' सिद्धु मुसेवालाच्या मारेकऱ्याने यापुर्वी सलमानला ठार मारण्याचा प्लॅन केला होता...

सिद्धु मुसेवालाच्या मारेकऱ्याने यापुर्वी सलमानला ठार मारण्याचा प्लॅन केला होता…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जी घटना घडायची असते ती कुणीही थांबवू शकत नाही असं आपण म्हणतो. काय घडणार आहे याचा अंदाज नसताना एखादी घटना अकस्मात घडते आणि लोकांना हादरवून सोडते. लोकप्रिय पंजाबी गायक आणि रॅपर असलेल्या सिद्धू मुसेवालाच्या इतक्यातच झालेल्या हत्येबाबत हेच म्हणता येईल.

मात्र ज्या मारेकऱ्याने सिद्धू मुसेवालाला ठारं केलं त्यानेच यापुर्वी बॉलिवूडच्या दबंगला खल्लास करण्याचा बेत आखला होता. त्यासाठी त्याने मास्टर प्लॅनही तयार केला होता, मात्र सल्लुभाईचं नशिब बलवत्तर म्हणून यातून तो सहीसलामत सुटला.

 

salman khan im

 

पंजाबमधील मनसा जिल्ह्यातील त्याच्याच गावात दिवसाढवळ्या काही अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. इतक्या तरुण कलाकाराची हत्या झाल्यानंतर यावर नेमकी कशी प्रतिक्रिया द्यावी या संभ्रमात त्याचे चाहते आणि लोक आहेत.

कॅनडात राहणाऱ्या गोल्डी बरार या फरारी गँगस्टरने फेसबुक पोस्टद्वारे या हत्येची जबाबदारी घेतली आहे. गँगस्टर गोल्डी हा दिल्लीतील तिहाड़ जेलमध्ये बंद असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा विश्वासू साथीदार आहे. बऱ्याच काळापासून सिद्धू मुसेवाला हे बिश्नोईच्या टोळीचं लक्ष्य होतं असं वृत्त समोर आलंय.

 

goldy im

 

आपल्याला हे वाचून आश्चर्य वाटेल पण याच गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने चक्क सलमान खानच्या हत्येची योजना आखली होती. गँगस्टर बिश्नोई आणि त्याच्या टोळीविषयी आणि सलमान खानची हत्या करण्याची योजना त्याने का आखली होती याविषयी जाणून घेऊ.

बिश्नोई आणि त्याच्या टोळीविषयी :

लॉरेन्स बिश्नोईचा जन्म १२ जानेवारी १९९३ रोजी पंजाबमधील फिरोजपूर येथे झाला होता. बिश्नोईचे वडील एकेकाळी हरियाणाचे पोलीस कॉन्स्टेबल होते. बिश्नोईने पंजाब विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली. मात्र, त्यानंतर तो वाईट मार्गाला लागला. बेकायदेशीर धंदे करायला त्याने सुरूवात केले.

 

bishnoi im

 

कॉलेजमध्ये २००९ साली बिश्नोईची गोल्डीशी ओळख झाली. बिश्नोई त्याच्या गॅंगबरोबर व्हॉट्सऍपवरून संपर्कात असतो. व्हॉट्सऍप वरून सुपाऱ्या घेतल्या जातात आणि हत्या घडवून आणल्या जातात. आपला साथीदार असलेल्या कॅनडास्थित गोल्डी बरारसोबत बिश्नोई काम करतो. एकदा हत्या घडवून आणली की ते फेसबुकवर आपला गुन्हा कबूल करतात.

संपूर्ण देशभरात या गँगचं नेटवर्क पसरलेलं आहे. या गॅंगमधल्या साथीदारांची संख्या ७०० च्या वर आहे. पंजाबखेरीज राजस्थान, दिल्ली, हरियाणा मध्येही ही गॅंग काम करते. बिश्नोईच्या नावावर ५ डझनांपेक्षा जास्त खटले आहेत.

सलमान खानला जीवे मारण्याची दिलेली धमकी :

लॉरेन्स बिश्नोई ‘बिश्नोई’ समाजातील आहे. बिश्नोई समाजात काळया हरणाला खूप पवित्र मानलं जातं. काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानचं नाव समोर आल्यावर बिश्नोई समाजाने काळवीट शिकार प्रकरणासंदर्भात सलमान खान विरोधात खटला जारी केला होता.

 

salman im

 

२०१८ साली काळवीट प्रकरणामुळे बिश्नोईने जेलमधून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर बिश्नोईच्या एका साथीदाराला अटकही केली गेली होती. बिश्नोईने सलमानला ही धमकी दिल्यानंतर त्याची सुरक्षा वाढवली गेली. बिश्नोईच्या टोळीने सलमानला मारण्याची योजना आखली होती.

‘रेडी’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी ते सलमान खानवर हल्ला करणार होते. मात्र त्यावेळी लॉरेन्स बिश्नोईला आपल्याला हवं ते हत्यार न मिळाळ्यामुळे हा प्रसंग घडायचा टळला.

सिद्धू मुसेवालाची हत्या :

बिश्नोई आणि गोल्डीच्या सांगण्यानुसार सिद्धू मुसेवालावर २९ मे रोजी दिवसाढवळ्या ३० गोळ्या झाडल्या गेल्या. तिहाड़ जेलमध्ये हत्येचा कट रचला गेला. बिश्नोईच्या टोळीकडून सिद्धूला वारंवार धमक्या मिळत होत्या.

 

siddhu im

 

पोलिसांनी या खटल्यासंदर्भात आरोपी शाहरुख याला अटक केली आहे. शाहरुख या आरोपीने पोलिसांना गँगस्टर बिश्नोई आणि गँगस्टर गोल्डीची नावं सांगितली. चौकशीदरम्यान ८ नावं समोर आली आहेत. या संदर्भात आपलं एन्काउंटर पोलीस करतील अशी शक्यता बिश्नोईला वाटतेय.

बिश्नोईवर हत्येव्यतिरिक्त दारू माफिया, पंजाबी गायक आणि अभिनेत्यांकडून बेकायदेशीर वसुली केल्याचेही आरोप आहेत.

सिद्धू मुसेवालाच्या हत्येसंदर्भातले पुढचे तपशील काय आहेत हे बातम्यांमधून समोर येईलच. एखादा गुंड जेलमध्ये बंद असतानाही हे सगळं कसं घडवून आणत असेल असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. पण ही अशी कट-कारस्थानं, गुंडांचं विश्व सामान्यांच्या आकलनापलीकडचंच असणार आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?