' चंद्रकांत खैरेंना (पुन्हा एकदा!) डावलून शिवसेनेने ज्यांना तिकीट दिले ते "नवीन संजय" आहेत तरी कोण?

चंद्रकांत खैरेंना (पुन्हा एकदा!) डावलून शिवसेनेने ज्यांना तिकीट दिले ते “नवीन संजय” आहेत तरी कोण?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

निवडणुक म्हंटली की राजकारणी मंडळी आणि कार्यकर्ते यांच्यात एक वेगळंच चैतन्य येत. नेतेमंडळींना उत्सुकता लागलेली असते ती म्हणजे तिकीट वाटपाची. पक्षासाठी घेतलेली मेहनत, पक्षातील आपले वजन, लोकहिताची काम या सगळ्याचा  विचार करून पक्षश्रेष्ठी तिकीट वाटप करतात. मात्र काही वेळा वर्षानुवर्षे पक्षासाठी काम केलेले कार्यकर्ते शेवटपर्यंत कार्यकर्ते म्हणून राहतात.

सध्या आपल्या इथे जरी निवडणुका नसल्या तरी राज्यसभेसाठी कोणता उमेदवार पाठवायचा यावरून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. काही दिवसांपासून चर्चा होती की छत्रपती संभाजीराजे शिवबंधन स्वीकारून राज्यसभेवर जाणार मात्र तसं काही झालं नाही आणि शिवसेनेने ऐनवेळी संजय पवार यांची निवड केली.

 

sambhaji im

 

महाविकास आघाडी सरकार आल्यापासून शिवसेनेतले दोन संजय चांगलेच गाजत आहेत ते म्हणजे खासदार संजय राऊत आणि आमदार संजय गायकवाड. आता शिवसेनेतून आणखीन एक संजय दिल्लीला जाणार आहेत ते नेमके कोण आहेत चला तर मग जाणून घेऊयात…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कोण आहेत संजय पवार?

जेव्हा छत्रपती संभाजीराजेंना शिवसेनेकडून राज्यसभेसाठी विचारणा केली तेव्हा त्यांना एक अट घालण्यात आली होती ती म्हणजे शिवबंधनाची, ते बांधूनच राज्यसभेवर जाता येईल अशी अट उद्धव ठाकरे यांनी घातली. मात्र छत्रपतींनी याला नकार दिला. संभाजीराजेंना पर्याय म्हणून उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत खैरे ही नाव होती मात्र बाजी मारली ती संजय पवार यांनी…

संजय पवार यांच्या राजकीय प्रवासाची सुरवात झाली ती कोल्हापूरच्या अस्सल मातीतून, एक सामान्य शिवसैनिक म्हणून राजकारणात त्यांनी आपले पाऊल १९८९ साली ठेवले. तब्बल ३३ वर्ष ते शिवसेने सोबत कार्यरत आहेत. सुरवातीला नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले. सीमा प्रश्नावरच्या आंदोलनात देखील ते कायम सामील असायचे.

 

pawar im

 

आज कुठल्याही आमदार, खासदारांचा अथवा नगरसेवकांचा असा ठरलेला मतदार संघ असतो जिथून ते हमखास निवडणून येतात. मात्र संजय पवार कोल्हापूरच्या वेगवेगळ्या भागातून निवडणून आले आहेत. तीन वेळा ते नगरसेवक बनले आहेत. आंदोलन असो किंवा शहरातील प्रश्न असो संजय पवार हे कायमच आघाडीवर राहिले आहेत.

अशा या कडवट शिवसैनिकाला केवळ नगरसेवकाची जबाबदारी न देता शिवसेनेने त्यांना जिल्हापप्रमुखाची जबाबदारी दिली. गेली १४ वर्ष ते जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. शिवसेनेसोबतची त्यांची असलेली निष्ठा, संघटन कौशल्यामुळे त्यांची राजकारणावर चांगलीच पकड आहे. विधानसभेच्या जागेसाठी ते उत्सुक होते मात्र संधी मिळाली नाही.

 

kolhapur-inmarathi

 

असे म्हणतात की भगवान देता हैं तो छप्प्पर फाड के देता हैं, असेचं काहीसे संजय पवार यांच्याबाबत घडले आहे. एखाद्या पक्षाच्या जिल्हाप्रमुखाला थेट दिल्लीतमधील खासदारकीचे पद मिळते, ही कौतुकास्पद बाब आहे. कालच खासदार संजय राऊत यांनी त्यांचे नाव जाहीर केले आणि एकच जल्लोष त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला.

 

rajyasabha 1

माध्यमांशी बोलताना संजय पवार असे म्हणाले की, ‘बाळासाहेबांचा आशिर्वाद आणि उद्धवजींचा विश्वास, मी आज भरून पावलो आहे. माझा आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीयेत. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली’.

शिवसेनेकडून दुसऱ्या जागेसाठी संजय पवार यांचे नाव घेतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे चांगलेच नाराज झाले आहेत. मागे देखील प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेनेकडून खासदार म्हणून पाठवल्याने खैरे नाराज झाले होते.

आता पुन्हा एकदा त्यांच्या पदरी निराशा आली आहे. शिवसेनेतर्फे आधीपासून संजय राऊत हे दिल्ली गाजवत असतातच आता त्यांच्या सोबतीला आणखीन एक संजय आल्याने राज्यसभागृह आणखीन गाजणार हे नक्की.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?