' तुमच्या आवडत्या या १० व्यक्तींची पूर्ण नावं तुम्हाला ठाऊक आहेत का? – InMarathi

तुमच्या आवडत्या या १० व्यक्तींची पूर्ण नावं तुम्हाला ठाऊक आहेत का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सामान्य व्यक्ती असो की दिग्गज मंडळी, प्रतयेकाची ओळख ही त्या व्यक्तीच्या नावामुळेच आधी होते. आपल्या आप्तेष्टांपुरतं, मित्रमैत्रिणी, सहकाऱ्यांपुरतं सीमित असलेलं नाव आपल्या कर्तृत्त्वामुळे त्याहीपलीकडे पोहोचून मोठं व्हावं अशी अनेकांची इच्छा असते. ज्या व्यक्ती जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मोठ्या होतात त्यांच्या नावाला एक वेगळंच वजन येतं.

एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रात स्वतःचं अढळ स्थान निर्माण करते तेव्हा केवळ तिचं नाव उच्चारणंच पुरेसं असतं. त्यापलीकडे त्या व्यक्तीची आणखीन माहिती सांगावी लागत नाही.

कर्तृत्त्ववान मंडळींनी त्यांच्या हयातीत गाजवलेल्या कर्तृत्त्वामुळे त्यांचं नावच अधोरेखित होत असतं. ती नावं आपण मानाने उच्चारतो. पण बऱ्याचदा आपल्या मूळ नावापेक्षा वेगळ्याच नावाने प्रसिद्ध होणारे, नावाच्या संक्षिप्त रूपानेच प्रसिद्ध होणारेही काही सेलिब्रिटीज असतात.

 

ratan tata IM

 

काही जण ज्योतिष्यांच्या सांगण्यावरून, काही जग अंकशास्त्रावरून, काही जण नाव फारच मोठं किंवा उच्चारायला अवघड जाईल असं असतं म्हणून आपल्या नावाच्या संक्षिप्त रूपानेच आपली ओळख लोकांना होऊ देणं पसंत करतात. आडनाव विचित्र आहे म्हणून वडिलांचं नाव लावणारे आणि वडिलांच्या नावाऐवजी आईचं मधलं नाव लावणारेही अनेक सेलिब्रिटीज आज आपल्याला दिसतात.

आपल्याला आश्चर्य वाटेल, पण आपल्या या १० लाडक्या सेलिब्रिटीजची पूर्ण नावं आपल्यातल्या अनेकांना आजवर माहितीच नाहीत. आपल्या नावाच्या संक्षिप्त रूपानेच प्रसिद्ध असलेल्या या सेलिब्रिटीजची पूर्ण नावं आहेत तरी काय? जाणून घेऊ.

१. केके :

इतक्यातच अकस्मात निधन झालेला, रसिकांच्या गळ्यातला ताईत असलेला हा गायक. मिलेनियल जनरेशनचं टिनएज ज्या गायकांच्या आवाजामुळे अधिक सुंदर झालं त्यांच्यापैकी हा एक गायक. केके जरी आपल्यातून शरीराने गेला असला तरी गाण्यांच्या रूपात कायमच आपल्यासोबत राहील.

केके जाऊन दोन तीन दिवस झाल्यानंतरही अनेकांच्या प्लेलिस्टवर त्याची गाणी वाजत असतील. आपल्याला केके ची केके म्हणूनच ओळख असली तरी त्याचं खरं नाव क्रिष्णकुमार कुन्नाथ हे आहे.

 

KK featured IM

 

२. एपीजे अब्दुल कलाम :

एपीजे अब्दुल कलाम हे २००२ मध्ये निवडून आलेले भारताचे ११वे राष्ट्रपती. त्यांनी भारतात वाहन तंत्रज्ञान लाँच केल्यामुळे आणि बॉलिस्टीक क्षेपणास्त्राच्या विकासासाठी काम केल्यामुळे ‘भारताचे मिसाईल मॅन’ अशी ओळख त्यांना मिळाली.

अब्दुल कलाम लोकांचे अतिशय लाडके असल्यामुळे ‘लोकांचे राष्ट्रपती’ असंही त्यांना म्हटलं जायचं. शास्त्रज्ञ असलेल्या आणि भारताचे माजी राष्ट्रपती असलेल्या एपीजे अब्दुल कलाम यांचं पूर्ण नाव अवुल पकिर जैनुलब्दीन अब्दुल कलाम असं आहे.

 

abdul kalam inmarathi

 

३. पीटी उषा :

एक उत्कृष्ट भारतीय धावपटू म्हणून नाव कमावलेल्या पीटी उषा यांचा जन्म केरळमधील कलिकतजवळच्या पाय्योली या गावात झाला असल्यामुळे त्यांना त्यांच्या चाहत्यांनी ‘पाय्योली एक्सप्रेस’ असं टोपणनाव दिलं आहे. १९७६ साली केरळ राज्य सरकारने महिलांकरता क्रीडा शाळेची स्थापना केली तेव्हा उषा यांना त्यांच्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्त्व करण्यासाठी निवडलं गेलं होतं. पीटी उषा यांचं पूर्ण नाव पिलावुळ्ळकण्टि तेक्केपरम्पिल् उषा हे आहे.

 

pt usha im

 

४. आर. के. नारायण :

इंग्रजी साहित्यातील सगळ्यात महान तीन कादंबरीकारांमधले एक म्हणजे आर. के नारायण. आपल्या ६० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आपल्याला उत्तमोत्तम पुस्तकं दिली. ते खासकरून त्यांच्या ‘मालगुडी डेज’ या कलाकृतीमुळे ओळखले जातात. आर. के. नारायण यांचं पूर्ण नाव रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी हे आहे.

 

naryan r k im

 

५. ए. आर. रेहमान :

ए. आर. रेहमान यांचं मूळ नाव एएस दिलीप कुमार आहे हे आपल्यातल्या कित्येकांना माहीत नसेल. आपल्या अद्वितीय संगीतामुळे लोकप्रिय असलेल्या रेहमान यांना त्यांनी चित्रपट आणि रंगभूमीच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे ‘मोझार्ट ऑफ मद्रास’ असा बहुमान मिळाला आहे. ‘गोल्डन ग्लोब अवॉर्ड’ने सन्मानित केले गेलेले ते पहिले भारतीय होते. त्यांचे तामिळ चाहते त्यांना प्रेमाने ‘ईसाई पुयाक’ असं म्हणतात.

 

rehman featured inmarathi

 

‘ईसाई पुयाक’चा अर्थ ‘सांगीतिक वादळ’ असा होतो. १९८४ साली जेव्हा रेहमान यांची बहीण खूपच आजारी होती तेव्हा त्यांची कादिरी इस्लामशी ओळख झाली आणि त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी इस्लाममध्ये धर्मांतर केलं. त्यानंतर त्यांनी आपलं एएस दिलीप कुमार हे नाव बदलून अल्लाह रक्खा रहमान केलं.

६. सी. व्ही. रामन :

सी. व्ही. रामन हे भारतातले एक मोठे भौतिकशास्त्रज्ञ. प्रतिष्ठित अशा नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले ते पहिले भारतीय होते. त्यांनी लावलेला शोध ‘रामन इफेक्ट’ म्हणून ओळखला जातो. सी. व्ही. रामन यांचं पूर्ण नाव सर चंद्रशेखर वेंकट रामन असं आहे.

 

cv-raman-professor-inmarathi
indianexpress.com

७. व्ही. व्ही. एस. लक्ष्मण :

भारताच्या ‘फॅब -फोर’ खेळाडूंपैकी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविडनंतरचं चौथं नाव म्हणजे व्ही. व्ही. एस. लक्ष्मण. व्ही. व्ही. एस. लक्ष्मणला ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा लक्ष्मण भाचा आहे.

 

vvs laxman inmarathi

 

एका माजी भारतीय क्रिकेटरच्या म्हणण्यानुसार लक्ष्मणने ऑस्ट्रेलियात उत्तम खेळ खेळल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार इयन चॅप्पेल याने त्याला ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ लक्ष्मण असं म्हटलं होतं. पण लक्ष्मणचं खरं पूर्ण नाव वांगीपुरपू वेंकट साई लक्ष्मण असं आहे हे कदाचित आपल्यातल्या अनेकांना माहीत नसेल.

८. आर. डी. बर्मन :

बॉलिवूड संगीतकार सचिन देव बर्मन याचे पुत्र असलेले आर. डी. बर्मनही संगीतकार म्हणूनच लोकप्रिय झाले. असं म्हणतात, आर. डी. बर्मन लहानपणी जेव्हा जेव्हा रडायचे तेव्हा पाचव्या स्वराचा जितका आवाज होतो तितक्या जोराने रडायचे. त्यामुळे त्यांना ‘पंचमदा’ असं टोपणनाव मिळालं. आर. डी. बर्मन यांचं पूर्ण नाव राहुल देव बर्मन असं आहे. बंगाली या त्यांच्या मातृभाषेत ते राहुल देब बर्मन असं आहे.

 

rd burman inmarathi

 

९. आय. के. गुजराल :

भारताचे १२वे पंतप्रधान असलेले आय. के. गुजराल हे इंदिरा गांधी आणि एचडी देवे गोंडा यांच्यानंतर राज्यसभेतून निवडून आलेले तिसरे पंतप्रधान होते. इंदर कुमार गुजराल असं त्यांचं पूर्ण नाव आहे.

 

gujral im 1

 

१०. पी. व्ही. नरसिंहराव :

पी. व्ही. नरसिंहराव हे आपले माजी पंतप्रधान. ‘भारतीय आर्थिक सुधारणेचे जनक’ अशी त्यांची ओळख आहे. एपीजे अब्दुल कलाम यांनी “राजकीय प्रणालीपेक्षा देश मोठा आहे असं मानणारे देशभक्त राजकारणी” या शब्दांत त्यांचं वर्णन केलं होतं. ते भारताचे १० वे पंतप्रधान होते आणि ते त्यांच्या कार्यकाळात आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्रीही झाले होते. त्यांचं पूर्ण नाव पामुलापति वेंकट नरसिंह राव असं आहे.

 

p v narsimha rao inmarathi

सेलिब्रिटींच्या नादी लागून एक महाभयानक चूक करताय का? वाचून घ्या – मग ठरवा!

उठसुठ दुबई?! संजय, सलमान, शाहरुख…सर्वांच्या दुबई कनेक्शन मागचं सिक्रेट!

वरच्या दिग्गजांची उदाहरणं पाहिल्यानंतर व्यक्तीचं कर्तृत्त्व मोठं असेल तर व्यक्तीचं पूर्ण नाव माहीत नसतानादेखील ती व्यक्ती सगळ्यांना माहीत असते हेच सिद्ध होतं. जे स्वप्न पाहून ती सोडून न देता त्यांचा ध्यास घेतात ते केवळ आपल्या प्रयत्नांवर, नव्यानव्या गोष्टी आत्मसात करण्यावर आणि आपलं स्वप्न सत्यात कसं उतरेल यावरच लक्ष केंद्रित करतात. त्यांचं नाव मग आपोआपच सर्वश्रुत होतं हेच आपल्याला यातून कळतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?