' व्हॉट्सअॅप ग्रुपच्या स्वरूपात सुरू झालेलं Dunzo आज करोडो रुपयांची उलाढाल करतंय! – InMarathi

व्हॉट्सअॅप ग्रुपच्या स्वरूपात सुरू झालेलं Dunzo आज करोडो रुपयांची उलाढाल करतंय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्याला आठवत असेल की लहानपणी आई आपल्याला घरात एखादी वस्तु संपली की ती आणण्यासाठी बाजारात पाठवायची.

त्यावेळी तर मोठे कुटुंब होते, जेणेकरून घरातील कोणीही बाजारात जाऊन ती वस्तु घेऊन यायचा. परंतु हल्ली शहरी भागात विभक्त कुटुंब असल्याकारणाने नेहमी नेहमी बाजारात जाणे शक्य होत नाही.

कारण बाजारात जाणे म्हणजे आपले मौल्यवान वेळ वाया घालवणे होय, अशी समज आता लोकांमध्ये तैयार झाली आहे. परंतु ऑनलाइन खरेदीमध्ये असे होत नाही.

 

online shopping inmarathi

 

यामध्ये ग्राहकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो, तसेच विक्रेते त्यांच्या वेबसाइटवर उत्पादनाचे तपशील सतत अपडेट करत असतात. याचबरोबर ऑनलाईन शॉपिंग मध्ये आपल्याला अनेक पर्याय देखील उपलब्ध असतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कोरोना काळात लोकांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन ऑर्डर करायला सुरुवात केली आहे. तुम्ही ऑनलाइन शॉपिंगद्वारे कपडे, खाद्यपदार्थपासून जवळपास सर्व काही ऑर्डर करू शकता. जसे की किराणा, डेरी प्रोडक्ट्स, पाणी, इलेक्ट्रिक प्रोडक्ट्स, खेळणे, इत्यादी…

सध्या भारतात अमेज़ॉन, फ्लिपकार्ट, स्विगी, जोमॅटो सारखे प्लेटफार्म आहेत जे आपल्याला वेगवेगळ्या वस्तुंची घरपोच सेवा देतात. परंतु आता या बड्या कंपन्यांना स्पर्धा म्हणून अनेक छोटे स्टार्टअप्स सुरु झाले आहे, जे या बड्या कंपन्यांना स्पर्धा देत आहे. जसे की Dunzo, Blinkit, Grofers, इत्यादी.

 

dunzo and blinkit IM

 

आजच्या लेखामध्ये आपण Dunzo या स्टार्टअप विषयी जाणून घेणार आहोत….

डंझो (Dunzo) या शब्दाचा अर्थ :-

डंझो या शब्दाचा अर्थ म्हणजे ‘काम पूर्ण झाले’ असे आहे. हे नाव स्टार्टअपने त्यांच्या ग्राहकांद्वारे त्यांना दिलेले काम पूर्ण करण्यावर केंद्रित असल्यामुळे निवडले गेले आहे.

या शब्दाचा अर्थ असा आहे की ग्राहकाने जे काम आम्हाला दिले आहे ते आम्ही त्वरित पूर्ण करु किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवायचे आहे ते डन्झोद्वारे जलदगतीने पूर्ण केले जाऊ शकते. जलद आणि विश्वासहर्ता ही या कंपनीची वैशिष्ट्ये आहेत.

डंझो ही भारतातील ऑन-डिमांड डिलिव्हरी सेवा स्टार्टअप आहे. ही डिलिव्हरी फर्म त्यांच्या ग्राहकांना आवश्यक असलेल्या वस्तू त्यांच्या मागणीनुसार डिलिव्हरीसाठी कमीत कमी शुल्कामध्ये घरपोच सेवा देते.

dunzo 2 IM

 

उदाहरणार्थ, जर ग्राहकाला टी-शर्ट विकत घ्यायचा असेल तर त्यांनी ते कुठल्या दुकानातून आणि कोणती साईज घ्यायची आहे ते निवडून घ्यावे आणि त्यानंतर ऍप द्वारे Dunzo ला संपर्क करावे. यानंतर काही मिनिटांमध्येच तो टीशर्ट तुमच्या घरी असेल.

किराणा सामान, पाळीव प्राणी, औषधं आणि इतर मेडिकल वस्तु, बाईक राइड्स, लॉन्ड्री डिलिव्हरी, पिक आणि ड्रॉप सेवा यांसारख्या सेवा डंझोद्वारे दिल्या जातात.

सध्या बेंगळुरू, नोएडा, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, पुणे आणि मुंबई यांसारख्या मेट्रो शहरांमध्ये हे कार्यरत आहे.

डंझोची सुरुवात :-

डंझो या स्टार्ट कंपनीची सुरूवात कबीर बिस्वास यांनी केली आहे. वयाच्या २८ व्या वर्षी या माणसाने लोकांचा वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी या डन्झो प्लॅटफॉर्मची संकल्पना मांडली.

 

kabir biswas IM

 

मुंबई विद्यापीठातून अभियांत्रिकीचे पदवीधर तसेच मुंबईतील नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे माजी विद्यार्थी, कबीर हे Hoppr चे संस्थापक देखील आहेत, जे नंतर Hike Messenger याने विकले घेतले आहे. यासोबतच २००७ ते २०१० पर्यंत त्यांनी एयरटेल च्या सेल्स डिपार्टमेंट मध्ये काम केले आहे.

तर डंझोचे सह-संस्थापक अंकुर अग्रवाल हे संगणक शास्त्रात आईआईटी रुरकी मधून पदवीधर आहेत. प्लॅटफॉर्मचे तीसरे सह-संस्थापक मुकुंद झा आहेत ज्यांनी अंकुरसोबत गुगलवर एकत्र काम केले.

दोघांनी फिल्टर नावाची एचआर टेक फर्म देखील सुरू केली. तर चौथे सह-संस्थापक हे दलवीर सुरी आहेत, ज्यांनी मुंबई विद्यापीठामधून पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी IBM मध्ये काम केले आणि ते सायब्रिला (Cybrilla) टेक्नॉलॉजीजमध्ये ऑपरेशन्स आणि डिलिव्हरी हेड होते.

 

dunzo partners IM

 

डंझोची सुरुवात एका साध्या व्हॉट्सअॅप ग्रुप द्वारे झाली होती. त्यावेळी कबीर स्वतःहून संपूर्ण कामे पूर्ण करायचा. डंझोच्या उत्तम सेवेमुळे सुरूवातीच्या काही दिवसांमध्येच ते लोकांमध्ये लोकप्रिय झाले आणि त्यांनी त्यांच्या मित्र आणि कुटुंबियांशी याबद्दल बोलणे सुरू केले.

सुरूवातीच्या ऑर्डर ह्या जवळपासच्या दुकानातून कोल्ड ड्रिंक किंवा अन्य किराणा वस्तु पोहोचवणे किंवा घरगुती उपकरणे दुरुस्त करून आणून देणे, यासारख्या साध्या गोष्टींचा समावेश होता.

अधिकाधिक लोक या प्लॅटफॉर्मकडे आकर्षित व्हावेत यासाठी त्यांच्या मित्रांनी त्यांना प्रचारात मदत केली. यानंतर हळूहळू ऑर्डर्स वाढू लागल्या आणि एवढ्या साऱ्या ऑर्डर्स कबीर एकट्याने पूर्ण करण्यास असमर्थ ठरत होता. त्यामुळे कामे पार पाडण्यासाठी त्यांनी कर्मचारी नियुक्त करण्यास सुरुवात केली.

नंतर कबीर आणि त्याच्या मित्रांनी ही कल्पना एका अॅप-आधारित व्यवसायात विकसित केली. व्यवसाय सुरू केल्याच्या एका वर्षाच्या आत डंझोला दररोज ७० पेक्षा जास्त ऑर्डर मिळू लागल्या होत्या.

डन्झोनेने आपला व्यवसाय तीन विभागांमध्ये विस्तारला आहे. ज्यात पहिले म्हणजे वस्तुंची खरेदी करणे. दूसरे म्हणजे वस्तूंची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करणे. तर तिसरे म्हणजे दुरुस्ती आणि व्यवहार, ज्यामध्ये घरगुती उपकरणे दुरुस्त करणे किंवा लाँड्री, पेमेंट इत्यादीसारख्या छोट्या कामांचा समावेश होतो.

 

dunzo featured IM

 

Dunzo चे मुख्यालय बेंगळुरू येथे आहे आणि ते गुडगाव, हरियाणा येथे बाईक, टॅक्सीची सेवा देखील चालवतात. आत्तापर्यंत, Dunzo च्‍या प्‍लॅटफॉर्मवर दरमहा दहा लाखांहून अधिक वापरकर्ते असल्याची नोंद झाली आहे.

प्रमुख शहरांमध्ये हजारो कर्मचाऱ्यांच्या मदतीने, Dunzo आपल्या ग्राहकांसाठी ४५ रुपये प्रति ऑर्डर दरापासून सुरू होणारी सर्व प्रकारची कामे करते. डंझोला यातून महिन्याला सुमारे एक कोटी रुपयांचा महसूल मिळतो.

गेल्या काही वर्षांमध्ये, डंझोकडे ग्राहकांकडून पुन्हा ऑर्डर करण्याची संख्या वाढली आहे आणि वितरणासाठी लागणारा वेळही कमी झाला आहे. त्यामुळे डंझो हा ऑप्शन अधिकाधिक लोकप्रिय होत असल्याचे दिसून येत आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?