' आपल्या मृत्यूवर टपून बसलेली गिधाडं म्हणजे निसर्गाचा एक अफलातून चमत्कारच आहेत! – InMarathi

आपल्या मृत्यूवर टपून बसलेली गिधाडं म्हणजे निसर्गाचा एक अफलातून चमत्कारच आहेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

वाढत्या शहरीकरणामुळे पक्षी दिसणं ही बाबच फार दुर्मिळ झाली आहे. कधीकाळी अगदी समोर येऊन बसणारे चिमण्या-कावळे असे नेहमीच्या जीवनातील पक्षी सुद्धा आता सहजसहजी दिसत नाहीत. त्यामुळे गिधाडं दृष्टीस येणं तर त्याहूनही दुर्मिळ म्हणायला हवं. मग आता या गिधाडांच्या बाबतीत सगळ्याच गोष्टी माहित असणं शक्यच नाही. बरोबर की नाही मंडळी?

गिधाड म्हटलं, की इतर प्राणी आणि पक्षांच्या मृत्यूवर टपून बसलेला एक पक्षी आठवतो. मात्र यापलीकडे गिधाडाबद्दल फारशा बाबी माहित नसतात.

पक्षी निरीक्षणाची आवड असणाऱ्या मंडळींच्या यादीत सुद्धा गिधाडांचं पक्षीनिरीक्षण अगदी फार मोठ्या प्राधान्य क्रमावर प्रमाणावर नसतं. मात्र याच गिधाडांच्या बाबतीत अनेक खास आणि इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. त्या माहित करून घेणं रंजक नक्कीच ठरेल.

गिधाडांच्या एकूण प्रजाती

 

vultures im

 

गिधाडांच्या एकूण प्रजाती किती असतील बरं? असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? नाही? बरं बघा मग विचार करून. हल्ली फार दिसत नसलेल्या या गिधाडांच्या १-२ नव्हे तर तब्बल २३ प्रजाती आहेत.

ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका हे दोन खंड सोडले, तर जगातील प्रत्येक खंडात गिधाडांची किमान एक तरी प्रजाती सापडते.

अमेरिका आणि कॅरेबियन प्रदेशात आढळणारी गिधाडं ‘न्यू वर्ल्ड व्हल्चर’ आणि आफ्रिका, आशिया, युरोप खंडात आढळणारी गिधाडं ‘ओल्ड वर्ल्ड व्हल्चर’ अशा नावांनी ओळखली जातात. याच गिधाडांच्या मुख्य दोन प्रजाती आहेत, असं म्हणता येईल.

लुप्त होण्याचा धोका?

गिधाडांच्या या एकूण २३ प्रजातींपैकी जवळपास निम्म्या प्रजातींना लुप्त होण्याचा धोका आहे. मनुष्याचा वन्य जीवनातील मोठ्या प्रमाणावरील हस्तक्षेप हेच याचं महत्त्वाचं कारण ठरतं.

काही प्रजाती तर लुप्त होण्याच्या या धोक्याच्या शेवटच्या पातळीवर पोचलेल्या आहेत. मानवी हस्तक्षेपासह, इतर प्राणी आणि पक्षी यांनी त्यांचा निसर्गात टिकाव लागावा यासाठी गिधाडांच्या प्रजातींना धोक्यात टाकणं हेदेखील एक कारण ठरतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

भलेमोठे पंख

अँडियन कंडोर ही गिधाडाची एक अशी प्रजाती आहे, जिच्या पंखांचा आकार गिधाडांमध्ये सर्वाधिक मोठा आहे. या गिधाडाने पंख पसरले तर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचं अंतर हे जवळपास साडेतीन मीटर लांब आहे. एवढ्या लांबलचक पंखांचं वजनही तेवढंच भरभक्कम असणार नाही का! या गिधाडांचं वजन आहे तब्बल १५ किलो!

या मोठ्या थोरल्या पंखांच्या साहाय्याने हवेचे प्रवाह तयार करून हवेत उंचच उंच तरंगत राहणं अँडियन कंडोरला फार उत्तमरित्या जमतं.

सगळीच गिधाडं बोडकी नसतात

 

vultures im 2

 

गिधाड, गरुड वगैरे पक्षी म्हटले की बोडक्या डोक्याची आकृती नजरेसमोर येते. मात्र प्रत्येकच गिधाड बोडकं असतं, असं जर तुम्ही समजत असाल तर तो तुमचा गैरसमज आहे, मात्र बऱ्याचशा प्रजातींच्या डोक्यावर तुम्हाला पिसं दिसणार नाहीत. बोडकं डोकं असण्याचं कारण मोठं महत्त्वाचं आहे.

प्राण्यांच्या मृत शरीरात डोकं खुपसून त्यातून मांस बाहेर काढणाऱ्या गिधाडांची डोकी बोडकी असतात. पिसांमध्ये काही अडकून आरोग्याला धोका होऊ नये यासाठी डोक्याची रचना अशी केली जाते.

बॅक्टरीया आणि इतर सूक्ष्मजीवांचा त्रास या गिधाडांना होऊ नये, यासाठी अशाप्रकारे डोकी बोडकी असतात.

पंखांना लावतात रंग

गिधाडांच्या दोन अशा प्रजाती आहेत, जे चक्क स्वतःचे पंख रंगवू शकतात. बियर्डेड व्हल्चर आणि ईजिप्शियन व्हल्चर हे गिधाडांचे असे दोन प्रकार आहेत, जे स्वतःचेच केस रंगवू शकतात. स्वतःचे पंख रंगवू शकणाऱ्या पक्षांच्या काही मोजक्या प्रजाती आहेत. त्यांच्यापैकी दोन प्रजाती या गिधाडांच्या आहेत.

गोलाकार फिरण्याचं वेगळंच आहे कारण…

 

vultures im 1

 

बऱ्याचदा गिधाडं एकत्रितपणे वर्तुळाकार आकारात फिरताना दिसतात. साधारण समज असा असतो, की ही गिधाडं शिकाराची आणि त्या सावजाच्या मृत्यूची वाट बघत असतात. मात्र ते सत्य नाही.

गिधाडं नेहमीच उंच आकाशात उडत असतात. वर्तुळाकार आकारात अशापद्धतीने उडून गिधाडं पंखांच्या सहाय्याने गरम हवेचे प्रवाह तयार करत असतात. यामुळे त्यांना उंच उडण्यास आणि अधिक लांबवरचा प्रवास करण्यास मदत होते.

किती उंचावर उडू शकतात गिधाडं?

 

vultures im 4

 

हवेचे प्रवाह तयार करून उडण्याची उंची वाढवणं हा गिधाडांच्या उडण्यातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊ लागलं तरीही अधिकाधिक उंचावर उडण्याची क्षमता गिधाडांकडे आहे. गिधाडं जमिनीपासून तब्बल ११.५ किमी उंचावरून उडू शकतात.

गिधाडं फक्त मांसाहारच करतात का?

गिधाडं सहसा अनेकदा मेलेल्या प्राणी किंवा पक्षांवर तुटून पडताना दिसतात. त्यांच्या आहारातील मुख्य घटक म्हणजे इतर मृत प्राण्यांची हाडं हाच होय, मात्र गिधाडांच्या काही प्रजाती अधिक पदार्थ असणारा संपूर्ण आहार घेण्याच्या प्रयत्नात असतात.

इतर पक्षी, मासे यांचा समावेश असावा असा त्यांचा प्रयत्न असतो. याचबरोबरीने कठीण कवचाची विविध फळं सुद्धा गिधाडांच्या काही प्रजाती आहारात ठेवतात.

अशी पचवतात हाडं…

जनावरांची हाडं, हाच गिधाडांच्या आहाराचा मुख भाग असतो. हाडांचा जवळपास ७०% समावेश त्यांच्या आहारात असतो. मग ही हाडं कशी पचवली जात असतील?

गिधाडांच्या पोटात मोठ्या प्रमाणात आम्ल तयार होत असतात. या आम्लांच्या मदतीने सूक्ष्मजीवांचा नायनाट करणं हा एक उद्देश असतोच, मात्र हीच आम्ल हाडं योग्यरितीने पचण्यासाठी मदतीला येतात.

गिधाडांची केली जाते पूजा

 

vultures im 3

 

गिधाड हा पक्षी अनेक समाजांमध्ये आणि अनेक संस्कृतींमध्ये आदराचं स्थान असलेला पक्षी आहे. काही समाजांमध्ये तर गिधाडांची पूजाअर्चना सुद्धा केली जाते.

इजिप्त देशात गिधाडाला मातृत्वाचं प्रतीक मानलं जातं. सत्यात पाहायला गेलं, तर यातही तथ्य असल्याचं गिधाडांना पाहून अगदी सहज लक्षात येईल.

गिधाडं वाईट नाहीत, कारण…

गिधाड हा पक्षी, त्याचं दिसणं, आणि एकूणच त्याच्याविषयी असणारी मतं याचा विचार केला तर गिधाड म्हणजे काहीतरी वाईट, काहीतरी नकोसं, असाच आपला समज असतो. मात्र गिधाडं वाईट नाहीत, उलट निसर्गासाठी फार आवश्यक आहेत.

गिधाडं मृत प्राण्यांची शरीरं खाऊन टाकतात, त्यामुळे निसर्गातील घाण कमी होते. पोषणमूल्यं पुन्हा अन्नसाखळीत समाविष्ट होण्यास मदत होते. मृत शरीराची लवकर विल्हेवाट लागल्यामुळे, आजार पसरण्याचा धोका कमी होतो. अन्नसाखळीतील आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी गिधाडं फारच महत्त्वाची ठरतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?