' बॉलिवूडचं दारिद्र्य: आधी साऊथचे रिमेक तर आता पाकिस्तानी गाण्यांची चोरी!

बॉलिवूडचं दारिद्र्य: आधी साऊथचे रिमेक तर आता पाकिस्तानी गाण्यांची चोरी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एकदा का नाव कानफाट्या पडलं की ते कायमचं असतं, असंच काहीसं सध्या बॉलिवूडचं झालंय. सध्या ते जे काही करतायत त्यातून अजिबातच काही चांगलं किंवा समाधानकारक प्रेक्षकांना मिळत नाहीये.

सिनेमा असो किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या वेबसिरीज प्रत्येक बाबतीत बॉलिवूडला लोकांच्या शिव्याच खायला लागतायत. नेपोटीजमवरून तर लोकं बॉलिवूडला ट्रोल करत होतेच पण आता रिमेक आणि बायोपिकच्या सुळसुळाटामुळे तर लोकं आणखीनच चिडले आहेत.

 

bollywood remake IM

 

साऊथचे काही सिनेमे हिंदीत डब केलेले असूनसुद्धा तेच सिनेमे पुन्हा रिमेक करायचा द्राविडी प्राणायाम करणाऱ्या बॉलिवूडमध्ये सध्या लेखकांची फार कमतरता भासू लागली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आधी जुन्या हिंदी गाण्यांचा रिमेक केलं, मग साऊथच्या सिनेमांची अधिकृत नक्कल केली, आता तर चक्क पाकिस्तानी गायकाची गाणी उचलण्यापर्यंत बॉलिवूडवर परिस्थिति ओढवली आहे.

नुकताच करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर खाली बनलेल्या ‘जुग जुग जियो’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. वरूण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर आणि नितू सिंग अशी मंडळी या सिनेमात मुख्य भूमिकेत आपल्याला बघायला मिळतायत.

 

jugjug jiyo IM

 

फॅमिली ड्रामा असलेला हा सिनेमा आणि याचं कथानक ट्रेलरवरून तरी बरं वाटतंय, पण या सिनेमातल्या एका गाण्यामुळे एक वेगळाच वाद समोर आला आहे.

पाकिस्तानी अब्रार उल हक याने या सिनेमातील ‘नच पंजाबन’ हे गाणं आपल्या गाण्याची केलेली रीतसर नक्कल असल्याचा दावा केला आहे. आणि धर्मा प्रोडक्शनने हे गाणं माझ्या परवानगी शिवाय वापरल्याचंदेखील त्याने स्पष्ट केलं आहे.

अब्रारने याबाबत ट्विट करून हे त्याच्यासोबत आधी ६ वेळा घडलं असल्याचंदेखील सांगितलं आहे. त्याने या ट्विटमध्ये करण जोहर आणि धर्मा यांच्या अधिकृत अकाऊंटला टॅग करून हे आरोप केले आहेत.

abrar ul haq IM

 

यानंतर सिनेमाच्या संगीताचे हक्क ज्यांच्याकडे आहेत त्या टी-सिरिजने यावर स्पष्टीकरण देत हे आरोप खोटे सांगत खोडून काढले आहेत. टी-सिरिजच्या म्हणण्यानुसार त्यांनी २००१ साली रिलीज झालेल्या या गाण्याच्या adaption चे हक्क विकत घेतले आहेत.

इतकंच नव्हे तर या सिनेमाच्या कथेवरूनसुद्धा वाद सुरू आहे. पटकथालेखक विशाल सिंग याच्या कथेवरून हा सिनेमा चोरलेला असून आता तो करण जोहरच्या बॅनरखाली रिलीज होत आहे अशीही चर्चा सध्या सुरू आहे.

विशाल सिंग यांनी ही कथा आणि त्याचे हक्क आधीच रजिस्टर करून ठेवले असून त्यासंबंधीत अधिकृत मेलसुद्धा त्यांनी धर्मा प्रोडक्शनला केला होता, पण तरी त्यावर काहीच उत्तर न देता थेट करण जोहरने ‘जुग जुग जियो’ची घोषणा केली आहे.

 

jugjug jeeyo IM

 

अर्थात या सगळ्याचा या सिनेमावर किती परिणाम होईल ते सांगता येणं कठीण आहे कारण हा सिनेमा एका मोठ्या बॅनरखाली येतोय आणि करण जोहरसारखी मंडळी यात सहभागी असल्याने यावर फारशी काही कारवाई होणार नाही हेदेखील आपल्याला ठाऊक आहे.

एकंदरच साहित्यिक चोरी ज्याला आपण plagiarism म्हणतो ही किती घातक आहे याची कित्येक उदाहरणं आपण पाहिली आहेत. कित्येक होतकरू कलाकारांची आयुष्यं यामुळे बरबाद झाली आहेत.

खरंतर बॉलिवूडकडून आत्ताच्या घडीला हे असं काही ऐकायला मिळणं हे काही नवीन नाही, कारण सध्या पदोपदी बॉलिवूड त्यांची बौद्धिक दिवाळखोरी सिद्ध करतंय. पण या plagiarism ला कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे.

 

copy bollywood IM

 

अर्थात त्या पटकथा लेखकाने किंवा पाकिस्तानी गायकाने आरोप खरे आहेत का खोटे हे त्यांनाच ठाऊक पण बॉलिवूडने आता थोडं सुधारायला हवं ती काळाची गरज आहे. आणखीन १० साऊथ सिनेमाचे रिमेक केले तरी ते लोकं सहन करतील, पण पाकिस्तानी कलाकारांची नक्कल लोकं फार मनावर घेतील.

आपल्या देशात टॅलेंटेड लोकांची अजिबात कमी नाहीये, त्यामुळे हा पोरखेळ आतातरी बॉलिवूडने थांबवावा अशी प्रत्येक भारतीय प्रेक्षकाची विनंती आहे. नाहीतर तो दिवस दूर नाही जेव्हा डायनॉसॉरप्रमाणे आपल्याला म्हणावं लागेल की “ते होतं बॉलिवूड!”

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?