' नायगरा फॉल्स विसरा, भारतातल्या ‘बाहुबली धबधब्याला’ गेला आहात का? – InMarathi

नायगरा फॉल्स विसरा, भारतातल्या ‘बाहुबली धबधब्याला’ गेला आहात का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मंडळी..भव्य दिव्य सेट आणि भव्य दिव्य कमाई झालेला बाहुबली सिनेमा तुम्हाला नक्कीच आठवत असेल. त्यामधील युद्धाचे जबरदस्त सीन्स किंवा कडक डायलॉग ज्याप्रमाणे आपल्या लक्षात राहतात अगदी त्याचप्रमाणे लक्षात राहतो तो त्या चित्रपटातील फेसळणारा अजस्त्र धबधबा..!

आजही बाहुबली चित्रपटाचा विषय निघाला अन त्या ढब धबधब्याबद्दल विषय निघाला नाही असे कधी झाले नाही. कालांतराने त्या चित्रपटाची मेकिंगची दृश्ये समोर आल्यावर आपल्या लक्षात आलं, की तो संपूर्ण धबधबा खरा नसून त्यासाठी VFX चा वापर करण्यात आला आहे.

म्हणजे नायगऱ्याशिवाय एवढा मोठा धबधबा कुठे दुसरीकडे नाहीचं हे आपण आपल्या मनात नक्की केलं..!

पण मंडळी याच नायगराची आठवण करून देणारा भारतामध्ये एक बाहुबली धबधबा आहे हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? चला तर मग जाणून घेऊयात या बाहुबली धबधब्याबद्दल…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

भारतातील नायगारा फॉल्स!

नायगारा धबधबा हा जगातील सर्वांत मोठ्या धबधब्यांपैकी एक आहे. हा धबधबा अमेरिकेतील नायगारा नदीवर असून अमेरिका आणि कॅनडा ह्या देशांच्या सरहद्दीवर आहे.

न्यू जर्सीपासून नायगारा साधारण ४०० मैल दूर असून अमेरिकेतील बफेलो या शहराच्या जवळ आहे. ज्यात प्रत्येक मिनिटाला ४० लाख चौरस घनफूट पाणी पडते म्हणून हा जगातील सर्वांत मोठा धबधबा आहे असं आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत.

प्रत्येकाची एकदा तरी इच्छा असते की नायगारा फॉल्सला जाऊन तेथील धबधब्याचा अनुभव घ्यावा, पण मंडळी भारतातदेखील असाच एक अजस्त्र धबधबा आहे जो ‘नायगरा’ला देखील टक्कर देऊ शकतो आणि तो म्हणजे छत्तीसगडच्या अबुझमदच्या मैदानातून वाहणारा हंदवारा फॉल्स.

 

waterfall im

 

अबुझमदच्या मैदानातून वाहणारा ओढा डोंगरी येथे पोहोचतो आणि पाण्याचा प्रचंड प्रवाह डोंगरावरून पडताना धबधबा निर्माण करतो. हा धबधबा हंदवारा फॉल्स म्हणून ओळखला जातो.

या सुंदर धबधब्याची उंची सुमारे 300 फूट आहे. धबधब्याच्या अगदी वर कुश फुलांमध्ये आणखी एक धबधबा आहे.आजूबाजूचे निसर्गरम्य वातावरण आणि विकसित न झालेला भाग याच्या सौंदर्यात भर टाकतो.निर्मनुष्य भाग आणि तेथील शांतता आपल्याला निसर्गाच्या आणखी जवळ घेऊन जाते.

‘हंदवारा धबधबा’ म्हणजे बाहुबलीतील धबधबा?

मंडळी ‘बाहुबली’ हा चित्रपट आपण सर्वांनी बघितलाचं असेल. आलिशान सेट आणि VFX व्यतिरिक्त चित्रपटाच्या लोकेशनलाही खूप उत्तम प्रतिसाद लोकांचा मिळाला.

चित्रपटात धबधब्याचे दृश्य दाखवण्यात आले आहे जे अतिशय सुंदर दिसते. चित्रपटातील तो सीन पाहिल्यानंतर अनेकांना ठाम सांगितले, की त्याचं शूटिंग हंदवारा धबधब्यावर करण्यात आलेले आहे, परंतू या शुटिंगचे खरे लोकेशन हे रामोजी फिल्मसिटी हेच होते. छत्तीसगडमधील या हंदवारा धबधब्याला बघूनच फिल्मसिटीमध्ये सेट बांधण्यात आलेला होता.

चित्रपट म्हणलं की कॅमेरे आले, सेट आला मोठी टीम आली ते घेऊन निसर्गाच्या सानिध्यात जाणे म्हणजे काहीसे अवघड. त्यात ऊन-पावसाच्या खेळामुळे दिवसांची गणितही अवघड होतात, त्यामुळे दिग्दर्शक राजमौलींनी तो भव्य-दिव्य धबधबा VFX च्या माध्यमातून फिल्मसिटीमध्येच उभारला.

 

waterfall im 1

 

याआधी या धबधब्यावर ‘बाहुबली’ चित्रपटातील पर्वतीय दृश्य दाखवण्यात आले होते. मात्र नक्षलग्रस्त भाग असल्याने अनेक चित्रपट निर्मात्यांना चित्रीकरणाची परवानगी नव्हती. त्यामुळे चित्रपटाचे लोकेशन बदलण्यात आले.

या भागात आधी कधीच पर्यटन नव्हते. या भागातील नक्षलवादी घटना थांबल्यानंतर पर्यटन वाढले हा माओवादग्रस्त भाग मानला जात असला तरी आता घटना थांबल्यानंतर पर्यटकांनी या भागाकडे ये-जा सुरू केली आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून येथे शेकडो पर्यटक येतात, मात्र माओवादग्रस्त भाग असल्याने अजूनही तेथे पर्यटन सुविधांचाही अभाव आहे.

अलीकडेच यासंबंधी काही अधिकाऱ्यांचे पथक येथे पोहोचले होते. तसेच परिसरातील सुविधांच्या विस्ताराच्या शक्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

मंडळी….भारतातही अशी अनेक निसर्गाचे वरदान असलेली स्थळे आहेत जी अजूनही पर्यटकांपासून लांब आहेत. परदेशातील पर्यटनस्थळे मिरवण्यापेक्षा आपणदेखील भारतभ्रमंती करून आपल्या निसर्गाचा आस्वाद घेऊयात!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?