' ‘मेलडी इतनी चॉकलेटी क्यू है’? कोड्याचं उत्तर आहे एक सिक्रेट पदार्थ! – InMarathi

‘मेलडी इतनी चॉकलेटी क्यू है’? कोड्याचं उत्तर आहे एक सिक्रेट पदार्थ!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पारले-जी हे अवघ्या भारतीयांचं आवडतं बिस्कीट आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरू नये. अगदी लहानग्यांपासून ते उतारवयातील व्यक्तीपर्यंत, रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्तीपासून ते गडगंज श्रीमंत व्यक्तीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारं बिस्कीट म्हणजे पारले-जी.

‘पारले-जी’मधील जी हा ग्लुकोजसाठी वापरण्यात आला होता, हे अनेकजण विसरून गेले आहेत किंवा अनेकांना ते ठाऊक सुद्धा नसेल. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, ‘जी माने जिनियस’ ही आबालवृद्धांच्या तोंडी रेंगाळलेली टॅगलाईन!

पारलेच्या आणखी एका उत्पादनाची टॅगलाईन अशीच फेमस झाली होती. पारले म्हटलं की बिस्कीट आठवणाऱ्या मंडळींना कदाचित ते उत्पादन पारलेचं आहे हेदेखील पटकन आठवणार नाही. ही टॅगलाईन म्हणजे ‘मेलडी इतनी चॉकलेटी क्यू हैं?’

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पारले -जी बिस्किटाप्रमाणेच, जवळपास सगळ्यांनाच आवडणारं पारलेचं हे आणखी एक उत्पादन; मेलडी चॉकलेट. मेलडी इतनी चॉकलेटी क्यू हैं?’ या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचंय? चला तर मग..

महत्त्वाचा घटक…

अनेकांचा आवडतं असलेलं मेलडी बनवत असताना, त्याला चॉकलेटी बनवण्यासाठी एक घटक महत्त्वाची भूमिका निभावतो. या पदार्थाचं नाव आहे Soy-Lecithin.

मेलडीची टॉफी बनवत असताना साखरेचे खडे योग्य प्रकारे मिसळून जावेत आणि चॉकलेटला योग्य घट्टपणा यावा यासाठी हा घटक महत्त्वाचा ठरतो. याशिवाय मेलडीचं शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी सुद्धा Soy-Lecithin उपयुक्त ठरतं.

 

melody im

 

मेलडी ही अशी टॉफी आहे, जिचा तुकडा सोडत असताना तिचा घट्टपणा अगदी सहज जाणवतो. कॅरॅमल आणि चॉकलेट आहे दोन पदार्थांचा वापर करून बनवलेली टॉफी घट्ट होण्यात मुख्य भूमिका Soy-Lecithin या घटकाचीच आहे.

यामुळे वितळत नाही मेलडी…

मेलडी बनवण्यासाठी कोको बटर आणि कोकोचा वापर केला जातो. हे दोन्ही पदार्थ एकजीव होऊन एकत्रितपणे घट्ट न राहिल्यास मेलडी टॉफी अगदी सहज वितळून जाईल.

कोको बटर वितळण्याची प्रक्रिया साधारणपणे ३४ ते ३५ डिग्री सेल्सियस या तापमानाला सुरु होते. हे तापमान शरीराच्या तापमानापेक्षा थोडं कमी असतं.

कोको आणि कोको बटरचं हे मिश्रण घट्ट राहावं आणि वितळू नये याचं काम Soy-Lecithin मार्फत होत असतं. मेलडी बाहेरील तापमानात घट्ट राहणं आणि तोंडात गेल्यावर लगेच विरघळण्यास सुरुवात होणं ही कमाल कोको बटरच्या या गुणधर्मामुळेच होते.

मेलडी टॉफीमधील आतल्या बाजूला असलेला गडद तपकिरी रंगाचा पदार्थ, म्हणजेच हे कोको बटर आणि चॉकलेट यांचं मिश्रण असतं. तोंडात जाऊन ३५ अंशाहून अधिक तापमानात विरघळणं या त्याच्या गुणधर्मामुळे मेलडीची चव आपल्या जिभेला अगदी सहजपणे समजू शकते.

 

melody im1

 

मेलडी खाताना येणारा आनंदाचा अनुभव…

इतर चॉकलेटच्या तुलनेत मेलडीमध्ये फ्लेव्होनॉइड अधिक प्रमाणात असतात. यातील अँटिऑक्सिडंट गुणधर्म रक्तप्रवाह चांगला राखण्यास मदत करतात.

फ्लेव्होनॉइडमुळे एंडोर्फिनची निर्मिती सुद्धा अधिक प्रमाणात होते. हॅपी हार्मोन्स असणारे एंडोर्फिन्स आनंदाचा प्रत्यय येण्यासाठी कारणीभूत ठरतात. शरीराकडूनच आनंदाचा भरपूर पुरवठा होत असल्याने मेलडी खाताना व्यक्ती अधिक खुश आणि आनंदी होते.

मेलडीमधील कॅरॅमल सुद्धा टॉफीला अधिक ‘चॉकलेटी’ करण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. कॅरॅमल कोटिंगमध्ये काही प्रमाणात मीठ असतं. हे मीठ तोंडातील लाळेचा प्रवाह वाढवण्याचं काम करतं. मिनिटाला ३ मिलीने वाढून हा प्रवाह मिनिटाला ५ मिली इतका होतो. त्यामुळे टॉफी अधिक चॉकलेटी वाटू लागते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?