' एक असं हत्याकांड ज्यामध्ये १७२ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती – InMarathi

एक असं हत्याकांड ज्यामध्ये १७२ जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या भारत देशाच्या अनेक वैशिष्ट्यापैकी एक म्हणजे आपल्या देशाचा जाज्वल्य इतिहास! पण आजवर तो इतिहास जनतेसमोर कधी फारसा आलाच नाही किंवा राजकीय अनास्थेमुळे तो आणलाही गेला नाही. अनेक घटना, अनेक प्रसंग, अनेक पराक्रम अनेक व्यक्ती आणि त्यांचे समर्पण अंधारातच राहिले त्यातलं एक घटना म्हणजे चौरी-चौरा घटना. ही घटना हे स्वातंत्र्य चळवळीचे एक असे अनामिक पान आहे, ज्याला इतिहासाच्या पानात कुठेही स्थान दिलेले नाही.

या आंदोलनाला महात्मा गांधी यांनी चौरी चौराचा ‘गुन्हा’ म्हटले होते. चौरी-चौरा घटनेमुळेच महात्मा गांधींनी असहकार आंदोलन मागे घेतल्याचेही इतिहासकार सांगतात. असे काय घडले होते तिथे? हे माहिती करून घेण्याआधी आपण चौरी-चौरा चा इतिहास जाणून घेऊ.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

चौरी चौरा हे उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील एक गाव आहे, जी इंग्रजांच्या राजवटीत कपडे आणि इतर वस्तूंची मोठी बाजारपेठ होती. चौरी-चौरा ही दोन भिन्न गावांची नावे होती.

 

chouri choura im

 

एका रेल्वे वाहतूक व्यवस्थापकाने या गावांना एकत्रित नावे दिली होती. जानेवारी १८८५ मध्ये त्यांनी येथे रेल्वे स्थानक स्थापन केले. त्यामुळे सुरुवातीला फक्त रेल्वे प्लॅटफॉर्म आणि गोदामाचे नाव चौरी-चौरा असे होते. पुढे चौरा गावात येऊ लागलेल्या बाजारपेठा सुरू झाल्या.

१८५७ च्या उठावानंतर चौरा गावात पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली होती. ब्रिटीशांचे राज्य उलथून टाकण्यासाठी संपूर्ण देशात चळवळ सुरू झाली होती.

महात्मा गांधी यांनीही असहकार चळवळ सुरू केली जिला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या आंदोलनादरम्यान देशवासीयांनी ब्रिटीशांच्या पदव्या, सरकारी शाळा आणि इतर गोष्टींचा त्याग केला आणि स्थानिक बाजारपेठेतही तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनामुळे २ फेब्रुवारी १९२२ रोजी चौरी-चौरा येथील दोन क्रांतिकारकांना पोलिसांनी अटक केली होती. अटकेला विरोध करण्यासाठी सुमारे चार हजार आंदोलकांनी पोलिस ठाण्यासमोर निदर्शने करून ब्रिटिश राजवटीविरोधात घोषणाबाजी केली.

हे निदर्शन थांबवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि आंदोलक माघार गेट नाहीत हे पाहिल्यावर स्टेशन इन्चार्ज “गुप्तेश्वर सिंह” याने त्या लोकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला त्याप्रमाणे आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला. त्यामुळे तीन आंदोलकांचा मृत्यू झाला, अनेक लोक जखमी झाले.

 

chouri choura 1 im

 

आपल्या सहकारी क्रांतिकारकांच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या क्रांतिकारकांनी पोलीस ठाण्याला घेराव घालून ते पेटवून दिले. या घटनेत एकूण २३ पोलिसांचा होरपळून मृत्यू झाला. ज्यामध्ये तत्कालीन इन्स्पेक्टर “गुप्तेश्वर सिंह” देखील सामील होते. ही घटना गांधीजींना कळताच त्यांनी तत्काल असहकार आंदोलन मागे घेतले.

९ जानेवारी १९२३ रोजी चौरी-चौरी घटनेसाठी १७२ लोकांना आरोपी बनवण्यात आले आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. अलाहाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.

या प्रकरणात क्रांतिकारकांच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी खटला लढवला. त्यानंतर १९ मुख्य आरोपी अब्दुल्ला, भगवान अहिर, विक्रम अहिर, दुदाही, काली चरण, लाल मुहम्मद, लौटी, माडो, मेघू अली, नजर अली, रघुवीर, रामलगन, रामरूप,

रुदाली, सहदेव संपत, मोहन संपत, श्याम सुंदर आणि सीताराम. यांना फाशी देण्यात आली आणि बाकीच्यांना मदन मोहन मालवीय यांनी सुनावणी दरम्यान दिलेल्या तथ्यांमुळे कोर्टाला सोडावे लागले किंवा पुराव्याअभावी सोडून देण्यात आले.

इतिहासकारांचे असे मत आहे की जर गुप्तेश्वर सिंहने १ फेब्रुवारीला भगवान अहीरला लाठ्या मारल्या नसत्या तर कदाचित ४ फेब्रुवारीची भीषण आग लागली नसती, गुप्तेश्वर सिंह त्याच्या २३ साथीदारांसह मेला नसता, भगवान अहिरसह १९ जणांचा मृत्यू झाला नसता. या हिंसाचारानंतर १२ फेब्रुवारी १९२२ रोजी महात्मा गांधींनी असहकार आंदोलन मागे घेतले.

 

gandhiji 2 IM

 

१६ फेब्रुवारी १९२२ रोजी गांधीजींनी ‘चौरी चौरा का अपराध’ या लेखात लिहिले की, हे आंदोलन मागे घेतले नसते तर इतर ठिकाणीही अशा घटना घडल्या असत्या. यानंतर गांधीजींवरही देशद्रोहाचा खटला चालवला गेला आणि मार्च मध्ये त्यांना अटक करण्यात आली.

चौरी-चौरा घटनेचा गांधीजींना खूप राग आला. त्यामुळे त्यांनी असहकार आंदोलन मागे घेतले. या निर्णयामुळे रामप्रसाद बिस्मिल आणि त्यांचे तरुण साथीदार संतापले. त्यामुळे काँग्रेस दोन विचारसरणीत विभागली गेली. एक मवाळ गट आणि दुसरा जहाल गट. शहीद-ए-आझम भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, राम प्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद असे अनेक क्रांतिकारक जहाल गटाकडे वळले.

चौरी-चौरा पोलीस ठाण्यात २३ पोलिसांच्या स्मृतीप्रित्यर्थ उद्यान बांधण्यात आले, मात्र या हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एकही स्मारक दीर्घकाळ झाले नाही. चौरी-चौरा घटनेच्या ६० वर्षांनंतर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तिथे शहिद स्मारक इमारतीची पायाभरणी केली आणि नरसिंह राव यांच्या काळात स्मारक पूर्ण झाले. मात्र देखभालीअभावी स्मारक अत्यंत वाईट अवस्थेत आहे.

जिथे ही घटना घडली तिथे चौरा गावातील लोकांनी लोकवर्गणीतून एक १२.२ मीटर उंचीचा शहीद स्तंभ उभारला आहे.

 

chouri choura sthambh im

 

मागच्या वर्षी चौरी-चौरा घटनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल उत्तर प्रदेश सरकारने या घटनेच्या शताब्दी सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी एका टपाल तिकिटाचेही प्रकाशन करण्यात आले.

मित्रांनो ही होती चौरी-चौरा गावातील घडलेल्या घटनेची कहाणी. इतिहासात अजूनही अशी काही दाबली पाने आहेत जी माहिती असणे प्रत्येक भारतीयासाठी आवश्यक आहे? याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला जरूर कळवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?