' महिलांनो ब्रेस्ट कॅन्सरपासून स्वतःला वाचवा!! या पदार्थांचा आजच आहारात समावेश करा

महिलांनो ब्रेस्ट कॅन्सरपासून स्वतःला वाचवा!! या पदार्थांचा आजच आहारात समावेश करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मुळातच ‘कॅन्सर’ हे नुसते नाव जरी ऐकले की माणूस अर्धमेला होऊन जातो. त्यात स्त्रियांना कायम एक भीती असते की, त्यांना कधीही ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो म्हणून, अलिकडेच झालेल्या एका जागतिक पाहणीमध्ये असे दिसून आले की, दर आठ महिलांमागे  एक असे या रोगाचे प्रमाण दिसून येते. आणि दिवसेंदिवस या प्रमाणात अधिकधिक वाढ होताना दिसत आहे .

काही वर्षापूर्वी या रोगाचे प्रमाण ४०-४५ वयोगटातील महिलांमध्ये अधिक दिसून येत असे परंतु, अलिकडे मात्र हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर २० ते ३० वयोगटातील महिलांमध्ये अधिक दिसून येत आहे.

 

breast cancer inmarathi

 

हे प्रमाण वाढण्यामागे अनुवंशिकता याबरोबर आजची जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी ही मुख्य कारणे आहेत. असे तज्ञ मंडळी सांगतात. भविष्यात या रोगाचा धोका निर्माण होऊ नये म्हणून सुरुवातीपासूनच योग्य आणि आवश्यक ती काळजी घेतल्यास हा रोग होण्याची शक्यता कमी होऊ शकते .यासाठी आहरामध्ये तुम्ही खालील काही गोष्टींचा समावेश करू शकता.

सफरचंद –

‘रोज एक सफरचंद खा आणि रोगांना पळवा’ हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे . सफरचंदाचे सेवन करणे हे स्त्रियांसाठी अधिक चांगले असते. कारण याच्या सालींमध्ये असे काही प्रमुख घटक असतात की ज्यामुळे कॅन्सरच्या पेशी निर्माण होण्यापासून प्रवृत्त करतात.

 

apple inmarathi
healthline.com

 

कांदा-लसूण –

मुळातच कांदा-लसूण हे तामसी पदार्थ म्हणून ओळखले जातात. त्यामुळे अनेकजण आहारामध्ये यांचा समावेश करण्याचे टाळतात. पण या दोहोंमध्ये अॅण्टी- ‍‌ऑकसीडेंट घटकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याने ,या दोहोंच्या नियमित सेवनाने कॅन्सरची शक्यता कमी होते.

 

onion-and-garlic-inmarathi

 

टोमॅटो –

चेहऱ्यावरील कांती उजळविण्यासाठी बहुतांश महिला टोमॅटोचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत असतात. पण याच टोमॅटोमध्ये लायकोपेन नावाचा घटक मोठ्या प्रमाणवर आढळतो. ज्यामुळे कॅन्सरच्या पेशींची वाढ होण्यास अटकाव होतो. त्यामुळे टोमॅटोचे नियमित सेवन तुमच्या आहारात असावे.

 

kidney stone tomato inmarathi

 

आक्रोड –

सुक्या मेवा गटातील हा पदार्थ स्त्रियांसाठी अत्यंत उपयुक्त असा आहे . यामध्ये साइ स्टेरॉल्स नावाचा एक खास घटक असतो , जो कॅन्सरच्या वाढीला प्रतिबंध तर करतोच.शिवाय याच्या नियमित सेवनामुळे कोलेस्ट्रोल देखील कमी होते. परिणामी ,ह्र्दयविकाराची शक्यता देखील कमी होते.

 

walnuts 2 inmarathi
neutraceauticalsworld.com

 

हिरव्या पालेभज्या –

हिरव्या पालेभाज्या या बहुगुणी बहुधर्मी असतात हे तर सर्वांना माहित आहे . पण यामध्ये कॅरोटेनाइड नावाचा जो प्रभावी घटक असतो ,त्यामुळे कॅन्सरच्या शक्यतेचा धोका मोठ्या प्रमाणावर टाळता येतो.

 

green vegeies inmarathi

 

क जीवनसत्व असलेली फळे –

लिंबू ,संत्री,द्राक्षे यासारख्या फळांमध्ये सायट्रसचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. परिणामी कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्यास अधिक मदत होते.

 

orange inmarathi

 

आंबविलेले पदार्थ –

यामध्ये प्रामुख्याने दही ,किमची(कोरियन सॅलड) यांचा समावेश असावा. यात आंबविण्याच्या प्रक्रियेमुळे जे प्रोबायोटीक घटक निर्माण होतात,ते मुख्यत: ब्रेस्ट कॅन्सरला अटकाव करतात.

 

curd 1 InMarathi

“केस कापले की जास्त वाढतात!” मुलींना नेहमी सांगितल्या जाणाऱ्या या गोष्टीमागचं वास्तव!

आईच्या कॅन्सरची बातमी ऐकून मुलाने स्वतःच्या व्यवसायात केला हा मोठा बदल!

यावरून तुमच्या एक गोष्ट सहजपणे लक्षात आली असेल की ,वर नमुद केलेल्या गोष्टी ,आपल्या रोजच्या जीवनात सहजपणे उपलब्ध होणाऱ्या आहेत . त्या आणण्यासाठी फार मोठी मेहनत घ्यावी लागत नाही .पण त्यांचे नियमित सेवन करण्यासाठी मात्र बऱ्याच जणींना मेहनत घ्यावी लागते . याचबरोबर प्रक्रिया केलेले हवाबंद डब्यातील पदार्थ खाणे टाळावे .

शक्यतो ताजे व सकस अन्न खाण्यावर भर द्यावा .त्याच जोडीने नियमित व्यायामाची सवय लावावी . शिवाय वयाच्या तिशीनंतर नियमितपणे तुमच्या स्तनाची तपासणी करून घ्यावी. वेळीच निदान झाल्यास उपचार घेणे हे शारीरिक व मानसिकदृष्ट्या सहज शक्य होते .

शिवाय या रोगावर जगभरातून मोठ्या प्रमाणावर संशोधन होते असल्यामुळे दिवसेंदिवस उपचार पद्धती अधिकाधिक प्रभावी होताना दिसत आहे . त्यामुळेच हा कॅन्सर झाला म्हणजे लगेच आपण मरणार अशी भीती बाळगू नका. यावर मात करून आपण पुन्हा पूर्वीसारखे जीवन जगू शकतो असा आशावाद नेहमी बाळगा.

===

 

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?