' परवेझ मुशर्रफ यांच्या एका हट्टापायी घडलं कारगिल युद्ध …. – InMarathi

परवेझ मुशर्रफ यांच्या एका हट्टापायी घडलं कारगिल युद्ध ….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

दोन देशांमध्ये होणाऱ्या युद्धाचं कारण हे एक तर जागेच्या वादावरून असतं किंवा एका देशाचा दुसऱ्या देशात असलेल्या नैसर्गिक साधन, संपत्ती, सामुग्री मिळवण्याच्या इर्षेवरून असतं.

इराण-इराक, इराण-अमेरिका आणि सध्या सुरू असलेलं रशिया-युक्रेन या सर्व युद्धांमध्ये आक्रमण करणाऱ्या देशाची नजर ही दुसऱ्या देशातील तेल, स्टील किंवा तत्सम वस्तूंवर असल्याचं समोर आलं आहे.

युद्ध म्हणजे प्रचंड खर्च आणि दोन्ही देशातील लोकांच्या जीवाशी खेळणं आहे. युद्धाच्या निर्णयावर कोणताही देश खूप विचारांती येतो, पण पाकिस्तान विरुद्ध भारताने जिंकलेलं ‘कारगिल युद्ध’ याला अपवाद आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे युद्ध केवळ पाकिस्तानचे तत्कालीन आर्मी चीफ जनरल परवेज मुशर्रफ यांच्या व्यक्तिगत महत्वाकांक्षेमुळे झालं होतं हे ‘कारगिल विजय दिवस’च्या २० वर्षपूर्तीच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या एका अहवालात समोर आलं आहे.

काय होती त्या काळची परिस्थिती? आणि काय होती मुशर्रफ यांची व्यक्तिगत म्हत्वाकांक्षा? जाणून घेऊया.

कारगिल युद्धात आपलं योगदान देणारे सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल सी.आर.सुंदर यांनी मध्यंतरी ‘कारगिल युद्धाच्या २० वर्षांनंतर’ या विषयावर दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, “पाक व्याप्त काश्मीर ही सैन्यासाठी नेहमीच एक डोकेदुखी आहे. पाकिस्तान इथून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो, भारताकडून हारतो आणि पुन्हा नवीन जागा शोधून तिथून हल्ला करण्याचा प्रयत्न करतो.

१९६५, १९७१ आणि १९८४ या तिन्ही वर्षी जेव्हा पाकिस्तानने तेव्हा त्यांना आपण पळता भुई थोडी केली होती. १९८४ मध्ये भारताने ‘ऑपरेशन मेघदूत’ची घोषणा केली होती. या ऑपरेशन नंतर भारताने ‘सियाचीन’ आणि आजूबाजूच्या भागांवर आपलं पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केलं होतं.

 

parvez musharaff im

 

पाकिस्तानचे आर्मी चीफ यांना त्यांचा सियाचीन मधील पराभव हा खूप जिव्हारी लागला होता. आपल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मुशर्रफने १९९९ मध्ये कारगिलवर हल्ला केला होता. ३ मे १९९९ रोजी भारतीय आर्मीने हा हल्ला परतवून लावण्यासाठी मिशन तयार केलं होतं.”

‘शेरशाह’ या सिनेमात दाखवल्याप्रमाणे कॅप्टन बत्रा यांनी हे युद्ध जिंकण्यात प्रमुख योगदान दिलं होतं. आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सैन्याने कारगिलच्या उंच पर्वतरांगांमध्ये दडून बसलेल्या पाकिस्तानी सैनिकांना ३ महिने लढत त्यांना यमसदनी धाडलं होतं.

२६ जुलै १९९९ रोजी भारताने मुशर्रफने सुरू केलेलं पाकिस्तान विरुद्धचं हे कारगिल युद्ध सहजपणे जिंकलं. कारगिल युद्धात लढलेल्या सैनिकांना मानवंदना म्हणून २६ जुलै हा दिवस भारतात दरवर्षी ‘विजय दिवस’ म्हणून साजरा करतो.

सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल शाहिद अजीज यांनी ‘ये खमोशी कब तक’ या पुस्तकात हे लिहिलं आहे, की “परवेज मुशर्रफ यांनी स्वतः कारगिल युद्धाची आखणी केली आणि त्यामध्ये त्यांना त्यांच्या सैन्यातील तीन इतर साथीदारांनी साथ दिली.

कारगिल मध्ये हल्ला करायचा आहे याबद्दल पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना देखील सांगण्यात आलं नव्हतं. पाकिस्तान मिल्ट्री मधील निवडक सैनिकांना हाताशी घेऊन मुशर्रफने ही घुसखोरीची योजना केली आणि स्वतः तयार केलेल्या खड्ड्यात स्वतःच पडला.

सर्वांपासून गुप्त ठेवून आपण कारगिलवर विजय मिळवू आणि मग आपल्या देशाला कारगिलची भेट देऊ असं मुशर्रफचं दिवा स्वप्न होतं.”

 

parvez musharaff im1

 

१९८४ मध्ये सियाचीन येथे घडवून आणलेल्या ‘ऑपरेशन मेघदूत’च्या माध्यमातून भारताने पाकिस्तान आणि चीन यांना आपल्या शक्तीचा प्रत्यय करून दिला होता. पाकिस्तानचा तेव्हापासूनच कारगिलवर डोळा होता.

कारगिल मध्ये सर्दीच्या दिवसात सैन्याला तैनात करून मुशर्रफने भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय सैन्याला त्रास होईल, शिवाय हे युद्ध लांबलं, तर ते संपवण्यासाठी भारतावर दबाव येईल आणि त्यात भारत काही चूक करेल असं मुशर्रफला वाटत होतं, पण असं काहीच झालं नाही.

भारताचे तत्कालीन पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी ही परिस्थिती खूप संयमाने हाताळली आणि त्यांनी भारतीय सैन्याला पलटवार करण्याची पूर्ण मुभा दिली आणि भारताने आक्रमकपणे हे युद्ध जिंकलं.

फेब्रुवारी १९९९ मध्येच भारतीय पंतप्रधानांनी पाकिस्तान सोबत संबंध सुधारण्यासाठी एक पाऊल टाकत ‘सद्भावना यात्रा’ या नावाने लाहोर बसची सुरुवात केली होती. या गोष्टीचा मान न ठेवता पाकिस्तानने कारगिलवर हल्ला करून आपल्या विश्वासघातकी वृत्तीचं पुन्हा एकदा दर्शन करून दिलं होतं.

 

parvez musharaff im2

 

१९८४ मध्ये पाकिस्तानच्या कमांडो फोर्समध्ये ‘मेजर’ म्हणून काम करणाऱ्या मुशर्रफने कारगिलवर हल्ला करण्याचा विचार बेनझीर भुट्टो आणि झिया उल हक यांना देखील बोलून दाखवला होता, पण त्यांनी यामध्ये कोणतीही रुची दाखवली नाही म्हणून मुशर्रफ यांनी १९९९ मध्ये आर्मी चीफ होईपर्यंत वाट बघितली आणि मग हा अयशस्वी प्रयत्न केला.

कारगिल मधील हल्ल्याची बातमी कळताच श्री अटल बिहारी वाजपेयी यांनी नवाज शरीफ यांना फोनवर संवाद साधत त्यांना त्यांची लायकी दाखवली होती.

आपल्या खास शैलीत अटलजींनी नवाज शरीफला हे ऐकवलं होतं की, “एकीकडे तर तुम्ही आम्हाला लाहोरमध्ये आलिंगन देतात आणि दुसरीकडे कारगिलवर चढाई करतात. ये अच्छी बात नही है”.

असं सांगितलं जातं की, हा संवाद होत असतांना प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांनी देखील तिथे हजर होते आणि त्यांनी देखील नवाज शरीफ यांना त्यांच्या देशाच्या दुटप्पी वागण्यावरून खडे बोल सुनावले होते, पण मुशर्रफच्या वागण्याबद्दल तेव्हा नवाज शरीफ यांच्याकडे कोणतंही स्पष्टीकरण नव्हतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?