' कोकणातील या गावात आजही संध्याकाळनंतर कुणीही रडत नाही

कोकणातील या गावात आजही संध्याकाळनंतर कुणीही रडत नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगात अनेक अद्भुत आणि विचित्र गोष्टी अस्तित्वात आहेत. खूपदा आपल्याला त्या दिसत नाहीत, पण तरीही काहीतरी वेगळं आहे हे जाणवतं. कधी कधी शब्दात न सांगता येणारं असं काहीतरी.

आपल्या चर्मचक्षुंना न दिसणाऱ्या पण अस्तित्वात असलेल्या कितीतरी गोष्टी या जगात आहेत. त्या दिसत नाहीत म्हणजे त्या नाहीत असे नाही. त्यावर विश्वास ठेवावाच लागतो. कारण ते आपल्या असण्याचे पुरावे मागे ठेवून जाते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

कोकण हा तसा गूढ भाग. तिथे असलेले रीतीरिवाज, जादू टोणे, भुताखेतांच्या गोष्टी या साऱ्यामुळे कोकणला एक गूढरम्यतेची किनार आहे.

 

hunted im

 

आपल्या कोकणाला जसं निसर्ग सौंदर्याचं वरदान आहे. लांबच लांब समुद्र किनारे, नारळी पोफळीच्या बागा आणि हिरवीगार भात शेती हे कोकणचे विशेष आहेत. उन्हाळ्यात तर कोकणचा मेवा , हापूस आंबे, करवंदे, जांभळे यांची रेलचेल हे तर कोकणचे वैशिष्ट्य तर आहेच.

 

konkan im

 

त्याशिवाय कोकणातील काही थक्क करणारी ठिकाणे आहेत जिथे काहीतरी वेगळे डोळ्याला न दिसणारे चमत्कारिक काहीतरी आहे. आणि तिथे राहणारे स्थानिक लोक त्या अनुषंगाने असलेल्या श्रद्धा आजही मानत पिढ्यानपिढ्या सुखाने नांदतात.

कोकण हा तसा गूढ भाग! तिथे असलेले रीतीरिवाज, जादू टोणे, भुताखेतांच्या गोष्टी या साऱ्यामुळे कोकणला एक गूढरम्यतेची किनार आहे. अशा अनेक गूढ ठिकाणापैकी एक ठिकाण आहे श्रावणगाव! इथे असलेले काही रिवाज थक्क करून सोडतात.

सर्वसाधारणपणे आपल्याकडे म्हणतात की सायंकाळी रडारड करू नये. भांडणे वाद करू नयेत. पण आपण किती त्याकडे गांभीर्याने बघतो? बहुतेक कमीच.

 

kangana ranaut crying inmarathi

 

पण कोकणातील श्रावणगाव तळेवाडी या गावात हा रिवाज पिढ्यानपिढ्या पाळला जातो. या गावात चुकुनही संध्याकाळी भांडणे रडारड केली जात नाही. ग्रामदैवताच कोप होतो अशी मान्यता आहे. कुठे आहे हे गाव?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे ठिकाण एक आश्चर्य असलेलं एक ठिकाण म्हणजे श्रावणगाव! या गावात एक अनोखे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे क्षेत्रपालाचे मंदिर, इथे असलेले तळे आणि गणपतीचे मंदिर.

या गावाचे अजून एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या गावात संध्याकाळी रडायला मनाई आहे. कितीही काहीही होऊदे या गावातील लोक संध्याकाळी भांडण, रडारड या गोष्टी अजिबात करत नाहीत, गेल्या कित्येक पिढ्या हे संपूर्ण गाव शाकाहारी आहे.

 

temple im

 

या गावातील लोकांची अशी श्रद्धा आहे की, जर सायंकाळी रडले तर त्या गावाचा देव क्षेत्रपाल याच्या रोषाला सामोरे जावे लागते.

या गावात एक तलाव आहे. अशी आख्यायिका आहे की, रामायणातील श्रावण बाळ आणि दशरथाचा शिकारीचा प्रसंग याच तळ्यापाशी घडला होता. म्हणून या तळ्याला श्रावण तळे असे म्हणतात.

कुणी सांगतात की, हे तळे पांडवांनी बांधले. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे हा तलाव उन्हाळ्यात दुथडी भरून वाहतो, पण पावसाळ्यात अजिबात वहात नाही. कितीही पाऊस पडला तरी या तलावातील पाणी कधीही तलाव ओलांडून बाहेर पडलेले नाही. या पाण्याचा वापर ग्रामस्थ शेतीसाठी करतात मात्र अन्न शिजवण्यासाठी या तलावाचे पाणी वापरले जात नाही.

 

lake im

 

या पाण्याची चव थोडी वेगळी तर आहेच पण यापूर्वी एकदा या पाण्यात भात शिजवला असता तो भात रक्तासारखा लाल झाला होता अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या पाण्यात कुणीही अन्न शिजवले जात नाही. भाजीपाला पिकवण्यासाठी मात्र या तलावाचे पाणी वापरले जाते आणि त्याने आजवर काहीही नुकसान झालेले नाही.

या गावातील गणपती हा उजव्या सोंडेचा आहे. हा स्वयंभू गणपती नवसाला पावतो असे मानले जाते.

सुरुवातीला झाडीत सापडलेली ही मूर्ती पाषाणात कोरलेली आहे. नंतर हळूहळू हे मंदिर बांधले. हे मंदिर साधेसे आहे पण बघून प्रसन्न वाटते. या मंदिराच्या परिसरात असलेल्या दीपमाळा पण दगड एकमेकावर रचून बांधलेल्या आहेत.

 

ganapati im

 

या मंदिराच्या परिसरात असलेल्या गुहा हे थोडेसे गूढ आहेत. आजवर कुणीही या गुहांमध्ये जायचं धाडस केलेलं नाही. अर्थात त्या अरुंद आहेत. माणूस सहजासहजी जाऊ शकत नाही. पण या ग्रामस्थांचे म्हणणे आहे की ही गुहा शेजारच्या गावात जाऊन उघडते.

 

cave im

 

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये एक पुसटशी रेघ असते. या गावकऱ्यांचे जे रिवाज आहेत ते त्यांच्या अनुभवावर आधारित आहेत. आणि आजही ते तितक्याच आस्थेने जपले जातात पाळले जातात. पण काही कोडी विज्ञान पण सोडवू शकलेले नाही.

नाहीतर ज्या पाण्यात तांदूळ शिजवले तो भात रक्तासारखा लाल का होतो? आणि भाजीपाला मात्र व्यवस्थित येतो असे का? याचे उत्तर देता आले असते ना!

अर्थात या गावातील गावकरी अत्यंत सुखाने नांदतात, आनंदाने राहतात, त्यामुळे या केवळ आख्यायिका किंवा गावकऱ्यांची श्रद्धा आहे. त्याचा आदर हा प्रत्येकाने केला पाहिजे.

सदर लेख हा केवळ उपलब्ध माहितीच्या आधारे संग्रहित करण्यात आला असून विषयाची तोंडओळख व्हावी हा प्राथमिक उद्देश आहे. कोणतेही गाव, धर्म, जात, पंथ किंवा इतर कोणाच्याही श्रद्धा-रुढींचा अपमान करण्याचा वा अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?