' पाकिस्तानच्या लोकांना भगतसिंग आणि मंगल पांडे बद्दल काय वाटतं? - उत्तर निराशाजनक आहे

पाकिस्तानच्या लोकांना भगतसिंग आणि मंगल पांडे बद्दल काय वाटतं? – उत्तर निराशाजनक आहे

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

भारत आणि पाकिस्तान हे दोन देश १५ ऑगस्ट १९४७ ला अस्तित्वात आले. पण महत्वाची गोष्ट ही आहे, की ह्या अस्तित्वात येण्यासाठी सर्व जनतेने एकमेकांसोबतच लढा दिला होता.

दोन्ही देशांचा स्वातंत्र्यलढा आणि त्याहूनही आधीचा भौगोलिक इतिहास एकच आहे.

मग ते १८५७ चं “पाहिलं स्वातंत्र्यसमर” असो…

 

mangal pandey marathipizza

ज्याचं आवाहन मंगल पांडेंनी केलं होतं…

की…

त्या नंतरचे स्वातंत्र्य प्राप्तीचे अगणित प्रयत्न असोत…

 

bhagat singh marathipizza

…जे करणाऱ्यांत भगतसिंग अग्रणी होते…

ह्या सर्व प्रयत्नांत आजच्या भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही भागातील लोकांचा सहभाग होता.

भगतसिंग सध्या पाकिस्तानात असलेल्या बंगचेच…!

एवढा दृढ संबंध असूनसुद्धा आज ह्या दोन्ही देशांचं वर्तमान खूपच दुरावलेल्या अवस्थेत आहेत.

पण…ह्या इतिहासाबद्दल पाकिस्तानला काय वाटत असेल? तिथल्या लोकांना हा इतिहास भारतीय लोकांइतकाच “आपला” किंवा “भूषणावह” वाटतो का?

क्वोरावर ह्या प्रश्नाचं उत्तर मोठं निराशाजनक मिळालं आहे.

 

साद कियानी, हा पाकिस्तानी तरुण म्हणतो :

पाकिस्तानी तरुण, भगतसिंग आणि मंगलपांडेंना फारसे मानत नाहीत – कारण त्यांना ते माहितीच नाहीयेत ! स्वातंत्र्यानंतर दोन्ही देश वेगवेगळ्या रस्त्यांवर पुढे गेले आहेत. त्यामुळे फाळणी आधीचा इतिहास एकच जरी असला तरी त्यांचे “हिरो” बदलले गेले आहेत.

 

पण एक गोष्ट साद आवर्जून नमूद करतो :

एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की पाकिस्तानी लोक काश्मिरी आणि पंजाबी लोकांशी स्वतःला relate करू शकतात. कारण आजसुद्धा त्यांना काश्मिरी आणि पंजाबी लोक म्हणजे “सीमेच्या पलीकडचे आपलेच लोक” वाटतात. पण पंजाब आणि काश्मिर सोडून पलीकडच्या भारताबाबत पाकिस्तान अनभिद्न्य आहे.

 

साद ला ह्याच कारणामुळे मंगल पांडेंपेक्षा भगतसिंग “आपला” वाटतो – कारण –

भगतसिंग मूळचे पाकिस्तानचेच…त्यामुळे ते मला आपलेसे वाटतात. पण मंगल पांडेंना मी ओळखतही नाही.

 

हजारो वर्षांच्या इतिहासाची घट्ट वीण असूनसुद्धा फाळणीमुळे आपण किती दुरावलो आहोत…ह्याचं हे झणझणीत उदाहरण आहे…!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 173 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?