' “मी भारताशी लग्न करतोय…” एका अमेरिकनची हळवी पोस्ट…! – InMarathi

“मी भारताशी लग्न करतोय…” एका अमेरिकनची हळवी पोस्ट…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जातात आणि नंतर देशाला विसरून तिथेच स्थायिक होतात असा आरोप केला जातो. त्यात एखाद्या भारतीय तरुण-तरुणीने परदेशी जोडीदार निवडला तर मग आरोपांच्या फैरी झाडल्या जातात.

देशाभिमान जागृत झालेला प्रत्येकजण ”भारतीय तरुण मिळाले नाहीत का?” असा टोमणा मारायलाही पुढे-मागे बघत नाहीत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

मात्र जेव्हा एक परदेशी मुलगा भारतीय मुलीशी लग्न करतो, ते देखील भारतात येऊन! ही बाब भारतीयांसाठी निश्चित कौतुकाची आहे.

 

wedding 1 im

 

अर्थात या पठ्ठ्याने केवळ भारतीय मुलीशी लग्न केलं नसून मी भारताशी लग्न केल्याचं तो म्हणतोय. हा प्रकार नेमका काय आहे? हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे ना?

फॉरेनचा जावई

इलियॉट रोन्सेबर्ग () हा तरुण गेल्या सहा वर्षांपासून कामानिमित्त भारतात राहतोय. मुळचा अमेरिकन असलेल्या इलियॉटला या दरम्यान एक भारतीय मुलगी मनात भावली. आधी मैत्री, मग प्रेम अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांचं नातं बहरलं आणि अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

६ मे रोजी या दोघांनी मुंबईत कोर्ट मॅरेज पद्धतीने रेशीमगाठ बांधली. हा आनंद त्याने आपल्या सोशल मिडीया हॅन्डलव्दारे नेटकऱ्यांपर्यंत पोहोचवला आहे.

 

wedding im

 

त्याने केलेली ही भावनिक पोस्ट सध्या सोशल मिडीयावर फक्त चर्चेचा नव्हे तर कौतुकाचा विषय ठरली आहे.

आपल्या पोस्टमध्ये त्याने भारत देशाबद्दल व्यक्त केलेले मत प्रत्येक भारतीयाला विचार करायला लावणारे आहे. सहा वर्षांपुर्वी कामानिमित्त आपण अमेरिकेहून भारतात आलो आणि पक्के भारतीय झालो असं तो अभिमानाने सांगतो.

या दरम्यान आपल्या आयुष्यात आलेल्या भारतीय मुलीशी विवाह करण्याची संधी मिळणं हा आयुष्यातील अत्यंत आनंदाचा प्रसंग असल्याचे त्याने म्हटले आहे.

एवढंच नाही, तर हा आनंद आपण भारत देशात साजरा करत असून या सोहळ्याला मुलीच्या पालकांची उपस्थिती असणे हा अधिक आनंद असल्याचे म्हणत त्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.

यातील महत्वाचा भाग हा की त्यांच्या लग्नाला इलियॉट याच्या घरी काम करणाऱ्या मावशींनीही हजेरी लावली असून त्यांची ओळख करून देताना या माझ्या मदतनीस असल्या तरी मला आईसारख्या आहेत हा त्याचा विचार कौतुकाची बाब ठरला आहे.

 

 

लग्नाची गोड बातमी सर्वांसोबत शेअर करतानाच मी केवळ भारतीय मुलीशी लग्न करत नसून संपुर्ण भारताशी लग्न करतोय असं तो म्हणतो. हा देश मला आपला वाटतो. गेल्या अनेक वर्षात या देशाने मला आपलंसं केलं आहे, या देशाची संस्कृती, रिती, परंपरा या मला माझ्या वाटतात त्यामुळे या देशात भारतीय बनून राहण्याचा आनंद काही औरच असंही तो म्हणतो.

या देशात वावरताना दररोज समस्यांनाही तोंड द्यावं लागत असल्याचं तो कबूल करतो, मात्र या समस्यांवर मात करत पुढे जाण्याची भारतीयांची जिद्द, त्यासाठी केले जाणारे प्रयत्न वाखाणण्याजोगे असून मला प्रत्येकाकडून नवीन काहीतरी शिकायला मिळत असल्याचं तो सांगतो.

अक्षय कुमार कॅनडाचा नागरिक असूनही, आयकर भारतात भरण्यामागचं खरं कारण

अमेरिकेत जाण्यास इच्छुक भारतीयांना हा ‘व्हिजा गॉड बालाजी’ कसा मदत करतोय ते बघा!

भविष्यातही या देशातील समस्या कमी करत देशाला अधिक सुंदर बनवण्यात प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक असून मीदेखील या प्रक्रियेत सहभागी होणार असल्याची त्याची कबुली ही अनेकांना भावली आहे,

एकंदरित भारतीयांची देशाकडे पाहण्याची दृष्टी, देश सुजलाम, सुफलाम ठेवण्याकडे होणारे दुर्लक्ष हे मुद्दे चर्चेत असताना एका परदेशी नागरिकाने भारताबद्दल व्यक्त केलेले हे विचार आणि केवळ विचारांपुरता अभिमान मर्यादित न ठेवता केलेली प्रत्यक्ष कृती ही बाब अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?