' जन्म माणसाचा, पण ‘कुत्रा’ बनून जगण्यासाठी या माणसाने खर्च केले १२ लाख – InMarathi

जन्म माणसाचा, पण ‘कुत्रा’ बनून जगण्यासाठी या माणसाने खर्च केले १२ लाख

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्यातले बरेच जण स्वप्न बघतात. आपल्या तीव्र इच्छा, आकांक्षा आपल्याला पूर्ण व्हायला हव्या असतात, पण काही काही व्यक्तींची स्वप्नं बघून अक्षरश: चक्रावून जातो आपण. ती इतकी आपल्या कल्पनेपलीकडची असतात की यांच्या मनात मुळातच असा विचार कसा आला असेल असं आपल्याला वाटतं .

प्राणी पाळायची बऱ्याच जणांना आवड असते. कुत्रे, मांजरं, ससे हे हमखास पाळले जाणारे प्राणी. आपल्या पाळीव प्राण्यांशी म्हणजेच पेट्सशी आपलं भावनिक नातं तयार झालेलं असतं. आपल्या कुटुंबातलेच सदस्य झालेले असतात ते.

 

corona and pets inmarathi 2

 

कुटुंबातली कुठलीही व्यक्ती जाते तेव्हा जितकं तीव्र दुःख आपल्याला होतं तितकंच आपला खूप जीव असलेले आपले पाळीव प्राणी जातात तेव्हाही होतं.

‘प्राणी पाळणे’ या दृष्टीने प्राणी माणसांना त्यांच्या जवळ असावेसे वाटणं हे अगदीच नॉर्मल आहे. पण एखाद्या माणसाचं आपण एखाद्या प्राण्यांसारखं दिसावं असं अजब स्वप्न असेल तर? आपला हा विचार किती विचित्र आहे असा विचार न करता त्याने ते स्वप्न चक्क पूर्णच केलं असेल तर?

एका जपानी माणसाने नेमकं हेच केलंय. कुत्र्यासारखं दिसावं हे त्याचं स्वप्न होतं. अर्थात, कुत्रा होणं काही शक्य नव्हतं. पण मग त्याने आपण हुबेहूब कुत्र्यासारखेच दिसू असा एक कॉस्चुम आणला. तोही तब्बल १२ लाखांचा. काय आहे हा सगळा प्रकार? जाणून घेऊ.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

@toco_eevee या जपानी ट्विटर युजरने आपलं कुत्र्यासारखं दिसण्याचं स्वप्न पूर्ण केलंय. ‘कोल्ली’ या कुत्र्याच्या एका जमातीसारख्या दिसणाऱ्या रुपातला आपला फोटो त्याने ट्विटरवर टाकल्यावर लोक चकित झालेत. ‘झेप्पेट’ या कंपनीमुळे त्याला ‘कोल्ली’ या कुत्र्यासारखं दिसणं शक्य होऊ शकलं.

काय करते ही ‘झेप्पेट’ कंपनी?

‘न्यूज.मायनवी’ या जपानी वृत्तसंस्थेनुसार, ‘झेप्पेट’ ही कंपनी चित्रपट, जाहिराती आणि करमणूकीच्या सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर शिल्पं पुरवते. शिवाय, टीव्हीवर दिसणारे कॉस्च्युम्स तयार करते आणि जपानमधल्या प्रसिद्ध मॅस्कॉट कॅरॅक्टर्सचे कॉश्च्युम्सही ही कंपनी बनवते.

 

dog im

 

या कंपनीकडून तोको यांनी कोल्ली कुत्र्याचा कॉस्च्युम तब्बल १२ लाखाला (२ मिलियन येन) खरेदी केला असल्याचा अंदाज आहे. हा कॉस्च्युम बनवायला ४० दिवस लागले.

तोको यांनी ‘कोल्ली’ कुत्र्याच्या कॉस्च्युमचीच निवड का केली?

कोल्लीच्या कॉस्च्युमची निवड का केली अशी विचारणा झाल्यावर तोको म्हणाले, “मी कोल्लीचा कॉस्च्युम यासाठी निवडला कारण मी जेव्हा तो घालतो तेव्हा माझ्या हालचालींवरून मी अगदी खराखुरा कोल्ली वाटतो.

मला चार पायांचे प्राणी आवडतात. विशेषतः जे क्युट असतात ते. त्यांच्यापैकी एखादा मोठा दिसणारा प्राणी मला शोभेल असं मला वाटलं. ते खरं दिसावं म्हणून मी कुत्र्याची निवड केली. लांब केसांच्या प्राण्याचा कॉस्चुम असेल तर त्यात सहज लपून जाता येतं. मी हे लक्षात घेतलं आणि माझ्या आवडत्या कोल्ली या कुत्र्याच्या जमातीचा कॉस्च्युम घेतला.”

सहज हलवता येतात हात-पाय :

 

dog im1

 

तुम्हाला तुमचे हात -पाय सहज हलवता येतात का अशी तोको यांना विचारणा झाल्यावर ते म्हणाले, “याबाबत काही मर्यादा आहेत. पण तरी तुम्ही हात-पाय हलवू शकता. पण तुम्ही जास्तच हात-पाय हलवलेत तर तुम्ही कुत्र्यासारखे दिसत नाही.”

तोको यांचा कुत्र्याच्या कॉस्चुमव्यतिरिक्तचा माणसाच्या रुपातला फोटो आढळलेला नाही. तोको यांच एक युट्युब चॅनलही आहे ज्यातल्या एका व्हिडियोत त्यांनी आपल्याला व्ह्यूअर्सना तुम्हाला कुठले व्हिडियोज पाहायला आवडतील त्यांच्या रिक्वेस्ट्स पाठवा अशी विचारणा केली आहे.

एखाद्याला एखादी गोष्ट अगदी मनापासून हवी असेल तर त्या गोष्टीची हवी तितकी किंमत मोजायची त्या माणसाची तयारी असते. पण बऱ्याचदा ही गोष्ट पैशांच्या स्वरूपात मोजायला लागणार असते.

पुरेसे पैसे नसतील तर एकतर आपल्या इच्छांवर पाणी सोडावं लागतं किंवा हाती पुरेसे पैसे येईपर्यंत वाट पाहावी लागते. त्यामुळे तोको यांची इच्छा कितीही विचित्र वाटली तरी स्वतःकडच्या पैशांच्या जोरावर त्यांनी ती पूर्ण केल्यामुळे ‘पैसा है तो मुमकिन है’ इतकंच म्हणावंसं वाटतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?