' साखरपुड्याला अनामिकेतच अंगठी का घालतात? यामागचं विज्ञान महत्वपूर्ण आहे! – InMarathi

साखरपुड्याला अनामिकेतच अंगठी का घालतात? यामागचं विज्ञान महत्वपूर्ण आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लग्न हा सगळ्यांच्याच आयुष्यातला महत्त्वाचा सोहळा असतो. एक नवंच आयुष्य लग्नानंतर सुरू होतं, पण लग्नाच्या काही काळ आधी होणारा एक महत्त्वाचा विधी म्हणजे साखरपुडा.

लग्न व्हायचं असतं मग त्याआधी साखरपुडा का करतात असा प्रश्न आजवर आपल्याला पडलाही नसेल इतकी लग्नाआधी साखरपुडा करण्याची प्रथा आपल्या डोक्यात पक्की आहे, पण साखरपुडा हे एकप्रकारे जोडीदारांनी एकमेकांना निवडण्यावर झालेलं शिक्कामोर्तब असतं.

साखरपुड्याच्या प्रसंगी मुली डाव्या आणि मुलगा उजव्या अनामिकेत अंगठी घालतात, पण अनामिकेतच अंगठी का घातली जाते? बाकी बोटांमध्ये का नाही? यामागचं कारण आपल्याला माहीत नसतं.

 

rings im

 

अगदी डीडीएलजेमध्ये सुद्धा घरच्यांनी ठरवलेल्या मुलासोबत आपला साखरपुडा परंपरेनुसार होऊ नये म्हणून सिमरन अनामिकेलाच इजा करून घेते. साखरपुड्याची अंगठी अनामिकेतच घालण्यामागे काय हेतू असतो? जाणून घेऊ.

साखरपुड्याला मुलीच्या डाव्या आणि मुलाच्या उजव्या अनामिकेत अंगठी घालण्याची प्रथा पूर्वापार सुरू आहे. मात्र शास्त्रांमध्ये या प्रथेचा उल्लेख आढळून आलेला नाही.

साखरपुड्याला अनामिकेत अंगठी घालण्याची प्रथा रोम आणि ग्रीसमध्ये पहिल्यांदा सुरू झाली. १५व्या शतकात ऑस्ट्रियाच्या आर्चडुक मॅग्झिमिलियन या व्यक्तीने त्याची प्रेमिका मेरी ऑफ बुर्गुंडी हिला पहिल्यांदा साखरपुड्याची अंगठी भेट दिली असल्याची नोंद आहे.

अगदी अमेरिकेसारख्या विकसित देशातही अनामिकेत अंगठी घालायची पद्धत आहे. अनामिकेचा संबंध प्रेरणा, प्रसिद्धीशी असतो. मुलींच्या डाव्या अनामिकेचं त्यांच्या वैवाहिक जीवनात खास महत्त्व असल्याचं मानलं जातं.

 

rings im2

 

अनामिका हे पती-पत्नींमधल्या प्रेम, विश्वास, निष्ठेचं प्रतीक आहे. एकमेकांच्या अनामिकेत साखरपुड्याला अंगठी घातल्यानंतर मुलामुलीमधलं नातं अधिक दृढ होतं असं मानलं जातं.

ही पद्धत त्यांची एकमेकांशी असलेली वचनबद्धता दर्शवते. आपण एकमेकांची आणि आपल्या परिवाराची जबाबदारी घेऊ शकतो ही भावना अंगठी घालून मुलगा मुलगी व्यक्त करतात. अनामिकेत अंगठी घातल्यामुळे एकमेकांविषयी आत्मसमर्पणाची भावना जागृत होते.

साखरपुड्याला अनामिकेत अंगठी घालण्यामागचं पारंपरिक कारण :

 

rings im1

 

शास्त्रीयदृष्ट्या आपल्या भावनांचा संबंध मेंदूतील रसायनांशी असल्याचं म्हटलं गेलेलं असलं तरी पूर्वीच्या काळचे लोक मानवी भावनांचा संबंध हृदयाशी जोडायचे.

परंपरेनुसार अनामिकेची नस ही आपल्या हृदयाशी थेट जोडलेली असते. त्यामुळे अनामिकेत अंगठी घातली की मुलामुलीची हृदयं एकमेकांशी जोडली जातात असं मानलं जातं.

पूर्वीच्या काळचे रोमन लोक अनामिकेच्या नसेला ‘प्रेमाची नस’ असं म्हणायचे. चीनमध्ये आपलं प्रत्येक बोट कुठल्या ना कुठल्या नात्याशी असलेला आपला संबंध दर्शवतं असं समजलं जातं.

अनामिका जोडीदारासाठी असते तर अंगठ्याचा संबंध आईवडिलांशी असलेल्या नात्याशी असतो. तर्जनीचा संबंध भाऊ-बहिणीच्या नात्याशी असतो. मधलं बोटं म्हणजेच मध्यमा स्वतःशी असलेला संबंध आणि करंगळी लहान मुलांशी असलेला संबंध दर्शवते.

शरीरशास्त्राचं आधुनिक काळात आपल्याला असलेलं ज्ञान आपल्या प्रत्येक बोटाची नस हृदयाशी जोडलेली असते त्यामुळे हृदयाशी जोडली गेलेली एक अशी विशिष्ट नस नसते असं सांगतं, पण आजही आपण पारंपरिक पद्धतीनुसार साखरपुड्याला एकमेकांच्या अनामिकेतच अंगठी घालतो.

अनामिकेत अंगठी घालण्यामागचं शास्त्रीय कारण :

 

rings im3

 

अनामिकेत कुठलाही धातू घातल्याने शरीराची प्रणाली स्थिर होते. सोन्याची अंगठी घातल्यावर तिच्या घर्षणामुळे स्त्रियांच्या हृदयावर चांगला परिणाम होतो आणि त्यामुळे जीवनात जोश आणि उत्साह येतो.

साखरपुडा किंवा लग्न होण्यापूर्वी अंगठी घातली तर चालते का?

एका जुन्या कथेनुसार, साखरपुडा किंवा लग्नाआधी अंगठी घालणं आपला भाग्योदय होण्याच्या दृष्टीने चांगलं नसतं, पण आपल्याला आज ही अंधश्रद्धा वाटते आणि कोणाशीही वचनबद्ध नसतानाही आवड म्हणून आज अनेक जण अंगठ्या घालतात.

जर तुम्ही केवळ आवड म्हणून नेमकी अनामिकेतच अंगठी घातलीत तर तुम्ही नात्यात नसतानाही तुम्ही नात्यात आहात असा चुकीचा संदेश लोकांना जाऊ शकतो. त्यामुळे हे करणं आदर्श नाही.

अनामिकेत अंगठी घालण्यामागे जे कारण आहे त्यानुसार खरोखरच साखरपुडा करणाऱ्या मुलामुलींचं भावनिक नातं दृढ व्हावं आणि ते नातं बहरून टिकावं.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?