' खळखट्याक नव्हे तर विरोधकांना कायद्याची भाषा शिकवणारे कट्टर शिवसैनिक : अनिल परब

खळखट्याक नव्हे तर विरोधकांना कायद्याची भाषा शिकवणारे कट्टर शिवसैनिक : अनिल परब

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ED अंतर्गत कारवाई करण्यात आली होती नंतर हे धाडसत्र सुरूच राहिले आणि मोठमोठे राजकीय मासे ईडीच्या जाळ्यात सापडू लागले. यात संजय राऊत यांच्यापासून नवाब मलिक यांच्यापर्यंत अनेक महत्वाच्या नेत्यांवर कारवाई झाली होती.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या आता नवीन नाव जोडले गेले आहहे अनिल परब यांचे. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने पुन्हा एकदा समन्स बजावला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर कोकणातील दापोली येथे बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता. परब यांनी परिवहन विभागात बदलीचे रॅकेट चालवल्याचा आरोपही सोमय्या यांनी जाहीरपणे केला होता.

 

kirit s inmarathi

 

या निमित्ताने सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू आलेले अनिल परब पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ईडी कडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अनिल परब यांच्याशी संबंधित राज्यातील सात ठिकाणांवर ईडी कडून छापे टाकण्यात आले आहेत.

या छाप्यांमधून ईडीच्या हाती कोणते पुरावे लागतील हा ही चर्चेचा विषय असेल,पण यामुळे परब यांच्यासमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता सांगितली जात आहे. ईडीअधिकाऱ्यांच्या पथकाने गुरुवारी सकाळी अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापे टाकले आहेत. यामध्ये अनिल परब (Anil Parab) यांचे शासकीय निवासस्थान आणि वांद्रे येथील घराचाही समावेश असल्याचे सांगितले जाते.

 

anil parab im

 

अनिल परब यांच्या शिवालय या शासकीय निवासस्थानी दाखल झालेल्या ईडी अधिकाऱ्यांच्या पथकात सहाय्यक संचालक तासीन सुलतान यांचाही समावेश आहे. तासीन सुलतान हेच अनिल देशमुख प्रकरणातील तपासाधिकारी होते. देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात गजाआड पाठवण्यात तासीन सुलतान यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यामुळे आता अनिल परब यांच्याविरोधात ईडी काय कारवाई करणार, यावरून सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे.

इथून पुढचे काही दिवस या चर्चा तर गल्ली ते दिल्ली रंगत राहतीलच तत्पूर्वी आपण अनिल परब कोण आहेत त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास काय आहे? उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे महत्वाचे नेते होण्यापर्यंतचा प्रवास जाणून घेवूयात.

 

uddhav im

 

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी अटक केलेले आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेले महाराष्ट्राचे माजी पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनी एनआयएला पत्र पाठवले होते, त्यात अनिल देशमुख यांच्याशिवाय मंत्री अनिल परब यांच्यावर बेकायदा वसुलीसाठी दबाव टाकल्याचा आरोपही करण्यात आला.

अनिल परब यांनी कंत्राटदारांकडून पैसे उकळण्यास सांगितले होते, असा दावा वाजे यांनी एनआयएला लिहिलेल्या पत्रात केला होता. नारायण राणे यांच्या अटकेतही परब यांचाच हात असल्याचे बोलले जाते. आताही मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्व्भूमीवर परब यांच्यावरील कारवाई हा शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचे चित्र आहे.

 

naryan rane inmarathi 1

 

अनिल परब नेमके आहेत तरी कोण?

मागील २० वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत असलेले अनिल दत्तात्रय परब पेशाने वकील आहेत. वकीली करताना नेहमी सामाजिक कार्यक्रम आणि सार्वजनिक उत्सवांचे आयोजन, गरीब विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तकाचे वाटप अशा विविध कार्यक्रमातून त्यांनी राजकारण आणि समाजकारणाची सुरुवात केली. शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेच्या आंदोलनात देखील ते सक्रिय होते. विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक आंदोलने गाजवली.

त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी २००१ मध्ये अनिल परब यांच्यावर शिवसेनेचे विभाग प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. अनिल परब यांना २००४ मध्ये पहिल्यांदाच शिवसेनेने विधानपरिषदेवर पाठवले. सलग १४ वर्षे (२०१८ पर्यंत) विधान परिषदेचे ते सदस्य आहेत. सन २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर संसदीय कार्यमंत्री आणि परिवहन मंत्री पदाची जबाबदारी अनिल परब यांच्याकडे दिली आहे.

 

anil paratb 1

 

वांद्रे पश्चिममधील २०१५ च्या पोटनिवडणूकीची जबाबदारी अनिल परब यांच्यावर होती. शिवसेनेकडून तृप्ती सावंत उमेदवार होत्या तर काँग्रेसकडून नारायण राणे उमेदवार होते. यावेळी राणे यांचा पराभव करण्यात परब यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे अनिल परब यांच्यावर शिवसेनेकडून अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या.सन २०१७ मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेना युतीत फुट पडली.

महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप भाजपने केला होता. या आरोपांना अनिल परब यांनी कायदेशीररित्या सडेतोड उत्तर दिले होते. तसेच मनसेचे सहा नगरसेवक फोडण्यातही परब यांची मोठी कामगिरी होती.सचिन वाझे प्रकरण उफाळल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शिवसेनेवर आरोप केले. त्यांना कायद्याच्या भाषेत अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

 

devendra fadnavis inmarathi
the economic time

आनंद दिघे मृत्यु: अपघात की घातपात? आजही न सुटलेलं कोडं

केंद्रात सरकार आलं तर PM म्हणून या दोघांपैकी कोण चांगलं? शिवसेना खासदाराचं उत्तर!

तासीन सुलतान यांच्याकडून अनिल परब यांची चौकशी होऊ शकते. या चौकशीनंतर अनिल परब यांना ईडी ताब्यात घेणार का, त्यांच्यावर कोणती कारवाई होईल? तसेच परब यांच्याकडून काय प्रत्युत्तर दिली जाईल याचीही उत्सुकता शिगेला पोचली आहे.

विशेष म्हणजे ईडीने अनिल परब यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा (Money Laundering) गुन्हाही दाखल केला आहे. कोणतेही ठोस पुरावे हाती लागल्याशिवाय ईडीकडून संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला जात नाही.

त्यामुळे अनिल परब यांच्याविरोधात ईडीच्या हाती ठोस पुरावे लागले असावेत, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तेव्हा आता अनिल परब यांच्यावर कारवाई होणार ,त्यांना अटक होणार की हे फक्त चहाच्या कपातील वादळ ठरणार हे ही सध्यातरी गुलदस्त्यातच आहे. तेव्हा सध्याच्या या तापत्या उन्हाळ्यासारख्या गरमागरम विषयाच्या अपडेटसाठी इन मराठीसोबत जोडलेले रहा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?