' BCCI ला सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बनवण्यामागे या अवलियाचा हात होता! – InMarathi

BCCI ला सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बनवण्यामागे या अवलियाचा हात होता!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय, हे क्रिकेट जगतातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे, हे जगातील कुठलाही क्रिकेटप्रेमी अगदी सहज सांगेल.

आज जगातील सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून मिरवणाऱ्या बीसीसीआयला इथवर पोचवण्यात बऱ्याच जणांचा वाटा आहे. मात्र यात काही नावांचा अगदी आवर्जून उल्लेख करावा लागेल. यातील सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे बंगाल क्रिकेट बोर्ड, बीसीसीआय आणि इंटरनॅशनल क्रिकेट कॉउंसिल अशा महत्त्वाच्या क्रिकेट संघटनांचे अध्यक्षपद भूषविणारे जगमोहन दालमिया!

बीसीसीआयचा क्रिकेट विश्वात दबदबा निर्माण करण्याची सुरुवात दालमिया यांनी केला असं म्हटलं, तरी ते वावगं ठरणार नाही. या अवलियाने नेमकं काय काय केलंय, चला जाणून घेऊया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कलकत्त्यामधील बिझनेसमन

मारवाडी असणारे जगमोहन दालमिया यांचा जन्म झाला तो कलकत्त्यात. ३० मे १९४० साली जन्माला आलेल्या दालमिया यांची सुरुवातीची कर्मभूमी कलकत्ताच होती. कलकत्त्यामधील स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालं. त्यांना क्रिकेट खेळण्याची सुद्धा आवड होती.

एक यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्यांनी त्यांच्या क्रिकेट करिअरची सुरुवात सुद्धा केली, मात्र कालांतराने त्यांनी वडिलांच्या बिझनेसचा एक भाग होण्याचा निर्णय घेतला.

१९६३ साली एम पी बिर्ला प्लेनेटिरियम या कंपनीची स्थापना झाली होती. दालमिया वडिलांसह व्यवसायात सहभागी झाल्यानंतर त्यांचा बिझनेस सुद्धा बहरत गेला. त्यांची कंपनी भारतातील महत्त्वाची कंस्ट्रक्शन फर्म झाली.

 

jagmohan dalmiya im

 

बीसीसीआयमधील सुरुवात आणि…. 

जगमोहन दालमिया यांनी बीसीसीआयचं अध्यक्षपद भूषवलं आहे. १९७९ साली बीसीसीआयसह त्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली. १९८३ साली त्यांनी बीसीसीआयच्या कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली. भारतीय संघाने पहिलावहिला विश्वचषक जिंकला आणि इतिहास घडवला, ते सुवर्णवर्ष सुद्धा हेच होतं.

याच संधीचा फायदा घेत, पुढे १९८७ आणि १९९६ सालचे क्रिकेट विश्वचषक दक्षिण आशियात पार पडावेत यासाठी दालमिया यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

बीसीसीआयचे अध्यक्षपद ही तर त्यांच्यासाठी अगदी नेहमीची बाब होती. मात्र १९९६ साली त्यांनी क्रिकेट जगातील सर्वात महत्त्वाच्या पदावर मुसंडी मारली. ऑस्ट्रेलियाच्या माल्कम ग्रे यांच्यावर मात करत त्यांनी आयसीसीचं अध्यक्षपद मिळवलं.

दालमिया होते म्हणून…

१९९१ साली दक्षिण आफ्रिका संघावरील बंदी हटवण्यात आली. वर्णभेदाची लढाई संपून दक्षिण आफ्रिकेचा पुन्हा मुख्य क्रिकेट प्रवाहात समावेश झाला. या संघाला भारतीय दौऱ्यावर बोलवत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

१९९६ च्या विश्वचषकातील त्यांचा असाच एक निर्णय चर्चेचा विषय ठरला. दहशतवादाच्या भीतीमुळे ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या संघाने श्रीलंकेत सामने न खेळण्याच्या निर्णय घेतला.

दालमिया यांनी भारत आणि पाकिस्तान संघाला फ्रेंडली मॅचेस खेळण्याचं आवाहन केलं. हे प्रोत्साहन क्रिकेट जगतात फार महत्त्वपूर्ण ठरलं.

नेहमीच खेळाडूंच्या पाठीशी

 

jagmohan dalmiya im1

 

जगमोहन दालमिया यांनी चांगल्या खेळाडूंना नेहमीच पाठिंबा दिला. भारतीय खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हीदेखील त्यांची ओळख होती. इंग्लंड संघाचे माजी कर्णधार आणि मॅच रेफ्री माईक डेनिस यांनी सचिनवर आयसीसी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई केली.

तांत्रिकरित्या डेनिस योग्य होते, मात्र भारतीय मीडियाने सचिनवर बॉल टॅम्परिंगचे आरोप लागले असल्याची आवई उठवली होती.

वीरेंद्र सेहवागवर सुद्धा असेच आरोप करण्यात आले होते. टप्पा पडलेल्या चेंडूवर झेल अपील करण्याचा आरोप केला गेला आणि त्याच्यावर एका सामन्याची बंदी सुद्धा घालण्यात आली. याविरोधात दालमिया यांनी आयसीसीमध्ये सुद्धा अपील केलं. मात्र ते फेटाळण्यात आलं.

दालमिया यांनी मात्र भारतीयांवर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार मोठ्या हुशारीने केला. डेनिस यांना अखेरच्या कसोटीसाठी मॅच रेफ्री ठेवण्यात आल्यास, हा सामनाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर डेनिस यांना मॅच रेफ्री पदावरून हटवण्यात आलं.

आरोपांचा सुद्धा इतिहास

दालमिया यांच्या उमेदवाराचा पराभव करून शरद पावर यांनी बीसीसीआयचं अध्यक्षपद मिळवलं. त्याच्या पुढच्याच वर्षी पैशांच्या अफरातफरीचा आरोप जगमोहन दालमिया यांच्यावर करण्यात आले. त्यांची बीसीसीआयमधून उचलबांगडी करण्यात आली.

दालमिया यांनी कोर्टात याविरोधात लढाई लढली. बीसीसीआयकडून केले गेलेले आरोप मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात रद्द करण्यात आले. हे आरोप करण्यासाठी ठोस पुरावे नसल्याचं कोर्टाने म्हटलं होतं.

या निर्णयाला धरून कलकत्ता हायकोर्टाने सुद्धा सगळे आरोप चुकीचे ठरवले. त्यांना बंगाल क्रिकेट असोसीओएशनची निवडणुयक लढवण्याची परवानगी सुद्धा देण्यात आली. २००७ साली अध्यक्षपदाची निवडणूक लढवून त्यांनी विजय सुद्धा मिळवला.

त्यानंतर २०१३ साली जून महिन्यात त्यांचं बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सुद्धा पुनरागमन झालं. त्यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

गुरुनाथ मयप्पन यांच्यावर झालेले आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगचे आरोप दालमिया यांच्यासाठी फायद्याचे ठरले. कालांतराने श्रीनिवासन यांचं अध्यक्षपदी पुनरागमन झालं.

२०१५ साली मार्च महिन्यात बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. श्रीनिवासन यांचा पराभव करून दालमिया यांनी अध्यक्षपद मिळवलं. हे अध्यक्षपद भूषवत असतानाच २०१५ च्या सप्टेंबर महिन्यात दालमिया यांचा देहांत झाला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?