचार करतात मग तुमचा विचार करतात.

तेव्हा मित्रांनो आपल्या आजूबाजूचे जे लोक तुमच्यात सतत दोष शोधतात, तुम्हाला प्रोत्साहन देण्या ऐवजी मागे खेचतात आणि तुमची चूक व्हावी अशी अपेक्षा करतात त्यांच्यापासून सावध रहा. आपल्या आजूबाजूला लपलेल्या अशा विषारी विघ्नसंतोषी लोकांना शोधण्यासाठी या लेखातील टिप्स चा तुम्हाला निश्चितच उपयोग होईल. लेख कसा वाटला ते आवर्जून आम्हाला कळवा आणि नवनवीन विषयांवरील असेच महितीपूर्ण लेख वाचत रहा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?