' रजनीकांत काहीही करू शकतात! जपानी चिप्स पॅकेटवर ही झळकू शकतात – InMarathi

रजनीकांत काहीही करू शकतात! जपानी चिप्स पॅकेटवर ही झळकू शकतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलिवुड म्हणलं की अमिताभ बच्चन हे नाव सर्वात आधी डोळ्यासमोर येतें. जगभरात बॉलिवुडचे चित्रपट आवडीनं पाहिले जातात. मात्र बच्चन नावाला टक्कर देणारं आणखिन एक भारतीय नाव म्हणजे, रजनीकांत.

दक्षिणेतला सुपरस्टार अशी ज्याची ओळख आहे तो रजनीकांत दक्षिणेत देव मानला जातो. त्याचे फ़ॅन्स वेड्यासारखे त्याच्यावर प्रेम करतात. बॉलिवुडमधे अमिताभचा बोलबाला असल्यानं झाकोळला गेलेला रजनी दक्षिणेत गेला आणि बच्चनपेक्षाही उत्तुंग यश त्यानं मिळविलं.

 

 

आपल्या मराठी मातीतला हा मराठमोळा तरुण एकेकाळी बसमधे कंडक्टर म्हणून नोकरी करत होता मात्र नियतीनं त्याच्या ललाटी काही वेगळंच भविष्य लिहून ठेवलं होतं. सिनेमाच्या वेडानं या तरुणानं नोकरी सोडून मुंबई गाठली पण इथे त्याचा फारसा जम बसला नाही.

दक्षिणेतल्या प्रेक्षकांनी मात्र त्याला आपलं मानलं आणि भरभरून प्रेम दिलं. रजनी या नावाची जादू भारताबाहेरही पसरली. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण जपानमधे रजनीकांतची प्रचंड क्रेझ आहे.

 

rajnikant kabali inmarathi

 

१९९८ साली रजनीकांतचा तमिळ हिट मुथू जपानमधे मुथू ओडुरु या नावानं प्रदर्शित झाला. हा चित्रपट जपानी तिकिट खिडकीवर अक्षरश: ब्लॉकबस्टर ठरला. हा त्या काळातला पहिलाच नॉन हॉलिवुड चित्रपट होता ज्यानं इतका प्रचंड व्यवसाय केला.

हा चित्रपट जपानमधे थोडाथोडका नाही तर तब्बल २३ आठवडे चालला. या चित्रपटानं बॉक्स ऑफ़िसवर १.६ दश लक्ष डॉलर्सहून अधिक कमाई केली. या चित्रपटानं जपानमधे रजनीकांतचा चाहता वर्ग निर्माण केला. त्यानंतरचे रजनीचे सर्व चित्रपट जपानमधे तडाखेबाज व्यवसाय करु लागले.

 

muthu rajni im

 

आपल्या आवडत्या स्टारचं चित्र आपल्या उत्पादनांवर वापरावं असं अनेक कंपन्यांना वाटू लागलं. तिहातो ही जपानी पॅक्ड फ़ूड कंपनी आहे. त्यांनी जेव्हा गरम मसाला चिप्स बाजारात आणले तेंव्हा या भारतीय चवीच्या चिप्ससाठी त्यांना भारतीय चेहरा हवा होता. या रॅपरवर या कंपनीनं रजनीच्या जपानमधील सुपरहिट चित्रपटातील-मुथू मधील- छबी छापली. लोकांनी चिप्सच्या चवीचा विचारही न करता केवळ रजनीचं चित्र बघून चिप्स खरेदी करायला सुरवात केली.

 

muthu rajni im 1

 

नुसते चिप्स खरेदी करुन लोक थांबले नाहीत तर अनेकांना ही रॅपर्स जमविण्याचा छंद लागला. गंमतीची गोष्ट म्हणजे साधारणपणे आपला चित्रपट सुपर डुपर हिट झाला की यातले कलाकार अनेक कंपन्यांकडून जाहिरातींसाठी मोठाल्या रकमा मानधन म्हणून मिळवतात. मात्र रजनी हा नुसता नावाचा राजा नाही तर तो मनानंही राजा आहे. त्याला जेव्हा कळलं की जपानमधे त्याचा चेहरा एका चिप्सच्या पाकिटावर झळकतो आहे, तेंव्हा त्यानं याचं मानधन घेतलं नाही की न विचारता फोटो  वापरला म्हणून नाराजी व्यक्त केली नाही.

 

chips im

बच्चे कंपनीला खूप आवडणारा Shinchan: वाचा त्याच्या जन्मामागची दुःखद कहाणी!

उगवत्या सूर्याचा देश ‘जपान’ बद्दल या रंजक गोष्टी तुम्ही कधीही ऐकल्या नसतील

जपानमध्ये तर रजनीकांत यांचा हजारोंचा फॅनक्लब आहे. रजनीकांत यांचा सिनेमा पाहण्यासाठी ते थेट चेन्नई देखील गाठतात. अशा प्रकारचं प्रेम मिळणारा रजनीकांत हा एकमेव भारतीय स्टार आहे असं म्हणल्यास वावगं ठरु नये.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?