जग बदलणाऱ्या अॅपल आयफोनच्या जन्मामागची स्टीव्ह जॉब्सची ‘तिरस्कारी’ कथा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
तुम्हाला देखील असंच वाटत असेल की, स्टीव्ह जॉब्सने अॅपल आयफोनचा क्रांतिकारी शोध लावला त्यामागे त्याला काहीतरी मोठी प्रेरणा मिळाली असेल, त्यामुळेच त्याच्या सुपीक डोक्यातून अॅपल आयफोन निर्माण करण्याची संकल्पना आली असेल…नाही का?
पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, तुम्ही जसा विचार करताय तसे काहीच घडले नव्हते. प्रत्यक्षात मायक्रोसॉफ्ट मधील एका अधिकाऱ्याचा स्टीव्ह जॉब्स भयंकर तिरस्कार करायचा आणि त्या तिरस्कारातूनच स्टीव्ह जॉब्सच्या हातून आयफोनची निर्मिती झाली.
आणि हा खुलासा केलाय आयफोन आयओएसचे माजी अध्यक्ष स्कॉट फोर्स्स्टाल यांनी…..एका मुलाखतीवेळी त्यांनी याबद्दलची आठवण उघड केली,
खरतरं आयफोन बनवण्यापूर्वी आम्ही एका टॅबलेट प्रोजेक्टवर काम करत होतो आणि अॅपल आयफोनच्या दिशेने प्रवास सुरु झाला कारण स्टीव्ह मायक्रोसॉफ्ट मधील एका अधिकाऱ्याचा तिरस्कार करायचा.
अनेक पार्टी आणि कार्यक्रमांमध्ये दोघे एकमेकांच्या समोर यायचे, जेव्हा कधी दोघे एकमेकांशी संवाद साधायचे, तेव्हा तो अगदी स्टीव्हच्या डोक्यात जायचा. हा मनुष्य आपल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या टॅबलेट पीसी आणि इतर प्रोडक्ट बद्दल नेहमी मोठ्या घमंडी मारायचा. सारखं सारखं तेच तेच ऐकून स्टीव्हला वीट आला होता.
फोर्स्स्टाल पुढे म्हणाले,
पुन्हा एकदा एकदा डिनरवेळी त्या अधिकाऱ्याने मायक्रोसॉफ्टच्या नव्याने येऊ घातलेल्या आणि जग बदलणाऱ्या टॅबलेट पीसी चे गुणगान सुरु केले. मायक्रोसॉफ्टचे हे टॅबलेट पीसी स्टायलस अर्थात पेनने ऑपरेट करता येणार होते.
पुन्हा एकदा या टॅबलेट पीसीची अवाजवी स्तुती ऐकून स्टीव्ह चा पारा चढला आणि त्याने मला सांगितले, आपण असा टॅबलेट पीसी बनवून जो स्टायलस वर नाही तर हाताच्या बोटांनी ऑपरेट करता येईल.
त्याच म्हणण होतं की मायक्रोसॉफ्ट लोकांना एकच स्टायलस देतेय, जे कदाचित गहाळ होऊ शकतं, खराब होऊ शकतं, पण आपण मात्र जगाला असा टॅबलेट पीसी बनवून देऊ जो दहा कायमस्वरूपी स्टायलस (दहा बोटे) सह वापरता येणार होता. तसेच त्याने ही देखील गोष्ट हेरली होती की, की-पॅडचे मोबाईल वापरून लोकांना कंटाळा आला होता.
मग आम्ही ठरवलं असं प्रोडक्ट निर्माण करण्याचं, ज्याची साईज कमी असेल आणि लोक त्याचा मोबाईल सारखा वापर करू शकतील. त्यातून निर्माण झाला ‘प्रोजेक्ट पर्पल’ आणि त्यातून आकाराला आला अॅपल आयपॉड!
पण त्याला म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही, तितक्यात स्मार्टफोनचे युग सुरु झाले आणि हे युग आमच्या आयपॉड चांगलेच टक्कर देत होते. हे आव्हान दूर करण्यासाठी स्टीव्हने खिशात घेऊन फिरता येईल असा अॅपल स्पेशल स्मार्टफोन बनवण्याचे ठरवले- तोच होता पहिला अॅपल आयफोन!
तर अश्या प्रकारे क्रांतिकारी आयफोन जन्माला आला आणि त्याला कारण ठरला ‘तो’ मायक्रोसॉफ्ट मधील अज्ञात अधिकारी, ज्याचे नाव काही फोर्स्स्टालने उघड केले नाही.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.