' परफेक्शनिस्ट की कॉपीबहाद्दर? आमिर खानची कारकीर्द बघून हा प्रश्न का पडू नये? – InMarathi

परफेक्शनिस्ट की कॉपीबहाद्दर? आमिर खानची कारकीर्द बघून हा प्रश्न का पडू नये?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कितीही नवे स्टार्स आले, कितीही वाद झाले तरी शाहरुख, सलमान आणि आमीर या खान त्रयीचं स्टारडम आजही कायम आहे. या तिघांचेही असंख्य चाहते आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून आमीर खानकडे इतर दोन खान पेक्षा वेगळा असलेला, चोखंदळपणे भूमिका निवडणारा आणि अभ्यासू अभिनेता म्हणून पाहीलं जातं.

इंडस्ट्रीत येऊन काही वर्षं झाल्यानंतर त्याने खूप जास्त चित्रपट करण्यापेक्षा मोजकेच पण दर्जेदार चित्रपट निवडायला सुरुवात केली. आमीरला मिळालेलं घवघवीत यश बघता त्याने चित्रपटांची केलेली निवड किती अचूक होती हे वेळोवेळी सिद्ध झालेलंच आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आशयघन चित्रपटांची मेजवानी देण्यासोबतच आमीरने सामाजिक प्रश्नांनाही हात घातल्यामुळे जनमानसात त्याची प्रतिमा अधिकच चांगली झाली. रसिकांनी त्याला ‘परफेक्शनीस्ट’ म्हणायला सुरुवात केली. ‘असहिष्णूते’च्या वादामुळेही तो चर्चेत आला. तरीदेखील, त्याला मिळालेली ‘परफेक्शनीस्ट’ ही बिरुदावली त्याच्याकडे कायम राहिली.

बऱ्याच काळानंतर आमीरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येतोय. हा चित्रपट खरंतर ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. बऱ्याच दिवसांपासून लोक ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटाच्या प्रतीक्षेत होते. मात्र, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर मूळ चित्रपटात काम केलेल्या टॉम हँक्स या अभिनेत्याशी आमीरची तुलना करत लोक त्याला सध्या प्रचंड ट्रोल करत आहेत.

 

aamir khan inmarathi

 

या परफेक्शनीस्ट अभिनेत्याने केवळ ‘लाल सिंग चड्ढा’ याच हॉलिवूडचा रिमेक असलेल्या चित्रपटात काम केलेलं नाही. आमीरच्या आजवरच्या कारकिर्दीतले त्याचे तब्बल १२ चित्रपट हे कुठल्या ना कुठल्या चित्रपटांचे रिमेक आहेत. कुठले चित्रपट आहेत हे? जाणून घेऊ.

१. दिल है के मानता नहीं :

१९९१ साली आलेला महेश भट्ट दिग्दर्शित ‘दिल है के मानता नहीं’ हा चित्रपट १९३४ साली आलेल्या ‘इट हॅपन्ड वन नाईट’ या हॉलिवूड चित्रपटाचा अनऑफिशियल रिमेक होता. आमीर खान आणि पूजा भट्टने या चित्रपटात कामं केली होती.

 

dil im 1

 

२. जो जिता वही सिकंदर :

आमीर खानच्या लोकप्रिय चित्रपटांपैकी एक असलेला हा चित्रपट. १९९२ साली आलेला हा चित्रपट १९७९ साली आलेल्या ‘ब्रेकिंग अवे’ या हॉलिवूड चित्रपटावरून घेतलेला होता. ‘जो जिता वही सिकंदर’मध्ये आमीर खानबरोबर पूजा बेदी, दीपक तिजोरी आणि आयेशा झुल्का यांनीही कामं केली होती. मन्सूर खान यांनी ‘जो जिता वही सिकंदर’चं दिग्दर्शन केलं होतं.

 

aamir khan inmarathi

 

३. हम है राही प्यार के :

१९९३ साली आलेला ‘हम है राही प्यार के’ हा चित्रपट १९५८ साली आलेल्या ‘हाऊस बोट’ या हॉलिवूड चित्रपटाचा अनऑफिशियल रिमेक होता. महेश भट्ट यांनी ‘हम है राही प्यार के’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं आणि आमीर खानने या चित्रपटाच्या पटकथेचं सहलेखन केलं होतं. कुणाल खेमू आणि जुही चावलाने या चित्रपटात बालकलाकारांच्या भूमिका साकारल्या होत्या.

 

hum hain im

 

४. बाझी :

१९८८ साली आलेल्या ‘डाय हार्ड’ या कल्ट हिट सिनेमावरून १९९५ साली आलेला ‘बाझी’ हा ऍक्शन थ्रिलर घेतला होता. आशुतोष गोवारीकरने या चित्रपटाचं शूटिंग केलं होतं. आमीरबरोबर या चित्रपटात आशिष विद्यार्थी, ममता कुलकर्णी, मुकेश रिशी आणि परेश रावल हे सहकलाकार होते.

 

baazi im

 

५. आतंक ही आतंक :

१९७२ साली आलेल्या ‘द गॉडफादर’ या लोकप्रिय चित्रपटाचा हा रिमेक होता. १९९५ साली आलेल्या ‘आतंक ही आतंक’ या चित्रपटाचं दिलीप शंकर यांनी दिग्दर्शन केलं होतं. आमीर खानने या चित्रपटात अल पासिनोच्या ‘मायकल कॉर्लीऑनची भूमिका साकारली होती. सुपरस्टार रजनीकांत या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होते.

 

aatank im

 

६. अकेले हम अकेले तुम :

हा चित्रपट ‘क्रामर व्हर्सेस क्रामर’ या १९७९ साली आलेल्या ‘अकादमी पुरस्कार विजेत्या’ चित्रपटाचा रिमेक होता. ११९५ साली आलेला ‘अकेले हम अकेले तुम’ हा चित्रपट मन्सूर खान यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात आमीर खान बरोबर मनीषा कोईरालाने भूमिका साकारली होती.

 

akele im

७. गुलाम :

आमीर खानचा हा एक अतिशय गाजलेला चित्रपट. हा चित्रपट रिमेकचा रिमेक होता. १९५४ साली आलेल्या मार्लन ब्रॅंडो अभिनित ‘ऑन द वॉटरफ्रंट’ या चित्रपटाचा १९८८ साली महेश भट्ट यांनी ‘कब्जा’ हा चित्रपट काढून रिमेक केला. संजय दत्तने या चित्रपटात काम केलं होतं. ‘गुलाम’ हा याच चित्रपटाचा रिमेक. ‘गुलाम’ या चित्रपटाचं दिग्दर्शन विक्रम भट्ट यांनी केलं होतं. मुकेश भट्ट या चित्रपटाचे निर्माते होते. आमीर खान, राणी मुखर्जी, शरत सक्सेना यांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या.

 

ghulam im 1

 

८. मन :

१९९९ साली आलेल्या ‘मन’ हा चित्रपट १९५७ साली आलेल्या ‘ऍन अफेअर टू रिमेंबर’ या हॉलिवूड चित्रपटावरून घेतला होता. इंद्रा कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मन’ या चित्रपटात आमीर खान, मनीषा कोईराला आणि अनिल कपूरने भूमिका साकारल्या होत्या. ‘मन’ चा क्लायमॅक्स ‘ऍन अफेअर टू रिमेंबर’ पेक्षा वेगळा होता.

 

man im 1

 

९. रंग दे बसंती :

आमीरचा हा चित्रपट रसिकांनी चांगलाच डोक्यावर घेतला होता. २००६ साली आलेला हा चित्रपट दुसऱ्या कुठल्या चित्रपटाचा रिमेक असा नाही. पण विद्यार्थ्यांच्या समूहाने नाटक/डॉक्युमेंट्री तयार करणं ही कल्पना १९८९ साली आलेल्या ‘जिजस ऑफ मॉन्ट्रिअल’ या चित्रपटावरून प्रेरित होऊन घेतल्यासारखी वाटते.

राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट १९४८ साली आलेल्या ‘ऑल माय सन्स’ या चित्रपटावरून प्रेरित होऊन बनवला असल्याचं जाणवतं.

 

rang de basanti im

 

१०. फना :

आमीर खान आणि काजोल यांची भूमिका असलेल्या २००६ साली आलेल्या ‘फना’ या चित्रपटाचा उत्तरार्ध १९८१ साली आलेल्या ‘आय ऑफ द नीडल’ या हॉलिवूड चित्रपटावरून  आणि १९९९ साली आलेल्या ‘शिरी’ या कोरियन चित्रपटावरून घेतला असल्याचं जाणवतं.

 

fanna im

११. गजनी :

२००८ साली आलेला ‘गजनी’ हा चित्रपट याच नावाच्या तमिळ चित्रपटाचा रिमेक होता. गजनी या चित्रपटात आमीर खान, असीन, जिया खान, प्रदीप रावत यांनी भूमिका साकारल्या होत्या. ‘गजनी’ नावाच्या ज्या तामिळ चित्रपटावरून हा चित्रपट घेतला होता तो चित्रपट २००० साली आलेल्या ख्रिस्तोफर नोलानच्या ‘मेमेंटो’ या चित्रपटावरून घेतला होता.

 

ghajani im

 

१२. धूम ३ :

धूम फ्रँचाइजमधला हा २०१३ साली आलेला तिसरा चित्रपट. २००६ साली आलेल्या ‘ख्रिस्तोफर नोलान’च्या ‘द प्रेस्टिज’ या चित्रपटावरून हा चित्रपट घेतला होता. आमीर खानच्या आजवरच्या कारकिर्दीचा आलेख चढताच असल्याचं आपल्या लक्षात येतं.

 

dhoom 3 im

आमिरच्या ‘परफेक्शनची’ खिल्ली उडवणारे हे ५ चित्रपट खुद्द आमिरही विसरणार नाही!

बॉलिवूडमधील रंगभेदामुळे अंधारात राहूनही स्वबळावर स्टारडम मिळवणारा कलाकार!

आमीरच्या इतर चित्रपटांप्रमाणेच ‘लाल सिंग चड्ढा’ही आपलं नाणं बॉक्स ऑफिसवर खणखणीत वाजवणार की नाही आणि समीक्षकांकडून वाहवा मिळवणार की नाही हे पाहण्यासाठी वाट पाहावी लागेल. पण या स्टार कलाकाराचे इतके सिनेमे हे दुसऱ्या मूळ कलाकृतींचे रिमेक होते हे लक्षात आल्यावर आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?