' आज डायरेक्टरला कार भेट देणाऱ्या कमल हसनकडे ‘तेव्हा’ शाहरुखला द्यायला पैसे नव्हते – InMarathi

आज डायरेक्टरला कार भेट देणाऱ्या कमल हसनकडे ‘तेव्हा’ शाहरुखला द्यायला पैसे नव्हते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही काही अभिनेते-अभिनेत्रींना आपण अभिनयाची विद्यापीठं म्हणतो. स्मिता पाटील, अमिताभ बच्चन, इरफान खान, तब्बू ही अशीच काही नावं. या यादीत हमखास घेतलं जाणारं नाव म्हणजे कमल हसन. कमल हसन यांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत हिंदी, बंगाली आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये कामं केली आहेत.

एक दुजे के लिये, सदमा, चाची चारसो बीस या ते आताच विक्रम अशा अनेक हिंदी चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. २००० साली आलेला त्यांचा ‘हे राम’ हा चित्रपटही लोकांच्या चांगलाच लक्षात आहे.

या चित्रपटात कमल हसन यांनी अभिनयाबरोबरच चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शनही केलं होतं. मराठी चित्रपटांप्रमाणेच हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमधून कायमच उत्तमोत्तम भूमिका साकारणारे अभिनेते अतुल कुलकर्णी यांचाही ‘हे राम’ मधला अभिनय वाखाणला गेला होता. या चित्रपटात शाहरुख खानचाही कॅमियो होता.

 

kamal hasan im

 

कमल हसन यांच्या ‘विक्रम’ या चित्रपटाच्या यशानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकाला कमल हसन यांनी नुकतीच लग्झरी कार भेट दिलीये. आपल्याला आश्चर्य वाटेल पण, आज दिग्दर्शकाला चित्रपटाच्या यशानिमित्त इतकी महागडी भेट देणाऱ्या कमल हसन यांच्याकडे ‘हे राम’च्या वेळी शाहरुखला त्याच्या भूमिकेसाठी मानधन देण्याइतके पैसेही नव्हते.

आपण काहीही मानधन न देतानाही शाहरुखने ‘हे राम’ मध्ये काम केलं होतं. आपण त्याला त्याच्या भूमिकेचं मानधन म्हणून केवळ एक मनगटी घड्याळच देऊ शकलो होतो असा खुलासा कमल हसन यांनी एका मुलाखतीत केला होता. नेमकं काय घडलं होतं त्यावेळी? जाणून घेऊ.

‘हे राम’ या चित्रपटात बाबरी मशीद पाडणं, भारत-पाकिस्तानचं विभाजन, महात्मा गांधीजींची हत्या अशा ऐतिहासिक घटनांचा अंतर्भाव केला गेल्यामुळे या चित्रपटाभोवती त्यावेळी बरेच वाद होते. कमल हसन यांनी या चित्रपटात साकरलेल्या पात्राचं नाव साकेत राम असं होतं. साकेत रामचा मित्र असलेल्या अजमल अली खानचं पात्रं शाहरुख खानने साकारलं होतं. ‘

फौजी’ या टीव्ही मालिकेतून करियरची सुरुवात करत शाहरुखने बॉलिवूडमध्ये केलेलं पदार्पण, त्यानंतर सातत्याने लोकप्रिय चित्रपट देत राहणं, काही काळाने बॉलिवूडचा बादशहा म्हणून ओळख मिळवणं, त्याचा एकूणच संघर्ष या सगळ्याविषयी आपण जाणून आहोत. पण ‘हे राम’चं बजेट संपलं आणि कमल हसनकडे शाहरुखला द्यायला पैसे नव्हते तेव्हा काहीच मानधन न घेता शाहरुखने या चित्रपटात कॅमियो केला होता हे आपल्याला नक्कीच माहीत नसेल.

या कॅमियोच्या बदल्यात कमल हसन त्यावेळी शाहरुखला केवळ एक मनगटी घड्याळच देऊ शकले होते. ‘कलर्स सिनेप्लेक्स’ला पूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत कमल हसन यासंदर्भात म्हणाले होते, “कुणाचाही यावर विश्वास बसणार नाही. ही काहीतरी खोटी गोष्ट रचून सांगितलीये, भविष्यात असं कधीच घडणार नाही असं लोकांना वाटेल.

 

kamal final im

 

शाहरुख खान हा बिझनेसमन आहे, कमर्शिअल माईंडेड आहे असं सगळे म्हणतात. मी देखील तसा आहे. पण वस्तुस्थिती ही होती की ‘हे राम’ चं बजेट किती आहे ते त्याला माहीत होतं. त्याला केवळ त्याचा एक भाग व्हायचं होतं. आपल्याला याचा भाग व्हायचं होतं हे बऱ्याचदा त्याने मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. मला केवळ चित्रपटाचा भाग व्हायचंय. माझ्यासाठी हे पुरेसं आहे असं मुलाखतींमध्ये कायम म्हटलं जातं.

मला केवळ कमल हसन यांना स्पर्श करायचा होता असं तो (शाहरुख) म्हणाला होता. लोकांच्या मते, एकमेकांना खुश करायला सगळे असं बोलतात. पण शाहरुखने हे खरंच केलं. बजेट संपलं तेव्हा त्याने मानधनाची विचारणादेखील केली नाही. मी त्याला सतत सांगायचो. त्यावर तो “ते राहू दे.” असं म्हणायचा. कोण म्हणत असं? शाहरुखने या चित्रपटाच्या भूमिकेच्या बदल्यात केवळ मनगटी घड्याळ घेतलं.”

‘हे राम’ हा चित्रपट एकाच वेळी हिंदी आणि तामिळ भाषेत रिलीज झाला होता असं समजतं. याच संदर्भात ‘मुंबई मिरर’शी बोलताना कमल हसन म्हणाले होते, “भारत भाईंकडून (सह-निर्माते भारत शाह)  त्याला (शाहरुखला) ‘हे राम’चे हिंदी राईट्स मिळाले आहेत त्याबद्दल मी खुश आहे.” कमल हसन यांच्या म्हणण्यानुसार, शाहरुखने या चित्रपटासाठी आपल्या मैत्रीचं आणि सेवेचं मूल्यं दिल्यामुळे चित्रपटाची आठवण त्याच्यापाशी असावी.

 

kamal haasan IM

कधीकाळी अभिनयातून केवळ अडीच रुपये मिळवणारा हा अभिनेता आज पंचायतमधून अनेकांची मन जिंकत आहे

पृथ्वीराज सिनेमा यशराज बॅनरच्या हातात गेला नसता तर हा अभिनेता मुख्य भूमिकेत दिसला असता

स्वप्नं बघायची हिंमत देण्याबरोबरच “श्रीमंत होण्याआधी तत्वज्ञ होऊ नका.” असा व्यावहारिक कानमंत्र दिलेल्या शाहरुखने चक्क आपल्या उमेदीच्या काळात एक पैदेखील न घेता ‘हे राम’मध्ये कॅमियो केला होता ही बाब नक्कीच त्याच्या चाहत्यांच्या मनातला त्याच्याविषयीचा आदर द्विगुणित करणारी आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?