' पृथ्वीराज सिनेमा यशराज बॅनरच्या हातात गेला नसता तर हा अभिनेता मुख्य भूमिकेत दिसला असता – InMarathi

पृथ्वीराज सिनेमा यशराज बॅनरच्या हातात गेला नसता तर हा अभिनेता मुख्य भूमिकेत दिसला असता

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कट्टर देशप्रेमी, सलमान नंतर सर्वात मोठा चॅरिटी करणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार, अशी एक जनमानसात त्याने आपली प्रतिमा निर्माण केली आहे. मात्र हाच अक्षय कुमार एका मुलाखतीत असं म्हणाला होता की, मंदिरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कशाला दुधाचा अभिषेक करता? आणि एकीकडे हाच अभिनेता स्वतःच्या सिनेमाला यश मिळावे म्हणून काशीच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सोशल मीडियावर सध्या अक्षयच्या या दुप्पटीपणाला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. आधीच कॅनडियन नागरिकत्वावरून तो चर्चेत येत असतोच पण त्याच्या दुट्टपी वागणुकीमुळे प्रेक्षकांच्या मनात नाराजी नक्कीच निर्माण झाली आहे.

 

Akshay Kumar Martial arts im

 

सिंग इज किंग पासून यशाची चव चाखणारा आपला अक्की मागील सलग दोन सिनेमांमुळे पुन्हा एकदा फ्लॉपच्या यादीत जाणार का? अशी चर्चा होती. आता त्याचा पृथ्वीराज हा सिनेमा रिलीज झालाय.

खरं तर या सिनेमामध्ये तो नव्हताच? होय दिग्दर्शकाच्या मनात महान अशा पृथ्वीराज यांच्या भूमिकेसाठी एक वेगळाच अभिनेता डोक्यात होता मात्र गणित फिस्कटलं. कोण होता तो अभिनेता आणि ते गणित का जुळून आलं नाही हे आपण जाणून घेऊयात…

कोणताही दिग्दर्शक, लेखक जेव्हा एखादी कथा लिहतो, वाचतो तेव्हाच त्याच्या डोक्यात त्या त्या भूमिकेसाठी कोण योग्य असेल याची एक लिस्ट असते. मात्र  प्रत्यक्षात जेव्हा सिनेमा बनवायची वेळ येते तेव्हा त्या लिस्टमधील कलाकार असतीलच असे नाही. पृथ्वीराजच्या बाबतीत असच काहीसं झालं.

अक्षयच्या आधी कोणाची वर्णी लागली असती?

सूत्रांच्या म्हणण्यानुसार दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांना पृथ्वीराज यांच्या भूमिकेसाठी सनी पाजी हवा होता. त्यांच्या मोहल्ला अस्स्सी या सिनेमात तो काम करत होता. तेव्हाच त्यांच्या डोक्यात पृथ्वीराज यांच्या जीवनावर सिनेमा बनवायला हवा आणि त्यासाठी सनी देओल हा त्या भूमिकेसाठी योग्य आहे असा त्यांचा दावा होता.

शूटिंग एका सिनेमाचं मात्र त्या सेटवर दुसऱ्याच सिनेमाच्या चर्चा दिग्दर्शक आणि अभिनेत्यामध्ये रंगू लागल्या. हॉलिवूडमध्ये जसं एखाद्या दिग्दर्शकाचे अभिनेत्यासोबतचे ट्युनिंग जुळले की तेच पुढे चालू राहते तोच प्रयोग आपल्याकडे देखील आहे. मनमोहन देसाई- बच्चनजी, महेश भट्ट- संजय दत्त, करण जोहर – शाहरुख खान अगदी मराठीत देखील सचिन – अशोक सराफ.

सूत्रांचं असंही म्हणणं आहे की, द्विवेदी आणि सनी पाजी यांच्यात गोष्टी भरपूर पुढे गेल्या होत्या. आवाजापासून ते लुकपर्यंत सर्व गोष्टी ठरल्या मात्र जेव्हा हा सिनेमा यशराज सारख्या बॅनरकडे गेला आणि गणितं पूर्णपणे बदलली. यशराज बॅनरच्या म्हणण्यानुसार, सनी पाजीपेक्षा जो चेहरा जास्त विकला जाईल असा चेहरा या भूमिकेसाठी हवा आहे.

 

sunny deol inmarathi

 

एकेकाळी गदर, बॉर्डर, इंडियन सारखे हिट सिनेमे देणारा  सनी पाजी या सिनेमातून आउट झाला आणि त्याजागी अक्षय कुमारची एंट्री झाली. अक्षय कुमारच्या सलग हिट सिनेमांमुळे कदाचित त्याला घेतले असावे. सनी आता तसा बराच मागे पडला आहे.

यशराज बॅनर हा तसा निर्मात्यांमधील एक प्रतिष्ठित असा बॅनर, या बॅनरखाली काम करण्यासाठी देशभरातून नवोदित कलाकार स्टुडिओच्या बाहेर इमानेइतबारे सकाळपासून रात्रीपर्यंत थांबलेले असतात. त्यातील एखाद्याच कलाकाराचे नशीब  फळफळते बाकीचे मात्र नवाजसारखे चिवटपणे संधीची वाट पाहत असतात.

 

yashraj im 1

सिनेमा बनवणं ही एक कला आहे. अनेक कलांचे मिश्रण करून एक कलाकृती बनवली जाते. अशी छापील वाक्ये आपण ऐकत आलो आहोत. जेव्हापासून या कलेचे रूपांतर व्यवसायात झाले तेव्हापासून सिनेमाची गणितं बदलत गेली.

कलाप्रेमी दिग्दर्शक जेव्हा आपल्या डोक्यातील गोष्ट जगापुढे आणू इच्छितो मात्र निर्माते मंडळी आपली व्यावसायिक पोळी भाजून घेताना दिसून येतात. मात्र याला दुसरी बाजू देखील आहे, अनेक दिग्दर्शक निर्मात्यांना अक्ष्ररशः गुंडाळतात असं म्हंटलं जातं.

बॉलीवूडमधील कंपूशाही, सिनेमाची आर्थिक गणितं, स्टार किड्स या सगळ्या गोष्टींवर लक्ष देतात मात्र कथा आणि त्याची उत्तम मांडणी या गोष्टी आपसूकच मागे पडत चालल्या आहेत. म्हणूनच कदाचित लोक बॉलिवूड स्टार्सना कंटाळून ओटीटीसारख्या प्लॅटफॉर्मवर नवख्या स्टार्सना स्वीकारत आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?