' देवदर्शनासाठी तासंतास रांगेत उभे राहणारे भाविक मात्र “या” मंदिरात जायला घाबरतात – InMarathi

देवदर्शनासाठी तासंतास रांगेत उभे राहणारे भाविक मात्र “या” मंदिरात जायला घाबरतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मंदिर म्हणजे एक असे ठिकाण जिथे लोक आपल्या जीवनातील समस्या देवापुढे मांडून त्या दूर कराव्यात म्हणून देवाला प्रार्थना करतात. मंदिर हे एक असे ठिकाण आहे जिथे मनुष्याला सुख, शांती आणि समाधान मिळते.

रोजच्या कटकटींना कंटाळून लोक मन शांत करण्यासाठी मंदिरात जातात, पण याच मंदिराला लोक घाबरू लागले तर काय होईल?

विश्वास बसत नाही ना….पण विश्वास ठेवा कारण भारतात एक असे एक मंदिर आहे जिथे जाण्यासाठी लोक घाबरतात.

उत्तर भारतात हिमाचल प्रदेश राज्यात चंबा प्रांतात भारमोर गावात एक मंदिर आहे जिथे प्रवेश करण्यास भाविक घाबरतात.

हे ही वाचा :

 

yamraj-temple-marathipizza

 

हिंदू पुराणानुसार असे मानले जाते की, हे मंदिर यमाचे निवास्थान आहे. यम म्हणजे मृत्यूचा देवता. याच कारणामुळे लोक या मंदिराकडे जाण्यास घाबरतात.

भारतीय धर्मानुसार यमाची भेट कायमच भितीदायक मानली जाते. त्यामुळे स्वतःहून यमाचे दर्शन घेण्यासाठी कोणताही भारतीय स्वेच्छेने तयार नसतो. धर्मेश्वर महादेव मंदिर, धरमराज मंदिर आणि यमराज मंदिर म्हणून सुद्धा हे मंदिर ओळखले जाते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या भागातील ८४ मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. हे मंदिर एखाद्या घराप्रमाणे दिसते. येथील स्थानिक लोक ह्या ठिकाणाला ‘डोंग-पोडी’ असे देखील म्हणतात. डोंग-पोडी म्हणजे दोन व अडीच पायऱ्या असा होतो.

प्राचीन नोंदीनुसार या मंदिराला चार अदृश्य प्रवेशद्वार आहेत, प्रत्येक प्रवेशद्वार वेगवेगळ्या धातूंनी बनवण्यात आले आहे.

चार वेगवेगळे दरवाजे बनवण्यासाठी सोने, चांदी, लोखंड आणि तांबे वापरण्यात आले असून पुरातन धार्मिक ग्रंथ गरुड पुराणामध्ये या दरवाज्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

हे ही वाचा :

 

garud-purana-marathipizza

 

या भागाला भेट देणारे लोक या मंदिराच्या बाजूने निघून जातात परंतु मंदिरात जात नाहीत. ते मंदिरात जाण्यास घाबरतात. ज्या मनुष्याला या मंदिराला नमस्कार करायचा असेल तर तो मंदिराच्या बाहेरूनच नमस्कार करतो, पण आत जात नाही. या मंदिरामध्ये यमदेवाचा सहकारी असणाऱ्या चित्रगुप्तला सुद्धा मानाचे विशेष स्थान देण्यात आले आहे.

 

yamraj-temple-marathipizza01

 

अशी ही मान्यता आहे की, जो कोणी हिंदू मरतो त्याचा आत्मा या मंदिरात चित्रगुप्तला भेटण्यासाठी येतो. चित्रगुप्त त्याचा चांगल्या आणि वाईट कर्मांचा लेखाजोखा मांडतो.

त्या माणसाच्या चांगल्या आणि वाईट कर्मांच्या नोंदीनुसार यमदेव ठरवतो की त्याचा आत्मा त्या अदृश्य चार दरवाज्यांपैकी कोणत्या दरवाज्याने मंदिरात प्रवेश करणार.

असे हे मंदिर सध्या खूप चर्चेत आहे. कधी या भागात फिरण्यास गेलात तर या मंदिराला नक्की भेट द्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?