' उन्हाळ्यात गरम होतंय म्हणून आईस्क्रीम खात असाल तर या गैरसमजातून बाहेर या

उन्हाळ्यात गरम होतंय म्हणून आईस्क्रीम खात असाल तर या गैरसमजातून बाहेर या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कुल्फी असो की कोन अथवा स्लाइस, आइसक्रीम म्हणाले की कोणीही त्याचा आस्वाद घ्यायला एका पायावर तयार असतो. त्यातही फ्रूट कांडी किंवा कसाटा ही आणखी काही लोकप्रिय मंडळी. कारण काहीही असो भरपेट जेवणानंतर रसनेची तृप्ति करणारे थंडगार आइसक्रीम हवेच.

जसजसा उन्हाळा तापत जातो तसतसे आपले आइसक्रीम खाणे वाढत जाते. शास्त्रच असतय ते. पण तुम्हाला हे माहिती आहे का? की थंडावा मिळावा म्हणून आपण जे आइसक्रीम खातो आणि ज्या बर्फापासून ते बनवले जाते तो उष्ण गुणाचा असतो म्हणजे अस बघा की नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा! तर मित्रांनो आईस्क्रीमच पण असच असतंय.

 

eating icecream im

 

उन्हाळ्यात गरमीवर उपाय म्हणून आईस्क्रीम, कुल्फी असे थंड पदार्थ आवर्जून खाल्ले जातात. जसा उन्हाळा वाढेल तशी त्यांची मागणी देखील वाढते परंतु, हे बर्फाचे थंड पदार्थ खरोखरच तुम्हाला थंडावा देतात का?

तुम्हाला आश्चर्य वाटेल की याचे उत्तर नाही असे आहे. उलट अति प्रमाणात आइसक्रीम खाल्ले तर त्याचे अतिसेवन आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांनाही जन्म देऊ शकते. कसे? ते चला पाहूया.

जेव्हा आपण कोणताही पदार्थ खातो तेव्हा आपल्या शरीराची पचनक्रिया सुरू होते. या प्रक्रियेला आहार-प्रेरित थर्मोजेनेसिस म्हणतात. खाल्लेला पदार्थ पचवण्याचे काम शरीर करते यासाठी आपल्या शरीरातील ऊर्जा वापरली जाते त्यामुळे शरीराचे तापमान वाढवते.

काही अन्नपदार्थ जास्त कैलरीचे असतात ते पचण्यासाठी जास्त ऊर्जा शरीराकडून वापरली जाते तर काहींना कमी उर्जा वापरली जाते. याच नियमाप्रमाणे आईस्क्रीम खाताना आपल्याला थंडपणा जाणवतो पण त्यात फॅटचे प्रमाण जास्त असते आणि म्हणूनच ते पचण्यासाठी आपल्या शरीराला जास्त मेहनत घ्यावी लागते.

 

icecream IM

 

यामुळे शरीरात उष्णता वाढते आणि ते गरम होते. परिणामी उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. आईस्क्रीममध्ये साखर, कॅलरीज, फॅट असते, जे आरोग्यासाठी फायदेशीर नाही. त्यामुळे लठ्ठपणा वाढतो.

आइस्क्रीम खाल्ल्याने ट्रायग्लिसराइड्स आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. जर एखाद्याला उच्च रक्तदाब असेल, तर दररोज आणि जास्त प्रमाणात आइस्क्रीम खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

एका संशोधनानुसार, सॅच्युरेटेड फॅट आणि साखरयुक्त आहारामुळे संज्ञानात्मक कौशल्ये आणि स्मरणशक्ती कमी होऊ शकते. मधुमेह असणाऱ्यांनी तर आईस्क्रीमचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

आइस्क्रीममध्ये फॅट जास्त असते, जे पचायला जड असते यामुळे आतड्यांना सूज येणे, अपचन अशी समस्या उद्भवते. रात्री आईस्क्रीम खाल्ल्यानंतर ते लवकर पचत नसल्याने चांगली झोप येत नाही.

 

tea causes digestion inmarathi
harvard health

एकदा का खाल्लेल्या आईस्क्रीमचे विघटन सुरू झाले की, त्याचा कूलिंग इफेक्ट कमी होतो. दुधातली चरबी आणि साखर शरीरात उष्णता निर्माण करते आणि जेव्हा बाहेरचे तापमान जास्त असते तेव्हा ही अतिरिक्त उष्णता आपल्याला थंड ठेवत नाही तर उलट परिणाम करते.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, लाल मिरची देखील थंडावा निर्माण करू शकते. “कायनेन मिरीमध्ये कॅप्सायसिन नावाचा घटक असतो जो घाम ग्रंथींना उत्तेजित करतो आणि आपल्याला थंड वाटू शकते. दुसरीकडे, कॅप्सेसिन थर्मोजेनेसिसला उत्तेजित करते आणि त्याच्या ‘फॅट बर्निंग’ प्रभावासाठी ओळखले जाते.

शरीराला थंडावा मिळावा म्हणून आपण आइसक्रीम खातो पण त्याने आपल्या शरीराची वाढलेली उष्णता कमी होईल या गैरसमजातून बाहेर या. जरी आईस्क्रीममध्ये दूध, चॉकलेट, अनेक प्रकारचे ड्रायफ्रूट्स, चेरी इत्यादींचा वापर केला जात असला, त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे जरी असले तरीही, थंड आईसक्रीमच्या उष्ण गुणधर्मामुळे शरीराचे नुकसानच होऊ शकते.

हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. तेव्हा उन्हाळ्यात गरम होतंय म्हणून आईस्क्रीम खात असाल तर या ठंडा ठंडा कूल कूल वाटणार्‍या गैरसमजातून बाहेर या. शेवटी अति सर्वत्र वर्जयेत हे ही आहेच ना?

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?