' रेल्वे रुळांवर सराव ते गुजरात टायटन्स विजयाचा शिल्पकार! नेहराचं उतार-चढावांचं जीवन!

रेल्वे रुळांवर सराव ते गुजरात टायटन्स विजयाचा शिल्पकार! नेहराचं उतार-चढावांचं जीवन!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मे महिन्याच्या अखेरच्या रविवारी आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा अंतिम सामना पार पडला. गुजरात टायटन्स या नव्या संघाने पहिल्याच वर्षी विजेतेपद मिळवलं आणि या संघाची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु झाली.

जो संघ सर्वाधिक उत्तम खेळला तोच जिंकला हा तर या चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा होताच मात्र त्याच बरोबर चर्चा रंगली ती संघाचा कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याची मुंबई इंडियन्सने हार्दिकला संघात रिटेन न करणं, त्याला कर्णधारपद भूषवण्याची मिळालेली संधी, त्याने चांगली कप्तानी करणं आणि त्याच बरोबरीने उत्तम कामगिरी करत संघाला अंतिम सामन्यात विजय मिळवून देण्यात उचलली महत्त्वाची भूमिका हे आता चर्चेचे विषय ठरत आहेत.

 

gujrat titans IM

 

हार्दिक पंड्याचं भरभरून कौतुक तर होतंच आहे, मात्र आणखी एका भारतीय गोलंदाजाचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होतंय. जिकडेतिकडे त्याच्या नावाची चर्चा रंगली आहे.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, बाकीची मंडळी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत असताना, नुसतंच कागद पेन घेऊन संघाचे डावपेच रचणारा आणि संघाला विजेतेपदापर्यंत पोचवणारा प्रशिक्षक म्हणून एक नाव घेतलं जाऊ लागलं. अगदी बरोबर; आशिष नेहरा त्याचं नाव.

आप तो छा गए नेहराजी…

आशिष नेहरा आणि त्याचं तंत्रज्ञानापासून काहीसं दूर असणं हे नेहमीच चर्चिलं जातं. सोशल मीडियाचा वापर न करणं, स्मार्टफोनच्या जमान्यातही साधा कीपॅडचा फोन वापरणं यातून त्याचा साधेपणा अनेकदा दिसून आला आहे. वेळोवेळी याविषयी त्याने वाच्यताही केली आहे.

तंत्रज्ञान आणि नेहरा यांचं फारसं कधी जमलं नाही. मात्र असं असूनही यश मिळवण्यात नेहराने कुठेही कमतरता ठेवली नाही. त्याच्या यशाचं रहस्य म्हणजे त्याची मेहनत.

 

ashish nehra IM

 

लहान असल्यापासूनच क्रिकेटप्रति असणारं प्रेम त्यासाठी अपार कष्ट घेण्याची तयारी यातून आशिष नेहरा घडला.

आज बाकीचे प्रशिक्षक लॅपटॉपसह इतर अद्ययावत तंत्रज्ञान सोबतीला घेऊन बसलेले असतानाही केवळ कागद-पेन घेऊन उत्तम डावपेच रचू शकणार नेहरा आज पाहता येऊ शकतो याला त्याची ही मेहनत कारणीभूत आहे.

केवळ हरभजन सिंगशी मैत्री :

नेहरा, हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग आणि आकाश चोपडा या चौघांनी जवळपास एकाच काळात पदार्पण केलं.

आशिष नेहराने जेव्हा पदार्पण केलं, त्यावेळी त्याला संघातील इतर खेळाडू फारसे ओळखतही नव्हते. त्याची केवळ हरभजनशी ओळख होती आणि पहिल्या श्रीलंका दौऱ्यावर तो फक्त हरभजनसोबतच असे.

 

harbhajan and ashish nehra IM

असा सुरु झाला आशिषचा नेहराजी होण्याचा प्रवास…

२९ एप्रिल १९७९ ला आशिषचा जन्म झाला. सेहवागसोबत स्कूटरवर रोज फिरोझ शहा कोटला गाठण्याचे त्याचे अनेक किस्से तर प्रत्येक क्रिकेट चाहत्याने अनेकदा ऐकलेले असतात. दिल्ली रणजी संघात छाप पाडल्यानंतर १९९९ साली नेहराला श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पणाची संधी मिळाली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पहिल्या सामन्यात अवघा एक गडी बाद करणाऱ्या नेहराला फारशी छाप पाडता आली नाही. पुढे २००१ साली त्याला वनडे पदार्पणाची सुद्धा संधी मिळाली. २००३ च्या विश्वचषकात अंतिम फेरीत पोचलेल्या गांगुलीच्या शिलेदारांपैकी एक दमदार गडी होता आशिष नेहरा!

एक चांगला गोलंदाज असूनही, सातत्याने दुखापतींच्या कारणांमुळे त्याला संघात कायम स्थान टिकवणं फारच अवघड गेलं. असं असूनही, जवळपास सर्वच विश्वचषकांमध्ये स्थान मिळवत त्याने पुनरागमन करणं म्हणजे काय असतं हे दाखवून दिलं.

आयपीएल कारकीर्द…

एखाद्या गोष्टीमधील सातत्य आणि आशिष नेहरा यांचं काही फार जमलं नाही असंच म्हणायला हवं. असंच काहीसं आयपीएलच्या सुरुवातीला त्याचं आणि त्याच्या संघाचं झालं. त्याची नाव एका संघाकडून दुसऱ्या संघाकडे ढकलली जात राहिली. सतत नवे किनारे गाठत राहिली.

आधी मुंबई इंडियन्स, मग दिल्ली डेअरडेव्हिल्स, त्यानंतर पुणे वॉरियर्स असा त्याचा प्रवास झाला. पुणे वॉरियर्स संघ आयपीएलमधून बाहेर पडल्यावर तो पुन्हा दिल्लीच्या संघाचा भाग झाला.

 

nehraa IPL IM

 

त्यानंतर दोन वर्षं चेन्नई संघाचा सदस्य असलेला नेहरा पुढे सनरायझर्स हैदराबादच्या ऑरेंज आर्मीचा सुद्धा एक भाग होता. त्याच्या आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघात सुद्धा स्थान मिळवलं आणि भारताचं प्रतिनिधित्व करताना नव्या दमाच्या गोलंदाजांना मार्गदर्शन सुद्धा केलं.

रेल्वेच्या रुळांवर सुद्धा प्रॅक्टिस…

आशिष नेहराने त्याच्या अनेक जुन्या आठवणी जेतेपदाची निमित्ताने जाग्या केल्या. गुडगावला राहणाऱ्या प्रशिक्षकांना रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी नेहरा जात असे. चार-पाच मुलांची ही तुकडी नेहमीच या कामावर रुजू असे.

क्रिकेटचा किडा अंगात असल्यावर क्रिकेटपासून दूर तरी कास राहणार नाही का? नेहरा आणि त्याचे हे मित्र यावेळी चक्क रेल्वेच्या पटरीवर खेळ सुरु करत. चेंडू म्हणून दगडांचा वापर करत त्यांची क्रिकेटची प्रॅक्टिस रेल्वे रुळांवर रंगत असे.

आशिष नेहराबद्दल काही मनोरंजक माहिती..

१. वनडे सामन्यात दोनवेळा ६ गडी बाद करणारा एकमेव भारतीय गोलंदाज :

वनडे सामन्यात ५ गडी बाद करणं ही तशी कठीणच बाब! मात्र नेहराने एकदा नव्हे तर चक्क दोनवेळा ६ गडी बाद करण्याची कामगिरी करून दाखवली आहे. २००३ साली विश्वचषकात २३ धावांत ६ ब्रिटिश फलंदाजांना तंबूत धाडण्याची कामगिरी तर सगळ्यांना ठाऊक असते.

 

ashish nehra 2 IM

 

मात्र त्यानंतर दोन वर्षांनी २००५ साली त्याने ५९ धावांत लंकेच्या ६ खेळाडूंना घरचा रस्ता दाखवला होता.

२. पाच आयपीएल संघांचा सदस्य :

सुरुवातीला मुंबईत इंडियन्स, २०११ आणि १०१२ या वर्षात दिल्ली, त्यानंतर पुणे वॉरियर्स, २०१४ आणि २०१५ साली चेन्नई आणि २०१६ पासून पुढे सनरायझर्स हैदराबाद अशा पाच संघांचा सदस्य म्हणून नेहरा आयपीएल खेळला आहे.

३. नेहरा आणि नोकिया… :

सोशल मीडियावर जबरदस्त हिट असणारा आशिष नेहरा स्वतः मात्र सोशल मीडियाचा वापरच करत नसे.

नोकियाचा जुना फोन वापरणाऱ्या आशिष नेहराने केवळ गरज म्हणून व्हॉट्सऍप शिकायला सुरुवात केली होती. तीदेखील फारच उशिराने, हे वेगळं सांगायला नको. तो वर्तमानपत्र सुद्धा फार वाचत नाही बरं का मंडळी…

गुजरातच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेहराविषयीची ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा.

===

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?