' कबुतरं चिठ्ठ्या अचूक कशी पोहोचवायची? जाणून घ्या, ‘कबुतरांच्या पोस्ट’ ऑफिसबद्दल – InMarathi

कबुतरं चिठ्ठ्या अचूक कशी पोहोचवायची? जाणून घ्या, ‘कबुतरांच्या पोस्ट’ ऑफिसबद्दल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

संपर्क किंवा संवाद माणसाच्या विकासामधील महत्वाचा घटक राहिला आहे. समोरासमोर असताना साध्या बोलण्यातून माहितीची देवाण घेवाण सहज शक्य होते, मात्र दूर अंतरावर असणाऱ्या दोन व्यक्तींमध्ये संवाद घडण्यासाठी विविध साधनांची आवश्यकता असते.

प्राचीन काळापासून पत्र हे दूर अंतरावरील संपर्कासाठी सोपे आणि प्रचलित असे साधन राहिले आहे. हाताने लिहिलेले पत्र एखाद्या व्यक्तीमार्फत आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोहचवले जात असे. मग त्या पत्राचे उत्तर पत्रानेच त्या व्यक्तीमार्फत दिले जात.

तुम्ही अनेक ठिकाणी कबुतरखाने पहिले असतील. तिथे अनेक कबूतर धान्य सांडल्यासारखी सांडलेली असतात. तुम्ही कधी विचार केला आहे का इतर वेळी घरांच्या वळचणीला येवून गुटर्गूम करणारी ही कबुतरे तिथे एवढ्या संख्येने का असतात?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कदाचित तुम्ही कधीतरी वाचले असेल की या कबुतरांचा वापर संदेशवाहक म्हणून केला जात होता, पण कबुतरच का? याचे उत्तर हवे असेल तर हा लेख नक्की वाचा आणि जाणून घ्या यामागील कारण.

पूर्वीच्या राजा-महाराजा, सरदार- उमराव किंवा नवाब लोकांकडे असंख्य प्रकारची कबुतरे पाळली जायची ती काही खास कारणांसाठी. त्यातील एक कारण म्हणजे जलद आणि अति महत्वाच्या संदेशांची पाठवणी करण्यासाठी आणि शत्रूकडून पाठवला जात असलेला संदेश पकडण्यासाठी.

ही कबुतरे चिठ्ठ्या किंवा संदेश कशी पोहोचवतात किंवा पोहोचवत होती? नक्की ती प्रक्रिया काय आहे?

‘मेसेंजर पिजन्स’ ही फक्त एकाच दिशेने, म्हणजे त्यांच्या घराच्या दिशेने उडतात. त्यांना असे मोबाईलवरच्या मेसेजसारखे घरातून दुसरीकडे पाठवता येत नाही आणि ते त्या मेसेजसारखा हवा तो माणूस शोधतही नाहीत.

 

bird letter im

 

वर सांगितल्याप्रमाणे चिठ्ठी किंवा संदेश पोहोचवण्याचे काम करणाऱ्‍या कबुतरांना मेसेंजर पीजन्स, पोस्टमन पीजन्स, कॅरियर पीजन्स किंवा होमिंग पीजन्स अशा विविध नावांनी ओळखले जाते.

संदेशवहनासाठी कबुतरे वापरण्याचा इतिहास आजपासून कमीतकमी दोन अडीच हजार वर्षे मागे जातो. कबुतरांची उडण्याची शर्यत लावण्याच्या खेळातून या पद्धतीचा जन्म झाला आणि तिचा सर्वाधिक वापर अगदी अलीकडे दुसऱ्‍या महायुद्धात हजारो सैनिकांचे प्राण वाचवण्यासाठी झाला.

रॉक पीजन्स ही सगळ्यात बिनधास्त आणि म्हणूनच सगळ्यात जास्त प्रयोग झालेली जात आहे. या मेसेंजर पीजन्सची पिल्ले उडायला शिकली, की त्यांचे प्रशिक्षक त्यांना टप्प्याटप्प्याने त्यांच्या ढाबळीपासून दूर नेऊन सोडत असत आणि ती आपल्या खुराड्यात परतत असत.

असे करत करत शंभर किलोमीटर दीडशे किलोमीटर असे टप्पे त्यांनी गाठले, की त्यांना ‘संदेशवहनासाठी तयार’ असे सर्टिफिकीट मिळत असे. कबुतरांनी ढाबळीकडे लवकर परत यावे यासाठी त्यांना घेऊन जाण्यापूर्वी त्यांच्या खुराड्यात आवडीचे अन्न ठेवले जात असे.

हवेचा प्रवाह विरुद्ध दिशेने नसेल, तर या कबुतरांचा वेग दीडशे किलोमीटर प्रतितास इतका असू शकतो. तसेच ती दिवसाला सलग आठशे ते हजार किलोमीटर सहज उडू शकतात.

 

bird letter im 1

 

गमतीची गोष्ट म्हणजे कबुतरेसुद्धा हवाईमार्गे येताना रस्ते, नद्या, डोंगर अशा ओळखीच्या खुणांचा वापर करत परत येत असत. घोड्यावर किंवा पायी संदेश वितरीत करणे समाधानकारक असताना, त्यात अप्रामाणिक संदेशवाहक, अपघात, संदेशांचे नुकसान, अनपेक्षित विलंब आणि हमी, गोपनीयतेचा अभाव आशा अनेक कारणांमुळे प्रामाणिक आणि जलद संदेश वाहनासाठी कबुतराना प्रशिक्षित केले गेले असावे.

कबूतर पकडणे सोपे, त्वरीत प्रजनन करणारे, तुलनेने नम्र आणि त्यांच्या दिशेच्या जाणिवेसह अत्यंत “सुसंगत” असतात.

ऑक्सफर्ड विश्वविद्यालयातील एका संशोधक चमूने पन्नास कबुतरांच्या पाठीवर ‘ट्रॅकिंग डिव्हाईस’ लावून त्यांच्या परतीच्या उड्डाणाचा अभ्यास केला, तेव्हा त्यांना कबुतरे कसा आणि कुठला मार्ग निवडतात हे लक्षात आले.

कबुतरे अचूक रस्ता कशी शोधतात, याचे उत्तर त्यांना लाभलेल्या अद्‍भुत नैसर्गिक देणगीत आहे. कबुतरे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा वापर दिशादर्शक यंत्रासारखा करतात. जोडीला ते सूर्याची आकाशातील स्थिती आणि स्वतःची घ्राणक्षमता (वास) याचाही वापर करतात.

कबुतरांच्या चोचीमध्ये सूक्ष्म प्रमाणात ‘मॅग्नेटाईट’ नावाचे एक लोहाचे संयुग आढळते. त्याचा वापर त्यांना होकायंत्रासारखा होत असावा असा अंदाज आहे. अशाप्रकारे आपल्या मूळस्थानी असलेल्या चुंबकीय क्षेत्राच्या आराखड्याचा वेध घेत ते स्वगृही परततात.

 

bird letter im 2

 

विशेष म्हणजे, चुंबकीय क्षेत्रांच्या नैसर्गिक दिशेमुळे (उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवादरम्यान असणारी) कबूतराचे पूर्व आणि पश्चिमेऐवजी उत्तर आणि दक्षिण दिशेने लांब अंतरावर जाणे अधिक अचूक असल्याचे आढळून आले आहे.

कबुतरांच्या या अफाट क्षमतांचा माणसाला केवढा मोठा उपयोग झाला हे इतिहासातील अनेक घटनांवरून आपल्याला कळू शकते. चंगेज खानने त्याच्या साम्राज्याच्या दूरच्या टोकापर्यंत संपर्कात राहण्यासाठी कबुतराच्या चौकटीचा वापर केला होता, अगदी प्राचीन ग्रीसमध्ये, ऑलिम्पिकसारख्या प्रमुख कार्यक्रमांची घोषणा करण्यासाठी होमिंग कबूतरांचा वापर केला जात असे!

१२ व्या शतकात, सीरिया आणि बगदादमध्ये कबूतरांच्या घरासाठी ( पिजन पोस्ट ) एक व्यापक नेटवर्क स्थापित केले गेले होते. सक्रिय असणार्‍या कबुतर खान्यापैकी एक अंतिम कबूतर पोस्ट ऑफिस भारतात होते.

तर मित्रांनो हे ही तितकेच खरे आहे की जर तार, इंटरनेट अशा सुविधांचा शोध लागला नसता तर आजही आपल्याला निरोप, पत्रे, संदेश पोहोचवण्यासाठी कबुतरे पाळावी लागली असती…काय? पटले ना?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?