' दुसऱ्या महायुद्धानंतर कुणाच्याही नकळत जपानने घडवून आणली एक जागतिक क्रांती! – InMarathi

दुसऱ्या महायुद्धानंतर कुणाच्याही नकळत जपानने घडवून आणली एक जागतिक क्रांती!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जपान आणि तंत्रज्ञान यांचं एक वेगळंच नातं आहे. जगातील एकमेव अणुहल्ल्याचा फटका महायुद्धात जपानला बसला. हिरोशिमा आणि नागासाकी ही महत्त्वाची शहरं बेचिराख झाली. तरीही आज जपान प्रगत देशांच्या यादीत फार वरच्या स्थानावर विराजमान आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

याचं कारण आहे त्यांच्याकडील तंत्रज्ञान! हे विकसित तंत्रज्ञान गाड्यांच्या क्षेत्रात दिसलं नसतं, तरच नवल. जपानमधील गाड्यांचं हे तंत्रज्ञान इतकं प्रगत आहे, की जगभरातील लोकांना ते पसंत आहे. या पसंतीची नेमकी कारणं काय आहेत, ती आज जाणून घेऊयात.

 

japan nuclear attack inmarathi
en.wikipedia.org

 

दर्जेदार ऑटोमोबाईल इंडस्ट्री

जपानचं आकारमान आणि तिथल्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा विचार केला, तर ती फारशी मोठी नाही हे आपल्या लक्षात येईल. मात्र तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करून कार निर्मिती करणाऱ्या जगातील मोठ्या देशांच्या यादीत स्थान मिळवण्याचं काम जपानने केलं आहे.

उत्तम दर्जा असणारी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेली गाडी घ्यायची असेल, तर जपानी कार या यादीत अगदी सहज फिट होते. सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने, जपानी गाड्यांवर असलेला विश्वास अधिक दृढ झाला आहे.

 

automobile im

 

कार घेणाऱ्या कुठल्याही ग्राहकाच्या चेकलिस्टमध्ये असतील अशा सगळ्या मुद्द्यांच्या बाबतीत जपानी गाड्या खऱ्या उतरतात. चांगल्या दर्जाच्या इंजिनसह गाडी सौंदर्यपूर्ण दिसायला हवी याची काळजी घेतली जाते.

एक निकड म्हणून गरजेच्या सर्व फीचर्स असलेली गाडी निवडणारा ग्राहकवर्ग आणि निव्वळ छानछोकी म्हणून शो-ऑफ करणारा ग्राहकवर्ग या दोघांच्याही गरजा पूर्ण करणं जपानी गाड्यांना जमतं. म्हणून या गाड्यांना अधिक पसंती आहे असं म्हणता येईल.

जगभरातून मागणी वाढली तरी कशी?

साधारण १९ व्या शतकापासून जपानमध्ये गाड्यांची निर्मिती होऊ लागली. मात्र जपानमधील गाड्या जगभरात चर्चेत आल्या ते म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर, दुसऱ्या महायुद्धाने खरे तर जगाला खूप काही दिले.

 

japan car im

 

दुसऱ्या महायुद्धानंतर जपानला अर्थव्यवस्था वाढवण्याची गरज होती आणि त्यांनी ते वाहने तयार करण्यास सुरवात केली. निस्सान, टोयोटा, इसुझू सारख्या कंपन्यांनी जापनीज आर्मीला ट्रक बनवून दिले होते. तसेच दशकानुसार तंत्रज्ञानातं बदल करून पूर्ण जगभरात आपल्या गाड्या विकायला सुरवात त्यांनी केली.

जपानी गाड्या पसंत असण्याची आणखीही काही तांत्रिक आणि व्यावहारिक कारणं आहेत, तीदेखील समजून घेऊयात.

१. तंत्रज्ञान आणि समाधान याविषयी विश्वास

जपानी गाड्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत उत्तम ठरतात. याशिवाय या गाड्यांमधून प्रवास करताना, लांबचा प्रवास सुद्धा सुखकर वाटतो. म्हणजेच कुठल्याही प्रवासाला जाताना एक विश्वास प्रवाशाच्या मनात असतो.

जगभरात अनेक ठिकाणी गाड्या निर्यात केल्या जात असल्यामुळे, कुठल्याही प्रकारच्या रस्त्यांवर योग्यरीत्या चालवल्या जाऊ शकतील अशारितीने गाड्या बनवल्या जातात.

 

japan car im 1

 

२. सुरक्षा

कार घेताना आपली आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षा हादेखील ग्राहकाच्या मनातील कळीचा मुद्दा असतो. प्रवासात दुर्दैवाने अपघात झालाच, तर आपण सुरक्षित राहावं यासाठी असणारे आधुनिक सेफ्टी फीचर्स गाडीत असावेत अशी अनेकांची इच्छा असते.

जपानी तंत्रज्ञान याबाबतीत उत्तम ठरतं. लहान आणि तुलनेनं कमी किंमतीच्या गाड्या सुद्धा अधिक सुरक्षित असाव्यात अशापद्धतीने बनवल्या जातात.

 

japan im 9

 

३. दर्जा :

अत्याधुनिक आणि उत्तम दर्जाची मशिनरी वापरणं ही जपानी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची ओळख आहे. सर्वोच्च दर्जाचे धातू वापरण्यात येत असल्याने गाडी अधिक टिकाऊ ठरते.

 

japan car im 3

 

४. सुयोग्य किंमत

तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून दर्जेदार गाडी बनवत असतानाही, किंमत अवास्तव वाढणार नाही याची काळजी जपानी मंडळी घेत असतात. सुरक्षा आणि दर्जा या गोष्टींवर पुरी उतरणारी गाडी सुद्धा सुयोग्य किंमतीत ग्राहकाला मिळेल असा त्यांचा प्रयत्न असतो.

याशिवाय सेकंड हॅन्ड गाडी घेणाऱ्यांसाठी सुद्धा, इतर देशांमधून अशी गाडी विकत घेणं आणि आयात करणं फार सोपं आहे. अनेक देशातील लोकांसाठी हा आकर्षणाचा एक मुख्य मुद्दा ठरतो.

 

japan car im 6

 

५. परफॉर्मन्स

इंधनाचा योग्य वापर करून कमीत कमी इंधनात अधिक चांगला परफॉर्मन्स देणं ही जपानी कार्सची खासियत आहे. इंधनाचा योग्य वापर करत असल्यामुळे तुमचे पैसे वाचवण्याचं काम जपानी कार उत्तमप्रकारे करते. चांगला परफॉर्मन्स आणि इंधनाचा कमी खर्च या बाबी जपानी तंत्रज्ञानाची कार आवडण्यासाठी महत्त्वाच्या ठरतात.

 

japan car im 4

 

६. गाड्यांची व्हरायटी

गाडी घेणारी व्यक्ती अनेकदा चोखंदळ असते. कुठली गाडी घ्यावी, त्यात काय फीचर्स आहेत, कुठल्या गाडीमध्ये मला उपयोगी ठरणारे फीचर्स आहेत, कुठली गाडी मला आणि माझ्या कुटुंबाला सोयीची आहे, कुठली गाडी मला अधिक आवडेल असे अनेक विचार गाडी घेण्याआधी केले जातात.

जपानी गाड्या मोठी व्हरायटी देत असल्यामुळे, अनेक पर्याय पडताळून पाहणं आणि आपल्या चेकलिस्टला पूरक अशी गाडी घेण्याचं समाधान मिळणं शक्य होतं.

 

japan car im 5

 

७. जुन्या गाड्यांना उत्तम किंमत

गाडी वापरून मन भरलं आणि नवी गाडी घेण्याची वेळ आली, की आधीच्या गाडीचं काय करायचं या प्रश्नाचं बहुदा एकच उत्तर असतं. जुनी गाडी सेकंड हॅन्ड म्हणून कुणाला तरी विकणं, अथवा कंपनीला नव्या गाडीच्या बदल्यात जुनी गाडी देऊन नव्या गाडीची किंमत कमी करून घेणं. या दोन्ही बाबतीत जपानी तंत्रज्ञानाची गाडी अव्वल ठरते. सेकंड हॅन्ड गाडीला योग्य आणि मनाजोगती किंमत मिळणं शक्य असतं.

 

japan im 6

जपानमध्ये अशा जुन्या गाड्या पुन्हा विकल्या जातात. या गाड्या कमी किंमतीत उपलब्ध होतात. याशिवाय या गाडीची स्थिती नेमकी कशी आहे, हे जाणून घेणं तुम्हाला सहजशक्य असतं. एक रिपोर्ट बनवण्यात येतो. यात गाडीची सध्याची स्थिती, मायलेज, अपघातांचा इतिहास अशा सगळ्याच गोष्टी बारकाईने मांडलेल्या असतात. म्हणजेच दर्जेदार गाड्या कमी किंमतीत मिळणं सोपं जातं.
सुरुवातीला नवी गाडी न घेता सेकंड हॅन्ड गाडीला प्राधान्य देणाऱ्या लोकांसाठी सुद्धा या कारणांमुळे जपानी गाड्या फायदेशीर ठरतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?