' ३५ रुपयांचा रिफंड, ५ वर्षांची चिकाटी आणि अखेर न्यायव्यवस्थेची माघार!!

३५ रुपयांचा रिफंड, ५ वर्षांची चिकाटी आणि अखेर न्यायव्यवस्थेची माघार!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘डोंबिवली फास्ट’ हा चित्रपट सगळ्यांनाच आठवत असेल. एका सामान्य माणसाच्या संघर्षाची कहाणी यात पाहायला मिळते. कोल्ड्रिंकच्या बाटलीसाठी २ रुपये अधिक आकारले म्हणून थेट दुकानाची तोडफोड करणारा तोच सामान्य माणूस एका प्रसंगात पाहायला मिळतो. मात्र प्रत्येकवेळी न्याय मिळवण्यासाठी हे असं आक्रमक आणि हिंसक व्हावं लागत नाही.

एखादी चुकीची रक्कम आकारली गेली असेल तर संयम राखून आणि न्यायाने लढून सुद्धा हे पैसे परत मिळवता येतात. एवढंच नाही, तर यातून इतरांचा सुद्धा फायदा होऊ शकतो. अशीच एक घटना नुकतीच घडली आहे. ३५ रुपयांसाठीच्या हक्काची एक लढाई आज जाणून घेऊया.

 

sandip-kulkarni-dombivli-fast-inmarathi
worthitt.com

पाच वर्षांपूर्वीचं ट्रेन तिकीट

कोटा येथे राहणार इंजिनियर सुजित स्वामी याने पाच वर्षांपूर्वी रेल्वेचं एक तिकीट काढलं होतं. काही कारणाने प्रवास करणं शक्य नसल्यामुळे त्याने तिकीट कॅन्सल केलं. मात्र रेल्वे प्रशासनाने त्या तिकिटावर लावलेला सर्विस चार्ज परत केला नाही. प्रवास केलेला नसल्याने, स्वामी यांना त्यांचे हे ३५ रुपये परत हवे होते. त्यांनी प्रशासनाकडे तशी मागणी केली. ती मागणी मान्य न झाल्यावर सुरु झाली एक कायदेशीर लढाई!

 

sujit im

 

आधी आला ३३ रुपयांचा रिफंड

२०१७ साली स्वामी यांनी कोटा ते दिल्ली प्रवासाचं ७६५ रुपये किंमतीचं तिकीट काढलं होतं. हे तिकीट कॅन्सल केल्यानंतर त्यांचे ६५ ऐवजी १०० रुपये कापून उर्वरित ६६५ रुपयांचा रिफंड मिळाला. मात्र त्यावेळी जीएसटी लागू झालेला नसल्याने ३५ रुपये सर्विस चार्जेस कापले जाणं योग्य नव्हतं.

याविषयी माहिती मिळवण्यासाठी आरटीआयचा वापर स्वामी यांनी केला त्यांची ही लढाई ३ वर्षं सुरु होती. १ मे २०१९ रोजी त्यांना ३३ रुपयांचा रिफंड मिळाला. मात्र असं असूनही त्यांनी उरलेल्या २ रुपयांसाठी लढाई सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. हे ३५ रुपये परत करताना राऊंडेड ऑफ किंमत म्हणून २ रुपये कापण्यात आले होते.

 

ticket im 1

 

या लढाईत स्वामी यांना नुकतंच यश मिळालं असून, २ रुपये रिफंड होणार असल्याचा मेल त्यांना आला आहे. एवढंच नाही, तर त्यांच्या आरटीआयचं उत्तर देताना जवळपास ३ लाख ग्राहकांना ही ३५ रुपयांची रक्कम रिफंड केली जाईल असं सांगितलं गेलं आहे. म्हणजेच स्वामी यांच्या पाच वर्षांच्या लढाईची आयआरसीटीसीला मोजावी लागणारी किंमत ही साधारणपणे ३ कोटींच्या घरात जाणारी आहे. त्यांना त्यांचे उर्वरित २ रुपये सुद्धा परत मिळाले आहेत.

५० आरटीआयचा लाखो ग्राहकांना फायदा…

सुजित स्वामी यांनी रेल्वे प्रशासनाला अनेक पत्र लिहिली. एवढंच नाही, तर एक-दोन नव्हे तब्बल ५० आरटीआय यांनी फाईल केले. यातून मिळालेली माहिती अशी होती, की जवळपास ३ लाख ग्राहकांकडून अशापद्धतीने सर्विस टॅक्स कापून घेण्यात आला आहे. यातील काही ग्राहकांनी तर एकापेक्षा अधिक वेळा तिकिटं काढून कॅन्सल केली आहेत.

 

railway-ticket-queue-inmarathi

 

या सगळ्या ग्राहकांचे मिळून अडीच कोटी रुपयांची रक्कम रिफंड करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. म्हणजेच स्वामी यांची एकट्याची लढाई अनेकांसाठी फायदेशीर ठरली आहे.

ट्विटरचा सुद्धा उपयोग…

इतक्या ग्राहकांचे प्रत्येकी ३५ रुपये कापण्यात आले आहेत, हे स्वामी यांना आरटीआयमधूनच समजलं होतं. ही माहिती मिळाल्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून आपली लढाई लढण्याचा सुद्धा त्यांनी निर्णय घेतला होता. पंतप्रधान, रेल्वे मंत्री, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, वित्तमंत्री आणि जीएसटी कौन्सिल अशा सगळ्याच ट्विटर हॅण्डल्सना सातत्याने टॅग करून त्यांनी याविषयी सतत विचारणा सुरूच ठेवली.

 

twitter inmarathi

जोडप्याच्या बेडरूममधले ते किळसवाणे प्रसंग समोर आणणारा ‘लाईव्ह’ घटस्फोट खटला!

लग्नानंतरचा बलात्कार : न्यायाधीशांमध्ये भांडणं लावणारा ३० देशांमधील ज्वलंत विषय

ट्विटरवरील त्यांच्या या लढाईची सुद्धा दखल घेतली गेली आहे, असंच म्हणायला हवं. कारण सगळ्यांनाच रिफंड मिळायला हवा यासाठी त्यांनी सतत सुरु ठेवलेल्या ट्विट्सचा फायदा आज झालेला दिसत आहे. पाच वर्षांची चिकाटी, न्याय मिळवण्यासाठी दाखवलेला संयम आणि जिद्द याच्या जोरावर आज स्वामी यांनी हक्काच्या लढाईत विजय मिळवला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?