' महाराष्ट्रातल्या या गावात आजही भुतांची जत्रा भरते – InMarathi

महाराष्ट्रातल्या या गावात आजही भुतांची जत्रा भरते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जत्रा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? तर माणसांची गर्दी, खेळण्यांपासून खाण्यापर्यंतचे विविध स्टॉल्स, उंच आकाशात जाणारे पाळणे. मात्र महाराष्ट्रात एक जत्रा अशी भरते तिथे काय घडतं? याचा कोणालाच पत्ता नाही. ही जत्रा पिढ्यानुपिढ्या भरत असली तरिही या जत्रेत नेमकं काय घडतं? काय मज्जा चालते? हे बघण्याचं धाडस कोणातही नाही. असं काय आहे या जत्रेत की सामान्य माणूस इथे जायला घाबरतो? असं काय रहस्य दडलं आहे या जत्रेत की जे पिढ्यानुपिढ्या उलटल्या तरीही कळून आलेलं नाही?

सांगितलं तर तुमच्या कानावर तुमचा विश्वास बसणार नाही पण ही जत्रा तुम्ही समजता तशी साधीसुधी नाही. तर ही जत्रा खास आहे. ही जत्रा माणसांची नसून चक्क भुतांची जत्रा आहे. यामागे कोणतीही अंधश्रध्दा न बाळगता लोक पिढ्यानुपिढ्या ही रीत पाळत आले आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

नगरपासून वीस किलोमीटर अंतरावरचं आडगाव! याठिकाणी भैरवनाथाची जत्रा भरते. गावकर्‍यांसह गावापासून दुर गेलेले आणि गावाच्या आजूबाजूच्या खेड्यांत रहाणारे मोठ्या हौसेनं जत्रेत सहभागी होतात. मात्र ही जत्रा संपली आणि सूर्य कलू लागला की सगळ्यांना घरची ओढ लागते. अंधार व्हायच्या आत सगळी बांधाबांध होऊन लोक घाईनं पांगतात.

 

temple im

 

सूर्यास्तानंतर कोणीही इथे थांबत नाही. बाहेरुन आलेली मंडळी आपापल्या गावची वाहनं पकडून निघून जातात तर ग्रामस्थ मंदिर परिसर सोडून गावात जातात. भैरवनाथाच्या जत्रेच्या दुसर्‍या दिवशी कोणीही गावकरी या मंदिराकडे फिरकत नाहीत. याचं कारण त्या रात्री भैरवनाथाच्या मंदिरात भुतांची जत्रा भरते असा समज आहे. मात्र अंधश्रध्दा म्हणून स्तोम न माजवता ग्रामस्थ एक प्रथा म्हणून हिचं पालन करत आले आहेत.

या गावाच्या आणि याठिकाणच्या मंदिराबाबतही अख्यायिका प्रचलीत आहे. नगर जिल्ह्यातील आडगाव हे याठिकाणच्या पुरातन भैरवनाथ मंदिरामुळे परिचित आहे. इतक्या छोट्या गावात हे पुरातन मंदिरही एक आश्चर्यच मानले पाहिजे. हे मंदिर अगदी छोटे असले तरिही टुमदार आहे.

या मंदिरात कसलाही शिलालेख आढळत नाही मात्र याठिकाणी मंदिर बांधकामासाठी ज्या महाकाय शिळा, दगड यांचा वापर केलेला आहे तो बघता हे कोणा असामान्य शक्तींनी बांधलेले मंदिर आहे याची खात्री पटते. पुराणातील नोंदींनुसार आगडमल, रतडमल आणि देवमल अशा तिन राक्षसांनी मिळून हे मंदिर बांधलं असल्याचं मानलं जातं.

 

temple 1 im

 

या परिसरात असणार्‍या आडगाव, रतडगाव आणि देवगाव या तीन गावांच्या नावांवरुन या मान्यतेला पुष्टी मिळते. याखेरीज या मान्यतेला दुजोरा देणारी आणखीन एक गोष्ट म्हणजे जी इतरत्र दिसत ती अशी की मंदिराच्या प्रवेशद्वारावर चक्क तीन राक्षसांच्या मुंडक्यांची चित्रं कोरलेली आहेत.

 

rakshas im

 

मंदिराच्या गाभार्‍यात काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेच्या मूर्ती असून त्या हलविता येत नाहीत. या मंदिराशेजारीच एक कडुनिबांचे झाड आहे, ज्याची पानं चवीला गोड आहेत. या झाडाला निंबोळ्या येत नसल्यानं याचं दुसरं रोपही तयार झालेलं नाही.

हे मंदिर किती जुनं आहे याचे कोणतेही उल्लेख नाहीत मात्र मंदिर परिसरात निस्पृह बाबांची गादी आहे आणि बाबांचे निधन झाल्यानंतर त्यांची मंदिर परिसरातच समाधी बांधण्याची पध्दत आहे. अशा २४ समाधी याठिकाणी आढळतात त्यावरुन हे मंदिर किमान २४ पिढ्या जुनं असल्याचं सांगितलं जातं.

माणसांच्या जत्रेनंतर भुतांची जत्रा भरणारं हे एकमेव ठिकाण आहे. भुतांची जत्रा म्हणजे नेमकं काय घडत असावं? या कुतुहलापोटी आजवर अनेकांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र त्याला यश आलेलं नाही.

 

ghost im

 

गावकर्‍यांनी आणि मंदिराचा कारभार पहाणार्‍यांनी ही जत्रा, ही प्रथा का पाळण्यात येऊ लागली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्या प्रथेचा कोणाच कसला त्रास नाही, ज्यातून समाजाला काही हानी नाही ती पाळण्यात काही गैर नसल्याच्या भावनेतून आजही ही प्रथा पाळली जाते.

ही प्रथा चूक की बरोबर? यावर मतमतांतरे असू शकतात. मात्र उपलब्ध संदर्भांच्या आधारे केवळ माहिती म्हणून हा लेख देण्यात आला आहे. कोणतीही अंधश्रद्धा पसरवणे किंवा कोणत्याही जाती-धर्माच्या परंपरा, रुढी, श्रद्धा यांचा अनादर करणे किंवा त्याबाबत गैरसमज पसरवणे हा त्यामागील उद्देश नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?