' वडिलांनंतर आता ईडीच्या रडारवर मुलगा? चिनी व्हिसा प्रकरण नक्की आहे तरी काय?

वडिलांनंतर आता ईडीच्या रडारवर मुलगा? चिनी व्हिसा प्रकरण नक्की आहे तरी काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

माणूस एकदा गाळात रुतायला लागला की कितीही काही करा त्याचे बाहेर पडणे अवघड होते आणि तो त्या गाळात रुततच जातो. पैसा, पद, सत्ता आणि भ्रष्टाचार यांचा गाळ देखील असाच आहे. त्यात भले भले अडकले आणि रूतले पण त्या गाळात अडकणार्‍यांची संख्या काही कमी होत नाही, यातले लेटेस्ट नाव म्हणजे माजी गृहमंत्री पी चिदम्बरम यांचे पुत्र व काँग्रेसचे खासदार ‘कार्ती चिदंबरम’.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सध्या ईडीने अशा गाळात अडकलेल्या लोकांसाठी खोदकाम सुरू केले आहे त्यातून नवनवे घोटाळे आणि स्कैंम्स बाहेर पडत आहेत. त्यातलाच मनी लॉंडरिंग किंवा लाचखोरीचा एक घोटाळा म्हणजे ‘चीनी व्हीसा प्रकरण’. आता ख्या देशातून चिन्यांना बॉयकॉट करण्याची मोहीम चालू असताना चिन्यांना व्हिसा वाढवून देणे म्हणजे आक्रितच नाही का? पण काय होते हे चीनी व्हिसा प्रकरण? जाणून घेऊया स्टोरी मागची स्टोरी.

 

karathi im

 

काय आहे नक्की प्रकरण :

तर, मित्रांनो काही दिवसांपूर्वी बेकायदेशीर व्यवहार आणि बेहिशोबी मालमत्ते प्रकरणी सीबीआयने एकाच वेळी कार्ति कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित ११ ठिकाणी धाड टाकली होती. त्याचवेळी २५० चिनी नागरिकांना व्हिसा देण्यासाठी ५० लाख लाच घेतल्याच्या आरोपाखाली सीबीआयने गुन्हा आणि कोर्टात खटला दाखल केला होता.

 

ED im 2

 

कार्ती यांच्याशी संबंधित ११ ठिकाणांवर कारवाई केल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीय भास्कर रमणलाही सीबीआयने अटक केली होती. सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार २०११मध्ये, जेव्हा पी, चिदम्बरम गृहमंत्री होते, तेव्हा शेडोंग इलेक्ट्रिक पॉवर कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन या चिनी कंपनीला पंजाबमधील मानसा येथे पॉवर प्लांट बांधण्यासाठी तलवंडी साबो पॉवर लिमिटेडकडून कंत्राट मिळाले होते.

 

power plant im

 

पॉवर प्लांटच्या बांधकामासाथी झालेला उशीर आणि काम पूर्ण न केल्याने होणारा मोठा दंड टाळण्यासाठी अतिरिक्त चिनी तज्ज्ञ आणण्याची सेप्कोला नितांत गरज होती. परंतु गृह मंत्रालयाने मर्यादित संख्येने व्हिसा जारी केल्यामुळे सेप्को चीनी तज्ज्ञ आणू शकले नाहीत. त्यामुळे टीएसपीएलचे उपाध्यक्ष विकास मखरिया यांनी पी चिदंबरम यांचे निकटवर्तीय भास्कर रमन यांच्याशी संपर्क साधला असता भास्कर रमन यांनी ५० लाखांच्या मोबदल्यात काम करून देण्याचे आश्वासन दिले.

त्यानंतर चिनी कंपनीच्या २६३ तज्ज्ञांच्या व्हिसाची मुदत वाढवण्यात आली व मुंबईतील बेल टूल्स लिमिटेड या कंपनीला बनावट पावत्यांद्वारे ५० लाख रुपये पाठवण्यात आले आणि तेथून ही रक्कम भास्कर रमन आणि कार्ती चिदंबरम यांच्यापर्यंत पोहोचली.

सीबीआय च्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की हे प्रकरण वेदांत समूह कंपनी तलवंडी साबो पॉवर लिमिटेड (टीएसपीएल) च्या एका उच्च अधिकाऱ्याने कार्ती आणि त्याचा जवळचा सहकारी एस भास्कररामन यांना ५० लाख रुपयांची लाच दिल्याच्या आरोपांशी संबंधित आहे. ‘टीएसपीएल’ पंजाबमध्ये पॉवर प्लांट उभारत होती.

 

visa extension inmarathi

मनी लॉन्ड्रिंग ते हत्येचे आरोप: पाकिस्तानचा भावी पंतप्रधान म्हणून यांच्याकडे बघितलं जातंय

ED म्हणजे काय? त्यांची नोटीस येणं म्हणजे नक्की काय, त्याचे काय परिणाम होऊ शकतात? – वाचा

सीबीआय कडे कार्ती चिदम्बरम यांच्या विरोधात भक्कम पुरावे असल्याचे संगत सीबीआय ने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या विरोधात कोर्टातही खटला दाखल केला आहे. त्यांचे वडील पी चिदंबरन यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले होते.

हे काय कमी होते? म्हणून आता कार्ती ईडी च्या रडारवर देखील आले आहेत. ईडीने देखील कार्ती यांच्याविरोधात चीनी व्हिसा प्रकरणी गुन्हा दाखल करत कार्ती यांच्यासमोरील अडचणी वाढवल्या आहेत. आता याची यथावकाश चौकशी होईल. दोषींवर कारवाई होईल, सध्या सुपात असलेले कांलांतराने जात्यात येतील पण या निमित्ताने एक मात्र सिद्ध झाले की जो चिन्यांच्या नादाला लागला त्याचा कार्यभाग बुडाला…पटत नसेल तर विचारा राजपक्षेना…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?