' तिची चूक एवढीच होती…की ती माधुरीसारखी दिसायची…. – InMarathi

तिची चूक एवढीच होती…की ती माधुरीसारखी दिसायची….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कधी कधी काय होते आपण करायला जातो एक आणि होते तिसरेच. आता ‘निकी वालिया’ चे च उदाहरण घ्या ना, तिला व्हायचे होते पायलट आणि झाली मॉडेल, अभिनेत्री.

मित्रांनो, बर्‍याचदा आपण आपल्या आयुष्याबद्दल आपल्या भविष्याबद्दल अनेक स्वप्ने रंगवतो, त्यादृष्टीने प्रयत्न करतो पण जे नशिबात असते तेच होते. हा सार्वत्रिक अनुभव आहे.

आपल्यासमोर आपल्या करियरचे ध्येय असते, आपण त्या अनुषंगाने वाटचाल करू पाहतो पण जर तुम्हाला आपक्षित नसलेल्या क्षेत्रात तुमचे करियर घडले तर? निकी वालिया हिचे स्वप्न होते पायलट होण्याचे त्यासाठी तिने रीतसर ट्रेनिंग देखील घेतले होते पण तिच्या करियरचे विमान मात्र दुसर्‍याच क्षेत्रात लँड झाले. कसे ते पाहूया.

माधुरी दीक्षितला कोण ओळखत नाही? ९० च्या दशकापासून तिचे चाहते आहेत पण तुम्हाला हे माहिती नसेल की या धकधक गर्ल ची कार्बन कॉपी असलेली एकजण तिच्या इतकीच सुंदर होती. ती एकजण म्हणजे ‘निक्की अनेजा-वालिया’.

 

niki 3 im

 

निक्की ला पायलट व्हायचं होतं पण तिच्या वडिलांनी तिला त्यासाठी परवानगी पण दिली नाही आणि आर्थिक मदत ही! तेव्हा पुढे काय? हा तिच्यासमोर प्रश्न होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

त्याच काळात तिच्या भावाने तिला मॉडेलिंग करण्याविषयी सुचवलं आणि तिनं आपला पहिला पोर्टफोलियो बनवला. त्यानंतर मात्र निक्कीचे दिवस बदलले. तिचा पोर्टफोलियो पाहून तिला अनेक ठिकाणांहून मॉडेलिंग च्या ऑफर्स येवू लागल्या.

त्या काळातील तिची पहिली कमाई ८००० रुपयांची होती. हळूहळू जाहिराती, मॉडेलिंग क्षेत्रातील तिची रुचि वाढत गेली. पण काही काळानंतर हे सगळे सोडून ती पुन्हा आपल्या वडिलांकडे परतली. त्यानंतर आपल्या वडिलांच्या आग्रहास्तव तिने ‘मि. आझाद’ या चित्रपटात अनिल कपूर याच्यासोबत काम केले. या चित्रपटातील तिच्या कामाचे कौतुक देखील झाले. मात्र त्यावेळी एक गोष्ट प्रकर्षाने पुढे आली, ती म्हणजे तिच्या आणि माधुरीच्या दिसण्यातले सारखेपण…

अर्थातच त्यावेळी माधुरी निक्की पेक्षा जास्त यशस्वी होती त्यामुळे दिसण्यातल्या सारखेपणामुळे तिची माधुरीशी तुलना होवू लागली व ती माधुरीची डुप्लीकेट असल्याचा शिक्का तिच्यावर बसला. या तुलनेला ती कंटाळली.

 

niki im

 

त्याच दरम्यान तिच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले याचा तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला आणि त्याच मनस्थितीत तिने बॉलीवूडची रजा घेतली. सोनी वालिया याच्याशी लग्न करून ती लंडनला सेटल झाली.

निकीने टेलिव्हिजन आणि चित्रपटांसोबतच मॉडेल, कॉम्पेअर, व्हीजे, होस्ट आणि अभिनेत्री म्हणून काम केले आहे. तिने जवळपास ३० वर्षे विविध शैलीतील ३१ हून अधिक टेलिव्हिजन मालिकांमध्ये अभिनय केला आहे. झी टीव्ही चॅनेल वरील ‘अस्तित्व …एक प्रेम कहानी’ या हिंदी टीव्ही मालिकेतील ‘डॉ. सिमरन माथूर’ या भूमिकेसाठी ती प्रसिद्ध आहे.

तिने झी टीव्ही मालिका “बात बन जाए” मध्ये निक्कीची भूमिका केली होती तीने फेमिना मिस इंडिया १९९४ साठी परिक्षक म्हणून देखील काम पहिले होते ज्या स्पर्धेतून ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड आणि सुश्मिता सेन मिस युनिव्हर्स साठी निवडल्या गेल्या होत्या. निकी १९९१ मध्ये मिस वर्ल्ड युनिव्हर्सिटीमध्ये उपविजेती होती, परिणामी ती १९९१-१९९२ मध्ये जागतिक शांततेची राजदूत होती.

तिने क्लाउड ९ मध्ये काम केले जो यूके चा पहिला ब्रिटिश आशियाई डेली सोप होता.

 

niki 1 im

 

‘दिल संभल जा जरा’ मालिकेतून पुनरागमन करणारी निकी तिच्या आणि माधुरी दिक्षित हिच्या भेटीबद्दल सांगताना एक आठवण आवर्जून सांगते की, “काही वर्षांपूर्वी, मला माझ्या ‘बात बन जाए’ या कार्यक्रमासाठी दिल्लीत एका पुरस्कार सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. तर दिल तो पागल है साठी माधुरीला आमंत्रित करण्यात आले होते.

दिल्लीला जाणाऱ्या फ्लाईट्समध्ये दोघीही आपआपल्या आईंसह प्रवास करत होत्या. त्यावेळी घडलेला एक किस्सा तिने मुलाखतीत सांगितला होता. ”आम्ही चौघींनी आम्ही किती सारखे दिसतो यावर चर्चा केली,”

शेवटी तुम्ही कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचला, असे विचारले असता, निकी म्हणाली, “माधुरीने विचारले ”तुम्हीच आहात जिच्याशी लोक माझी तुलना करतात?’ तेव्हा मी माधुरीला असे विचारले होते की, ‘तुम्हीही’? आणि आम्ही दोघीही खळखळून हसलो. जेव्हा आम्ही आमच्या वैशिष्ट्यांची तुलना करू लागलो पण काहीही सारखे सापडले नाही. दुसरीकडे आम्हा दोघींच्या मातोश्री ‘हा, दोनोंकी मुस्कान तो सेम है’ असे म्हणत होत्या.

छोट्या पडद्यावर, अभिनेता निकी अनेजा वालिया हे एक नाव आहे. बात बन जाए, अंदाज, सी हॉक्स आणि घरवाली वरवाली यांसारख्या प्रतिष्ठित टीव्ही शोचा भाग असलेली निकी’अस्तित्व’ या शोमध्ये शेवटची दिसली होती , ‘दिल संभाल जा जरा’ या शोमधून एका दशकाहून अधिक काळानंतर ती अभिनयात परत आली आहे, बराच काळ लोटला आहे ,आता तरी तिच्यावरील कोणाच्यातरी डुप्लीकेट चा बसलेला शिका पुसला गेला असेल ही आशा आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?