'अगुस्ता वेस्टलँड प्रकरण नेमकं काय आहे? - थोडक्यात महत्वाचं

अगुस्ता वेस्टलँड प्रकरण नेमकं काय आहे? – थोडक्यात महत्वाचं

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

जेव्हापासून भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेतील खासदार सुब्रमणीयन स्वामींनी राज्यसभेत पाऊल ठेवलंय, तेव्हापासून VVIP हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारातील घोटाळ्यावर चर्चा जोराने सुरु झाली. सुब्रमणीयन स्वामी विरुद्ध “देस की बहू” सोनिया गांधी – असं हे युद्ध रंगत आहे.

 

swamy-and-sonia-marathipizza

 

मोठाले आकडे, खरेदी गैरव्यवहार हे आता आम्हा भारतीयांना नवं राहिलं नाहीये ! पण बातम्यांच्या गदारोळात हा घोटाळा नेमका काय आहे हे कधीकधी कळत नाही. No problem…! हे प्रकरण नेमकं काय आहे, हे पुढे थोडक्यात देत आहोत.

प्रकरण थोडक्यात :

VVIP असलेले १२ AgustaWestland AW101 हे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार २०१३ मधे UPA सरकारच्या काळात झाला.

तब्बल ३६ अब्ज रुपयांची खरेदी होणाऱ्या ह्या व्यवहारात अनेक अटींची पूर्तता झाली नाही – उलट हा करार AgustaWestland च्याच खिश्यात पडावा म्हणून अनेक गोष्टी घडवून आणल्या गेल्या, अनेक मंत्री, सैन्य अधिकारी इत्यादींनी ह्यासाठी मोठी लाच घेतली – असा आरोप आहे.

२५ मार्च २०१३ रोजी, तत्कालीन संरक्षण मंत्री A K Antoni ह्यांनी गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार घडल्याची कबुली दिली आणि त्यावर CBI मार्फत जलद कार्यवाही सुरु असल्याचं देखील सांगितलं.

 

akantony_marathipizza
A K Antony

स्त्रोत

ह्या प्रकरणाला नवं वलय प्राप्त झालं ते सुब्रमणीयन स्वामींच्या राज्यसभा एन्ट्री नंतर.

subramaniyan swami laughing marathipizza

 

स्वामींनी पुढील ५ गंभीर आरोप केले आहेत :

१ – केबिनच्या उंचीचा अंतरराष्ट्रीय निकष – १.४५ मी – बदलून १.८ मी करण्यात आला. ह्या निकषात AugustaWestland सोडून इतर कुठलाच पुरवठादार बसत नव्हता. तितकीच मोठी गोष्ट – AugustaWestland ने फक्त ह्याच उंचीचे choppers बनवून ठेवले होते !

 

२ – जे choppers विकत घेतले गेले, त्यांच्यावर फिल्ड टेस्ट्स घेतल्याच गेल्या नाहीत ! त्यांच्या ऐवजी, इटलीमधे दुसऱ्याच choppers वर टेस्ट्स घेऊन मंजुरी दिली गेली. हा IPC च्या सेक्शन ४२० नुसार गुन्हा ठरतो.

 

३ – आधी फक्त ८ च हेलिकॉप्टर घेण्याचं ठरलं होतं. पण जेव्हा AugustaWestland च पुरवठादार आहेत हे पक्कं झालं, तेव्हा आणखी ४ ची ऑर्डर दिली गेली. CAG च्या रिपोर्टनुसार आधीचे ८ हेलिकॉप्टरसुद्धा पूर्ण वापरले जात नव्हते आणि ह्या आणखी ४ साठी १२०० करोड रुपये जास्त मोजावे लागले होते.

 

४ – हवाई दलाने आधी एकूण खर्चाचा अंदाज ७९३ करोड रुपये एवढा सांगितला होता. पण price negotiation committee ने तब्बल सहापट वाढ करून ४८७७.५ करोड रुपयांचं estimate बनवलं – ज्यावर स्वतः Antony ह्यांची स्वाक्षरी होती.

 

५ – ह्या सौद्यातील दलाल  Christian Michel चे वडील अनेक कॉंग्रेस नेत्यांच्या संपर्कात होते. त्यांच्या हस्ताक्षरातील एक चिट्ठी हे स्पष्ट म्हणते की १२५ करोड रुपयांची लाच कुणा “AP” ना दिली गेली होती. ही नोंद इटालियन कोर्टात नमूद आहे. हे AP म्हणजे सोनिया गांधींचे राजकीय सचिव – अहमद पटेल आहेत…असं स्वामींना सुचवायचं आहे.

 

ह्या प्रकरणाला रोज नाट्यमय वळणं येत आहेत…आता वरील माहिती असल्यामुळे तुम्हाला घटनाक्रमाचा track ठेवणं सोपं जाईल.

आगे आगे देखें, होता है क्या…!

फिचर्ड इमेज आणि माहिती: DNA

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 187 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?