' ब्रह्म कुमारी, मनःशांतीची कास धरणाऱ्या पंथाची सुरुवात मात्र अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगांनी झाली – InMarathi

ब्रह्म कुमारी, मनःशांतीची कास धरणाऱ्या पंथाची सुरुवात मात्र अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगांनी झाली

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘मनःशांती ही आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाची आणि आवश्यक बाब आहे’ यावर कुणाचाही दुमत नसेल.

कुठलाही धर्म, पंथ, जात, प्रांत किंवा कुठेही जा मनःशांती मिळवण्यासाठी प्रयत्न करणारी अनेक मंडळी अगदी सहज पाहायला मिळतील. मात्र काही धर्म आणि पंथ असेही पाहायला मिळतात, ज्यांनी मनःशांती हाच आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा भाग असल्याचं सांगितलं आहे. मनःशांतीची कासच धरली आहे म्हणूयात ना!

यातीलच एक महत्त्वाचा पंथ म्हणजे ब्रह्म कुमारी! मात्र आज मनःशांतीच्या वाटेवर चालणाऱ्या या पंथाची सुरुवात नेमकी कशी झाली आहे तुम्हाला ठाऊक आहे का? तो प्रसंग मोठा अस्वस्थ करणारा आहे. विचारात पाडायला लावणारा आहे. चला तर मग जाणून घेऊया, ब्रह्म कुमारी पंथाच्या जन्माची कहाणी.

महिलांनी महत्त्वाची भूमिका निभावली म्हणून…

 

brahma kumari im

 

ब्रह्म कुमारी हा कुठलाही धर्म नसून तो एक पंथ किंवा संप्रदाय आहे. याची स्थापना सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतातील हैदराबाद इथे झाली आहे. आज एक मोठा समाज म्हणून अस्तित्वात असलेल्या या स्थापना लेखराज कृपलानी यांनी केली १९३० च्या दशकात केली आहे.

पुढील काळात यातील अनेक निर्णायक गोष्टींमध्ये महिलांचा सहभाग दिसू लागला. त्यामुळेच ब्रह्म कुमारीला अधिकाधिक ओळख आणि प्रसिद्धी मिळत गेली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

ब्रह्म कुमारीची संस्कृती मानसिक आणि आत्मिक शांतीवर लक्ष केंद्रित करणारी आहे. अंतर्मन, आत्मा यांच्याविषयी अधिकाधिक विचार या संस्कृतीमध्ये केला जातो. ब्रह्म कुमारीशी जोडले गेलेले लोक देश, धर्म, वर्ण, जात, लिंग अशा सीमांचा या विचारांचा त्याग करतात.

महिला अध्यक्ष

 

brahma kumari im 1

 

ब्रह्म कुमारी पंथात स्त्रियांचा सहभाग आणि निर्णय महत्त्वाचे ठरतायत, त्यांचं वर्चस्व आहे हे लक्षात येऊ लागल्यावर ३ वर्षातच एक मोठा बदल घडला. २२ वर्षीय राधे पोखराज राजवानी यांच्याकडे ‘ओम मंडळी’चं अध्यक्षपद देण्यात आलं.

त्यावेळी ओम मंडळी नावाने एक चळवळ सुरु करण्यात आली होती. भगवद्गीतेतील अध्यात्मिक गोष्टींवरील चर्चा, बैठकीच्या सुरुवातीला ‘ओंकार’ ही या चळवळीची ओळख झाली होती.

पुढील काळात ‘ओम मंडळी’ने स्त्रियांच्या हक्कांबद्दल आवाज उठवण्यास सुरुवात केली. यात स्त्रियांनी लग्न न करण्याचा निर्णय घेऊन स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पद्धतीने जगायचं निर्णय घेणं सुद्धा पुरस्कृत होऊ लागलं.

समाजातील अनेकांना या गोष्टी अजिबातच पटत नव्हत्या. ओम मंडळीच्या विरोधात असलेल्यांनी त्यांना हरप्रकारे त्रास दिला. त्यांना त्यांच्या परिसरात जाऊ न देणं, तिथल्या घरांची जाळपोळ अशा घटना सुद्धा घडल्या. १९३८ साली जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी ‘ओम मंडळी’वर बंदी घातली.

१९३९ साली मात्र ही बंदी अयोग्य ठरवण्यात आली आणि हा गट पुन्हा सक्रिय झाला. हैदराबाद सोडून कराची गाठण्याचा निर्णय घेण्यात आला आणि काम पुढे सुरु झालं.

१९५० पर्यंतच्या काळात याची व्याप्ती राजस्थानपर्यंत झाली होती. महिला शिक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आला होता.

ही प्रगती पुढे तशीच सुरु राहिली. १९८० साली एक स्वयंसेवी संस्था म्हणून ब्रह्म कुमारीची नवी ओळख निर्माण झाली. २००० सालापर्यंत ब्रह्म कुमारीशी जोडल्या गेलेल्या सदस्यांची संख्या जवळपास साडे चार लाख इतकी झाली होती.

कोण होते दादा लेखराज?

 

dada lekhraj im

 

लेखराज कृपलानी यांना दादा लेखराज म्हणूनही ओळखलं जात असे. त्यांचे वडील एका शाळेत शिक्षक होते. एका मध्यमवर्गीय, प्रामाणिक आणि मेहनती कुटुंबातून वर आलेले लेखराज यांची पुढे भारतातील श्रीमंत व्यक्तींमध्ये गणना होऊ लागली.

दादा लेखराज साठीला पोचले होते त्यावेळी मात्र अचानक काही अशा घटना घडल्या, की त्यांचं अवघा आयुष्यच बदलून गेलं. त्याला दृष्टांत म्हणावा किंवा साक्षात्कार म्हणावा, लेखराज यांना आपण अनेकांना आयुष्याच्या वाटेवर मार्गदर्शन करणारी व्यक्ती होणार असल्याची भावना जाणवली. त्यांचं आयुष्य आपोआपच बदलून गेलं.

दादा लेखराज यांनी मित्रमंडळी आणि नातेवाईकांसह ज्ञान वाटायला सुरुवात केली. त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडलेले पाहायला मिळाले आणि मग एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली. अखेर १९३७ साली ऑक्टोबर महिन्यात ‘प्रजापिता ब्रह्म कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय’ अधिकृतरित्या स्थापन करण्यात आलं.

ब्रह्म कुमारीमधील आचरणाची पद्धत

 

brahma kumari im1

 

 

ब्रह्म कुमारीचे सदस्य मनःशांतीसाठी अत्यावश्यक असणाऱ्या ध्यान आणि चिंतनाच्या विविध पद्धती शिकवतात. ज्यामुळे आपलं मन शांत आणि नितळ करणं सहजशक्य ठरू शकतं.

लिंग, जात, धर्म, देश, किंवा इतर कुठल्याही सीमा किंवा भेदभावाचा विचार दूर सारून प्रत्येक व्यक्तीमंदील चांगली गोष्ट शोधून काढणं आणि त्यानुसार आचरण करणं हा ब्रह्म कुमारी यांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग असतो.

ब्रह्म कुमारी सदस्यांसाठी काही नियम

 

brahma kumari im 2

 

१. सदस्य विवाहित असो अथवा अविवाहित असो, प्रत्येकाला ब्रह्मचर्य पाळणं बंधनकारक असतं. लैगिक संबंधांपासून त्यांना दूर राहावं लागतं.

२. सकाळी ६.३० वाजता सुरु होणाऱ्या सत्राला उपस्थित राहणं बंधनकारक असतं.

३. सात्विक शाकाहारी अन्नग्रहण करण्याचा नियम सुद्धा ब्रह्म कुमारी सदस्यांना पाळावा लागतो

४. तंबाखू, दारू आणि इतर अंमली पदार्थांचं सेवन वर्ज्य असतं

५. ब्रह्म कुमारी मधील शिष्यगण इतर सदस्यांसहच वास्तव्य करू शकतो.

६. ब्रह्म कुमारी सदस्याने पांढरी वस्त्रेच परिधान करायला हवीत. पांढरा रंग हे पावित्र्य आणि शुद्धतेचं प्रतीक असल्याने हा नियम अंमलात आणला जातो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?