' ‘नवऱ्याला कसं मारावं?’ हे या बाईने पुस्तकातून सांगतानाच चक्क प्रात्यक्षिकही करून दाखवलं – InMarathi

‘नवऱ्याला कसं मारावं?’ हे या बाईने पुस्तकातून सांगतानाच चक्क प्रात्यक्षिकही करून दाखवलं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

”नवऱ्याचा खून कसा कराल?” वाक्य एक क्षणभर का असेना टेन्शन आणतं ना.. पण एका अमेरिकन स्त्रीने या नावाचं पुस्तक लिहिलं आहे. आणि आश्चर्य म्हणजे तिचा नवरा तसाच मेलेल्या अवस्थेत सापडला आहे. अर्थात ही कथा बॉलिवूडच्या सिनेमांना शोभेल मात्र ही कोणतीही काल्पनिक गोष्ट नसून हा सगळा भयंकर प्रकार सध्या घडला.

 

murder inmarathi
dnaindia.com

 

कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट स्वप्नात दिसते. त्याआधी आपण ती कधीही पाहिलेली नसते, अनुभवलेली नसते. पण काही दिवसांनी.. महिन्यांनी ती गोष्ट, ती घटना, तो अनुभव आपण सत्यात पाहतो, अनुभवतो. याला देजावू असं म्हणतात.

आपल्या मनाच्या ताकदीचा कदाचित आपल्यापण अंदाज नसतो. पुुढे घडणाऱ्या गोष्टी त्यानं आधीच आपल्याला दाखवलेल्या असतात. खूप वेळा आपल्याला स्वप्ने पडतात. एक अशीही मान्यता आहे की, स्वप्नं आपल्याला भावी घटनांची पूर्वकल्पना देतात.

पण म्हणून नवऱ्याचा खून करायच्या वेगवेगळ्या पद्धती फक्त काल्पनिक खेळ म्हणून लिहाव्यात आणि खरोखर नवरा त्याच प्रमाणे मृतावस्थेत सापडावा, याला काय म्हणायचे?

जे. के. रोलिंग्जने हॅरी पॉटर असाच एका कॅफेटेरिया मध्ये बसून रंगवला आणि हॅरी पॉटरच्या गोष्टी जगभरात प्रसिद्ध झाल्या. जे. के. रोलिंग्जला पैसा, प्रसिद्धी सारं काही मिळालं. पण नॅन्सी क्राँप्टन ब्राॅफी या बाईची कथा फारच भयंकर ठरली.

अमेरिकेतील ७१ वर्षीय लेखिका नॅन्सी क्राँप्टन ब्राॅफी या बाईवर तिच्या पतीची हत्या केल्याचा आरोप ठेवून स्थानिक न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. आपल्या पतीची जून २०१८ साली हत्या केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.

 

nancy im

 

नॅन्सी ब्राॅफी ही ब्लाॅग लिहिते. तिचा नवरा डॅनियल हा एका कुकिंग इंस्टीट्यूट मध्ये शिकवायचा. त्यांचा २७ वर्षांचा संसार होता. पण एक दिवस अचानक त्याच्या विद्यार्थ्यांना तो हायस्कूलच्या किचनमध्ये मेलेल्या अवस्थेत सापडला. त्याचा मृतदेह रक्ताने माखला होता.

त्याला कुणीतरी गोळ्या घातल्या होत्या. हे तंतोतंत तिनं तिच्या ब्लाॅग मध्ये लिहिलं होतं तसंच घडलं. आणि खूनी कोण? तर संशयित म्हणून नॅन्सीला अटक करण्यात आली आणि बहुतेक पुरावे तिच्या विरोधात होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

खरंतर लग्नानंतर अनेक वर्षात या जोडप्याचं कधीही भांडण झाले नव्हतं. कायमच एकमेकांसोबत वावरणारं, प्रेम करणारं जोडपं अशी त्यांची ओळख होती.

 

couple im

 

काही काळापुर्वी तिने एक ब्लाॅग लिहिला होता त्याचं शीर्षक होतं, How to murder your husband म्हणजे तुमच्या नवऱ्याचा खून कसा कराल? या ब्लाॅग मध्ये नॅन्सी क्राँप्टनने पाच हत्यारांचा उल्लेख केला होता जी खून करण्यासाठी वापरता येऊ शकतील. आणि पाच हेतू ज्यामुळे खून होऊ शकतो हे ही लिहिले होते.

खरंतर नॅन्सी आधी प्रेमकथा, प्रणयकथा लिहायची. ती अतिशय आर्थिक अडचणीत सापडली होती. तिचा नवरा डेनियल ब्राॅफीच तिला हवी तशी लाईफस्टाईल देऊ शकत नव्हता. त्यातून हा खुनाचा प्रकार घडल्याचं शाॅन ओव्हरस्ट्रीट या तिच्या विरोधी वकीलांनी सांगितले आहे. त्या अनुषंगाने त्यांनी पुरावे पण सादर केले आहेत.

हा ब्लॉग नॉन्सीच्या विरोधात पुरावा म्हणून मानला गेला. पण नॅन्सीने सांगितले, ते फक्त लिखाणासाठी प्रेरणा म्हणून तिनं लिहिलं होतं.

 

nancy 1 im

 

आश्चर्य म्हणजे, ज्या पिस्तुलाने डॅनियलची हत्या झाली ते पिस्तूल गहाळ झाले. याशिवाय डॅनियलचा खूप मोठ्या रकमेचा विमा उतरवण्यात आला होता. आणि त्याची हत्या करुन नॅन्सीला ती रक्कम मिळवायची होती म्हणून हा खून तिने केला आहे असा दावा पोलिसांनी केला आहे.

तर आपली आर्थिक चणचण त्याच्या हत्येपूर्वीच संपली होती असा दावा नॅन्सी केला आहे. तिच्या मते तिचा ब्लाॅग वाचला तर त्यामध्ये कितीतरी लूप होल्स आहेत. म्हणजे ती कथा परिपूर्ण नाही.

त्यात कितीतरी भोंगळ चुका झाल्या आहेत आणि असा भोंगळ कथेचा प्लाॅट वापरून कुणी खून वगैरे करु शकतो का? कोणाही नामी संपादकांनी ती कथा वाचली तर त्यात ज्या उणिवा आहेत त्या ते सांगू शकतील. मग अशा ढिसाळ कथेचा वापर करून मी खून का करेन? असा तिने युक्तीवाद केला आहे.

नॉन्सीने आपल्या कथेमध्ये नवरा बायकोचे चांगले असलेले नाते कसे बिनसत जाते हे रंगवले आहे आणि कोणाला कसलाही संशय येऊ न देता पती किंवा पत्नीला कसं संपवायचं याचा उत्तम मार्ग कोणता हे पण सांगितले आहे. नंतर तिने आणखी एक कादंबरी लिहिली तिचं नाव द राँग काॅप. याची नायिका रोज आपल्या नवऱ्याला मारायचे वेगवेगळे प्लॅन मनात करत असते.

तर द राँग हजबंड या कादंबरीची नायिका स्वतःच्या हत्येचा बनाव रचून तिला त्रास देणाऱ्या नवऱ्याच्या तावडीतून सुटायचा प्रयत्न करते.

 

nancy book im

 

या दोन कादंबऱ्यांच्या नंतर तिसरी वादग्रस्त ठरलेली कादंबरी जिनं तिला तिच्या नवऱ्याचा खून करणारी स्त्री म्हणून पुढं आणलं ती कादंबरी How to murder your husband! या कादंबरीत तिने आपल्या पतीच्या हत्येची सुपारी गुंडांना देऊ नका असा सल्ला दिला आहे. कारण ते पोलिसांपुढे तुमचं नांव सांगून तुम्हाला पकडून देऊ शकतात.

प्रियकरावरही विश्वास ठेवू नका. त्यानेही तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्याला विष घातले तर तुरुंगात जाऊ शकता. मग एखाद्या हत्याराने त्याला संपवावे वाटले तरीही ते हत्यार चालवायचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे असेही तिने लिहिले होते.

या कथेतील नवरा बायकोचे संबंध आर्थिक अडचणींमुळे दिवसेंदिवस कटू बनत गेले आणि त्यानंतर या कथेतील बायकोने नवऱ्याचा खून करायचा प्लॅन केला असे कथानक आहे. नॅन्सीचे आयुष्य पण समांतरपणे तीच कथा जगत होते. सुरुवातीला चांगले असलेले तिचे आणि डॅनियलचे संबंध अत्यंत तणावपूर्ण झाले होते. त्यातच अचानक डॅनियलचा खून करण्यात आला. आणि संशयाची सुई अर्थातच नॅन्सीकडे गेली.

परिस्थितीजन्य पुराव्यानुसार तिला अटक करण्यात आली. तिच्यावर खटला भरण्यात आला! तिला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. तिचे वकील याविरोधात अपील करणार आहेत.

खूपदा, लेखक कथा लिहितो त्या त्याच्या अनुभवावर आधारित असतात. कथेचे बीज इतरत्र सापडले तरी तो त्यावरून कथा फुलवतो पण त्यात त्याचे विचार डोकावत असतात.

त्यानुसार नॅन्सी ब्राॅफी हिचे कथानक, परिस्थिती सगळे एकमेकांशी जुळते आहे. आता काळच याचं उत्तर देईल… खरंच नॅन्सी दोषी आहे का?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?