' जेवणात "वरून मीठ" घेत असाल? तर थांबा! हे वाचा - सावध व्हा!

जेवणात “वरून मीठ” घेत असाल? तर थांबा! हे वाचा – सावध व्हा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मित्रांनो आपल्या आयुष्यात बर्‍याच गोष्टी अशा असतात ज्या नसून अडचण आणि असून खोळांबा अशा असतात. तर काही गोष्टी अशाही असतात की ज्या रोजच्या जगण्यात गरजेच्या असतात. जसे की मीठ. नावडतीचे मीठ आळणी, किंवा खाल्ल्या मिठाला जागावे. ही पूर्वजांची शिकवण आपल्याला मिठाचे महत्व सांगते. पण अति परिचयात अवज्ञा तसेच मिठाचे पण आहे. गरजेपेक्षा थोडे जरी जास्त झाले तरी आपले सारे रुटीन बिनसते. असे काय होते की मीठाचा जास्तीचा वापर आजारपणाला निमंत्रण देतो, याचे उत्तर शोधण्यासाठी चला मीठाबद्दल आणि त्याच्या वापराबद्दल अधिक जाणून घेवू.

खूप वेळाजेवणात मीठ कमी असताना आपण वरून मीठ टाकतो जेणेकरून जेवणाची चव टिकून राहते. काही लोक असे असतात ज्यांना जेवणात मिठाचे भान नसते त्यामुळे ते मुद्दाम जेवणात कमी मीठ घालतात, पण तुम्हाला माहीत आहे का तुमची ही सवय जी रोजचा भाग बनली आहे ती तुमच्या आरोग्यासाठी किती घातक ठरू शकते? जेवणात वरून मीठ टाकण्याची सवय तुम्हाला आजारी देखील बनवू शकते.

 

iodized salt inmarathi

 

भारतीय पद्धतीचा आहार मुळात जरी चौरस आहार मानला जात असला तरी भारतीयांना नमकीन खाण्याची आवड देखील तेवढीच आहे,त्यामुळे आपल्या भारतीयांच्या आहारात पारंपारिकपणे वापरल्या जाणार्‍या लोणचे, पापड, चटणी यामध्ये भरपूर मीठ असते. ठराविक एका वयानंतर आहारातले मीठाचे प्रमाण कमी करणे अपेक्षित असते. तसे न केल्यास आपल्या शरीरातील चयापचय क्रियेवर विपरीत परिणाम होवू शकतो.

जेवणात जास्त मीठ खाल्ल्याने तुमचा रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांना जेवणात मीठ कमी घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

जास्त मीठ खाण्याच्या सवयीमुळे तुमच्या शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या हृदयावर आणि मज्जातंतूंवर खूप वाईट परिणाम होतो. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि रक्त गोठणे तसेच हिमोफिलिया ग्रस्त रुग्णांमध्ये रक्त खूप पातळ होण्याचे प्रमाण वाढू शकते.

 

heart-attack-inmarathi

 

पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया (PHFI) ने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की प्रौढ भारतीयांना जास्त मीठ खाण्याची सवय आहे, जी WHO ने निर्धारित केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. अभ्यासात असे आढळून आले की, दिल्ली आणि हरियाणामध्ये दररोज ९.५ ग्रॅम मीठ आणि आंध्र प्रदेशमध्ये दररोज १०.४ ग्रॅम मीठाचे सेवन केले जाते.

आहारात जास्त प्रमाणात मीठ घेतल्याने रक्तदाबावर घातक परिणाम होतो आणि कालांतराने हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात, तर आहारात मीठ मर्यादित ठेवल्याने हृदयविकार २५ टक्क्यांपर्यंत कमी होतो आणि हृदयाच्या गुंतागुंतांमुळे मृत्यू होण्याचा धोका २० टक्क्यांपर्यंत कमी होतो. आहारातील जास्त मीठ मूत्रपिंडांना कधीही भरून न येणारे नुकसान करू शकते.

 

meal in india
healthifyme

मीठामुळे रक्तदाब वाढतो, या उच्च रक्तदाबामुळे रक्तवाहिन्या कडक होतात, ज्यामुळे रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह कमी होतो आणि त्वचा कोरडी होण्यासोबतच सुरकुत्याही लवकर येऊ शकतात. त्यामुळे व्यक्तीचे वय वाढलेले दिसते. आरोग्यावर इतरही अनेक नकारात्मक परिणाम होतात. मीठ आणि सोडियम हे शब्द अनेकदा परस्पर बदलून वापरले जातात. जरी त्यांचा अर्थ वेगळा आहे.

मीठामध्ये सोडियम आणि क्लोराईड असते. मीठामध्ये असलेले सोडियम तुमच्या हृदयासाठी वाईट असू शकते, तर मीठ जीवनासाठी आवश्यक आहे. डब्ल्यूएचओ ने देखील शिफारस केली आहे की प्रौढ व्यक्तीने दिवसात ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. तेव्हा आहारातील मीठ खाण्यावर नियंत्रण ठेवायचे असेल आणि रक्तदाब व त्यासंबंधित आजारांपसून दूर राहायचे असेल तर काही उपाय आपण नक्की करू शकतो.

 

high BP InMarathi

पुरेसं पाणी न मिळाल्याने शरीर देत असलेल्या या संकेतांकडे दुर्लक्ष करणं महागात पडेल!

जीवघेणा हार्टअटॅक नेहमी रात्री किंवा पहाटेच का येतो?

जसे की तुम्ही रोज वापरत असलेल्या बटर आणि चीजमध्ये बदल करा. मोझारेला चीज वापरण्याचा प्रयत्न करा, (त्यात सोडियमचे प्रमाण खूप कमी आहे. ) सॉल्टेड बटरपेक्षा साधे लोणी वापरणे कधीही चांगले. धणे, अजवाईन (ओवा), पुदिना, ओरेगॅनो, कॅरम बिया आणि तुळस एकत्र घेऊन मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. त्याला ‘हर्ब सॉल्ट’ म्हणतात.

तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते बाजारातूनही विकत घेऊ शकता. जिथे शक्य असेल तिथे पांढऱ्या मीठाऐवजी काळे मीठ वापरा . खाद्यपदार्थांमध्ये वरून मीठ टाकू नका. अशा छोट्या छोट्या उपायांनी तुम्ही आपल्या आहारातील मिठाच्या अति प्रमाणावर नियंत्रण ठेवू शकता.

मित्रांनो अति तेथे माती असतेच, तेव्हा आपल्या निरोगी आरोग्यासाठी खाल्या मिठाला जागत आहारात मिठाला प्रमाणात ठेवा. ” क्या आपके टुथपेस्ट मे नमक है?” असे कोणी विचारलेच तर सरळ एक मोठा नो त्याला दाखवा आणि स्वस्थ खा, मस्त रहा.

===

 

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?